एक नाते - अनोखे
एक नाते — अनोखे
माणूस जन्मल्यापासून त्याच्या जीवनात अनेक नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरूवात होते. कोणतेही मूलभूत प्रश्न मनात येण्याआधीच ही नाती तयार होतात. पुढे ह्या नात्यांची दृढता किंवा कमजोरपणा व्यक्तिसापेक्ष ठरू शकते. आई-मूल, बाप-मूल, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी, काका, मामा, मावशी, आत्या इ. अनेक नाती जन्माला येतात. आपल्या साहित्यात यातील अनेक नात्यांचे भरभरून गोडवे गायलेले ठिकठिकाणी दिसून येतात.
मिसळपाव