लेखकजयनीतयांनी बुधवार, 27/08/2014 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
अमका सांगतो एक
तमक्याचे ठोकताळे दुसरेच
खमका करतो दावा छातीठोक
घडते प्रत्यक्षात वेगळेच
प्रारब्ध माझे अधर अनिश्चित
खडतर काळ प्रतीक्षेचा
नाही विचलीत मी अपराजित
प्रण मनात घोर तपस्येचा
फळतील माझे प्रयत्न भगीरथ
घेईन वेध भविष्याचा
शोध सुरुच सतत अविरत
सिद्धहस्त ज्योतिष्याचा
लेखकमाम्लेदारचा पन्खायांनी बुधवार, 27/08/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. घराघरात आपल्या लाडक्या दैवताच्या तयारीची लगबग आणि धावपळ अगदी मनापासून सुरु आहे. ज्यांचा घरचा गणपती कोकणात आहे त्यांची तर तऱ्हाच वेगळी….गणपती म्हटला की मनात पहिल्यांदा आठवतं ते पुणं …. ह्या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते….
लेखककंजूसयांनी बुधवार, 27/08/2014 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
(१)
मार्च महिना होता .थंडी सरली होती .अशा दिवसांत भटकंतीसाठी ठरावीक डोंगर उरतात .१४ तारखेला (२००६) होळी होती .भिमाशंकरला जायचे ठरवले परंतू त्यादिवशी सकाळी निघायला उशीरच झाला .तरी साडेबारा पाऊणला नेरळला पोहोचलो ,दुपारची वेळ त्यामुळे रिक्षा मिळून कशेळे व तिथून खांडसला पोहोचायला पावणेतीन वाजले .
नेहमी सकाळी नऊला खांडसहून चढायला सुरुवात करतो आणि रमतगमत तीन वाजता गणपतीघाटाने वर चारपर्यँत जातो .पण आज अंधार पडायच्या आत साडेसातपर्यँत वर जायलाच हवे होते .वाटेत एक गाववाला शेतावरून परतत होता ."एवढ्या उशीरा ?जरा पाय उचला लवकर .पोहोचाल ." हो म्हणालो .
तासाभरात गणपती देवळाजवळ आलो .पाचच मिनीटे थांबून निघा
लेखकखुशियांनी बुधवार, 27/08/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
१९९८ सालीप्रथम हिमालय पाहिला पटणीटॉप येथे बर्फाचा तो डोन्गर पाहुन थक्क झाले होते. नन्तर अमरनाथ यात्रा करताना त्या नगाधिराजाचे रौद्बभीशण सौन्दर्य पाहुन मन्त्रमुग्दध झाले होते आणि आदिकैलास-ओमपर्वत यात्रेच्या वीस दिवसात तो माझा मनभावन झाला.
हिमालयाच्या विविधतेचे वर्णनतरी कुठल्या शब्दाने करावे?
लेखकस्पार्टाकसयांनी बुधवार, 27/08/2014 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबरचा महीना सुरु होता. थँक्सगिव्हींच्या सुटीचा आदला दिवस. अमेरीकेतील पोर्टलँड इथल्या विमानतळावर एक विमान सिएटल इथे जाण्यासाठी निघण्याच्या तयारीत होतं. नॉर्थवेस्ट ओरीएंट एअरलाईन्सच्या बोईंग ७२७-१०० प्रकाराच्या या विमानाला पोर्टलँड इथून सिएटल इथे जाण्यास साधारणतः अर्धा तास लागणार होता. आपल्या वेळेनुसार दुपारी २.५० वाजता पोर्टलँड विमानतळावरुन या विमानाने टेक् ऑफ घेतला. विमानात एकूण ३७ प्रवासी आणि पायलट-कोपायलट सह ६ कर्मचारी होते.
विमानाने टेक् ऑफ घेतल्यावर १८ सी या क्रमांकावरील प्रवाशाने सिगारेट पेटवली (त्यावेळी विमानात धूम्रपानास मनाई नव्हती).
लेखकऋषिकेशयांनी बुधवार, 27/08/2014 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे!
=========
"साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव!
लेखकअत्रुप्त आत्मायांनी बुधवार, 27/08/2014 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१३
मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प!
=============
हुश्श्स्श्स.......! आणि फोटोंच्या कचाट्यातून कसाबसा एकदाचा तो कान-पिळून होतो.आणि गाडी म्होरल्या ठेसनात येते..ती सप्तपदीच्या! हा मात्र दोन्ही बाजुच्या सर्व आज्जी-बायांचा अत्यंत कौतुकाचा शीन बरं का! इथे येणारे (आनंद)अश्रूही खरे! दोन्ही हात उंचाऊन लांबूनच दिले गेलेले आशिर्वादही खरे. आगदी मंत्रांशिवाय केला हा विधी तरी चालेल...असं माझ्या सारख्याला वाटणारा हा विधी आहे.