Skip to main content

आनंद १

लेखक असंका यांनी सोमवार, 20/10/2014 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
. कंफ्युज्ड अकौंटंट

लागली कुणाला कुणाची उचकी; ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !

लेखक माहितगार यांनी रविवार, 19/10/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
:मूळ गीत: मला लागली कुणाची उचकी (चित्रपट: पिंजरा गीतकार- जगदीश खेबूडकर ) या मूळ गीताचे गीतकार आणि रसिकांची सादर माफी मागून. व प्रेरणा आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि गोष्ट जाहीर ना सांगण्याजोगि ! कुनी त्या चिन्हावर मारली टिचकी लागली कुणाला कुणाची उचकी कुणाला गं कुणाला ? ह्याला का त्याला ?

ज्याचे त्याला कळले

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिलेदार धारातीर्थी बालेकिल्ले ढळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले तरातरा निघालेले पुन्हा मागे वळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले बेघर होतील आता जे पंधरा वर्ष रुळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले पीळ बघूया जाईल का सुंभ मात्र जळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले शुभ्र कपड्यांमागचे रंग खरे उजळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले आहे नव्याची आशा संकट परी ना टळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले मतदाराचे कौतुक की कर्तव्य त्याला कळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले - अ ज ओक

मांद्यपर्वातील भैरवी

लेखक अवतार यांनी रविवार, 19/10/2014 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
पळता पळता वाटे अदृश्य राहिली वाट मी चढतो आहे कधीचा हा आयुष्याचा घाट ठिणगीच्या स्पर्शाने राखेत पेटते आग पृथ्वीच्या भाग्याचा का नक्षत्रांना राग? सूर्यास्ताच्या साक्षीने वणवा पेटवतो आज ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज? दाटून मेघ येता मणक्यात चमकते वीज गोठून भावना गेल्या अन मेंदू झाला फ्रीज ! मज ठाऊक नाही कोठे ह्या आभाळाचा अंत मी उद्या निघालो आहे पोचेन कालपर्यंत ! कवी --- (विदाऊट) ट्रेस

लिफ्ट

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 19/10/2014 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
"साब, दो पंक्चर है. निकालनेमें टाईम लगेगा!" "दो पंक्चर?" "हा साब! देखो!" गॅरेजवाल्याने मला पाण्याच्या पिंपात बुडवलेली टायरची ट्यूब आणि दोन ठिकाणाहून येणारे बुडबुडे दाखवले. "कितना टाईम लगेगा?" "एक घंटा तो लगेगा साब कमसे कम!" मी दुसरं काय करु शकणार होतो? कारच्या डिकीत नेमका एक्स्ट्रा टायर नव्हता. त्यामुळे पंक्चर काढून होईपर्यंत थांबण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं! आधीच माझा मूड खराब होता. एकतर ऑफीसमधून लवकर निघण्याच्या माझ्या बेताला नेहमीप्रमाणे माझ्या मॅनेजरने सुरुंग लावला होता.

पाणी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख प्रहार वृत्तपत्रात प्रकाशित झालेला असून त्याचा दुवा हा: http://prahaar.in/collag/257578 काही दिवसांपूर्वी एका ट्रेकला गेलो होतो. डोंगरदऱ्यांतून फिरण्याची मजा जितकी वेगळी असते, तितकीच वेगळी असते ती म्हणजे अशा भटकंतीतून होत जाणारी स्वत:ची आणि जगाची ओळख. आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर गेल्यावर, गावातून खेडय़ांतून प्रवास केल्यावर तिथलं जीवन समोर येतं, तेव्हा कळतं की प्रत्येक गोष्टीला किती किंमत आहे आणि महत्त्व आहे. ट्रेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कुठली असावी, तर ती म्हणजे ‘पाणी’.

पुणेरी.......

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 18/10/2014 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी????????????? ह्ये काय म्हणायचं हो आता तुमचं नविन??? नेहेमीचं पुणं..पुणं..नावाचं नवं रडगाणं? कि बघा आमच्या पुण्याचं हे ठिकाण...म्हणून वाजवलेलं पिपाणं? की आणखि काही? तर नाही बरं का तसलं काही. पुणेरी हे आमच्या पुण्याच्या आत्म्यात वसलेलं एक छोटेखानी सूखं होतं. आणि होतं म्हणायचं म्हणजे अता त्याला बंद होऊन चार वर्ष झाली. तुंम्ही म्हणाल कित्ती छळ करताय आढे आणि वेढे घेऊन..? सांगा कि लवकर काय ते!? तर सगळं कळायला जरा तुंम्हाला माझ्या वेदपाठशालिन(किंवा कालिन!) जीवनात घेऊन जातो. (आलं कि नै ..पहिलं पुणेरी श्टाइलचं वाक्य!

हरयाना-महाराष्ट्र विधानसभा निवडणुक (२०१४) : प्रत्यक्ष निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 18/10/2014 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र व हरयानातील २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवार १९/१०/२०१४ या दिवशी लागतील. सकाळी ८ पासून मतमोजणी आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल -2014

लेखक जेपी यांनी शनिवार, 18/10/2014 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.त्याच्या निकालाची चर्चा करण्यासाठी आणी निकालाचे अपडेट देण्यासाठी हा धागा. माझा अंदाज. भाजप-141 शिवसेना-60 काँग्रेस-33 राकाँ-30 मनसे -12 ईतर-12

भेसळ

लेखक रवीराज यांनी शनिवार, 18/10/2014 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
भेसळ करणाऱ्यांना काय शिक्षा दिली पाहीजे? खाद्य पदार्थांमधे भेसळ म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळ, आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अन्नपदार्थांमधे भेसळ करताना जे घटक वापरले जातात त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवु शकतात, एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, एखाद्याला आयुष्यभरासाठी व्याधि / व्यंग यांचा सामना करावा लागु शकतो, समाजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते हे भेसळ करणऱ्यांना माहित असते.