पाकीट हरवते तेव्हा ......
दि. १४ सप्टे. ला टि.म.वि. गुलटेकडी येथे काही कामानिमित्त गेलो होतो . दुपारी २ वाजता घरी आलो तर आपले पाकीट पडले आहे असा साक्षात्कार झाला ! पाकीटात ४-५०० रुपये , २ क्रेडिट कार्डे , २ डेबीट कार्डे आणि ड्रायविंग लायसेन्स असा ऐवज होता.
भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा जेवायला बसलो , जेवत असताना विटुकाकूने जे काही ऐकवले तेही निमूटपणाने गिळले. तिच्या मते मी ताबडतोब कार्डे रद्द करायला हवीत. मी शांतच होतो आणि पाकीट ज्याला सापडले ती व्यक्ती नक्की फोन करेल हा विश्वास होता. ( अशावेळी मी शांत असलो की विटुकाकू भयानक चिडते असा अनुभव असल्याने फक्त अस्वस्थ असल्याचे नाटक केले ) ..
मिसळपाव