Skip to main content

पोकळी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 18/09/2014 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली? (श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले) शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले

पोळी पापडी चाट

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 18/09/2014 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच होणारा पोळीचा लाडू आणि फोडणीच्या पोळीला चटपटित पर्याय. तरी ह्या पापडी मी साध्या पोळ्यांच्या केल्या पण ह्यांना अधीक पौष्टिक / रंगीत बनवण्यासाठि पालक, गाजर किंवा बिटाचा पल्प घालून केलेल्या पोळ्या पण घेउ शकतो. chat 1 साहित्यः अ. पापडी साठि: १. शीळ्या पोळ्या - ४ ते ५ २. तळण्यासाठि तेल ब. चटण्या: १.

ह्ये वागनं बरं नव्हं

लेखक निराकार गाढव यांनी गुरुवार, 18/09/2014 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत | आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वाग

सायकलींग करताना..

लेखक मोदक यांनी बुधवार, 17/09/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलींगच्या धाग्यावर मिळालेला प्रतिसाद आणि मिपाकरांचा उत्साह बघुन ट्रेक करताना.. सारखीच हा धागा काढायची कल्पना सुचली. "काहीतरी वेगळे" या कल्पनेवरून माझी सायकलींगची सुरूवात झाली. सायकलची निवड आणि पुढची प्रगती त्या धाग्यात आली आहेच. या धाग्यात आपण सायकलींग करताना घ्यावयाची काळजी आणि इतर माहितीची देवाणघेवाण करू. महत्वाचे - पुढील सर्व माहिती भारतात वापरल्या जाणार्‍या हौशी सायकलींगच्या अनुषंगाने दिली आहे. रेसींग सायकल किंवा अतीप्रगत सायकलसाठीची माहिती वेगळी असू शकते. मी निष्णात सायकलपटू नाही.

वेदना

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 17/09/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
वेदना आठवणी चालून येतात अचानक......... एखाद्या बन्दुकीच्या गोळी सारख्या, आरपार भेदून जातात पुन्हा जखमी करून. तरीहि आठवतेच........ एखादी प्रसन्न सन्ध्याकाळ गन्धित क्षण, जगावेसे वाटणारे. हातात हात गुम्फलेले आपले आणि......................... तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस" नाहीतर................... "निसटून जातील तुझ्या हातातून." ............................ अशाच कीतितरी जीर्ण जखमा अजुनहि काहीश्या ओल्या, काही बरया होत आलेल्या, वेदनावतात, पुन्हापुन्हा, आठवणीन्चा धक्का लागून. मी मात्र प्रयत्नात, सार काही विसरण्याचा. निश्फळ ! ! निरर्थक ! ! ! निरन्जन वहाळेकर
काव्यरस

बंद दरवाजा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 17/09/2014 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली, मुंबई सारखे महानगर, स्वत:चा विचार करणारे स्वार्थी जीव मग प्रेमाचा वसंत कसा बहरेल कारण हृदयांची कपाटे फ्लैटचा दरवाजा सारखे सदैव बंद असतात. कॉंक्रीटचे जंगल आहे कागदी मुखौटे आहे. टेबलवर सजलेला इथे एक उदास कैक्टस आहे. स्वार्थी संबंधाना इथे बाभळीचे काटे आहे. प्रेमाचा वसंत इथे कधीच 'बहरत' नाही. फ्लैटचा दरवाजा इथे सदैव बंद असतो.
काव्यरस

न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डी सी मधे कट्टा करूया का?

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 17/09/2014 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. पुढील एका महिन्याच्या कालावधीत (२० आक्टोबर पर्यंत) न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डीसी मधे कट्टा करूया का? कोण कोण मिपाकर या दोन्ही शहरात आहेत? मी सध्या आल्बनीमधे आहे, आणि खास म्युझियम्स बघण्यासाठी या दोन्ही शहरांचा आठवडाभराचा प्रवास करण्याचा बेत करत आहे. कट्ट्याचे वेळी एकाद्या म्यूझियमची सफर करू शकतो, किंवा अन्य कुठेतरी मोकळ्या जागी जमू शकतो, आणि पुरेसा वेळ असल्यास मी तैलरंगात निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक करू शकतो. माझा इथला फोनः ५१८ ८३१ १७९१. .

< थेट्रातली मज्जा >

लेखक यसवायजी यांनी बुधवार, 17/09/2014 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेर्नास्तान ------------------ बारका हुतो तवा आज्जाबरबर चंद्रमा थेट्रात जायला मला कद्दीच आवडलं न्हाई, पण त्यो वडत मला घेऊन जायचा. दर शुक्करवारी बच्च्चनचा पिच्चर हमखास लागायचा. दोन-तीन तास तर बसायचं हाय तिथं, पर आज्जाला आधी एवढा वेळ का लागायचा मला त्या टायमाला कद्दीच समजलं न्हाई. त्यो आधी आसपासची जागा बघायचा, कुठं थुकलंय का? *गून्, *तून ठेवलंय का बघायचा. मग रुप्पयाचा एक बंदा घेऊन लाकडी शीटच्या पट्ट्यामधनं फिरवायचा. भौतेक ढेकनं मारत हुता. मग तरुनभारत पेपर शीटवर हातरायचा तवा कुठं तेच्याच शीटवर मला जर्रा जागा मिळायची टेकवायला.

मोठा माणूस जन्मत: मोठा असतो???

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 17/09/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
मोठा माणूस जन्मत: मोठा असतो. त्याला मोठे व्हावेच लागते. आईच्या गर्भात असतानाच त्याला पुढे भविष्यात तो मोठा होणार याची जाणीव असते. बालपणी अन्य कार्ट्यांंप्रमाणे हातवारे करत माकडाप्रमाणे तो उड्या मारत नाही. कधी मोठ्यांच्या नकला करत खदाखदा हसत नाही. कधी आपल्या बहिणीची शेपटी ओढून तिला त्रास देत नाही. भविष्यात आपण उदा: मोठे कवी किंवा लेखक बनणार असू तर आपले जीवन लोकांसमोर आदर्श राहिले पाहिजे म्हणून तो कधीच खोड्या करीत नाही. बालपणापासूनच सदैव धीर गंभीर चेहरा करून वावरणे त्याच्या नशिबी.

गृह कर्ज

लेखक सुहास पाटील यांनी बुधवार, 17/09/2014 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचायला मिळाले. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे. त्यात अगदी पटवुन सांगितले होते कि दुसरे गृह कर्ज घेऊ नये. त्या परिस सरळ FD मध्ये पैसे टाकावे. मला लिंक सापडता सापडत नाहीये नाहीतर इथे दिली असती. तरी मी शोधन्याचा प्रयन्त करतोय अजून, लिंक सापडली कि इथे देईल पण इथे धागा टाकण्याचा मुद्दा असा कि जाणकारांनी ह्या विषयावर प्रकाश टाकावा. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ?