महाराजांचा दक्षिण दिग्विजय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील.
मँगो मस्तानी
मँगो मस्तानी

नित्यनूतन दीपावली - भरत उपासनी
(श्री भरत उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण
महाराष्ट्राच्या सत्तेचा निकाल मतदारांनी दिलेला आहे पण ह्या निकालाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे . आता तुम्ही बोलाल आपण का करावे हे तर राजकीय पक्षाची गरज आहे आणि काम आहे.
परंतु प्रत्येक निवडणुकीसोबत प्रत्येकाने काहीतरी शिकायला हवे मग तो मतदार असो व राजकीय पक्ष .
ओळख बहारिनची
अरबी समुद्राच्या आखाताच्या किनार्यावर वसलेले देश म्हणजे आखाती देश. तेलसमृद्ध, इस्लामधर्मीय आणि वाळवंट अशी या देशांची ओळख. आखाती देशांमधलाच बहारीन हा एक लहानसा देश आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेला वसलेलं हे नगरराज्य म्हणजे लहानमोठ्या ठिपक्याएवढ्या बेटांचा समूह आहे. सर्व बेटांचं एकत्रित क्षेत्रफळ मुंबईएवढंच. 706 चौरस किलोमीटर एवढाच यातल्या छत्तीस बेटांचा विस्तार.
या देशाच्या एका टोकाला खजुराच्या वाड्या; तर दुसर्या टोकाला वैराण रखरखीत वाळवंटाचा पसारा. मूळ बहारीनींएवढेच परदेशी नागरिक या देशात राहातात. या सर्वांची मिळून लोकसंख्या बारा लाखाच्या आसपास आहे. परदेशी लोकांमध्ये सर्वात जास्त भारतीय.
विचारशृंखला - संजय उपासनी
(श्री संजय उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री उपासनी यांना धन्यवाद!)
*****************
* विचारशृंखला *
******************
आभाळ दाटून आल्यागत विचार दाटून आलेत.....
पाऊस पडला नाही तरी डोळे मात्र भरून आलेत....
आठवणींच्या सागरात मासे फिरू लागलेत........
खूप चालावे म्हटले तर पाय भरून आलेत........
मन आणि विचार सरभेसळ होत चाललेत .....
ग्रंथसखा -श्याम जोशी
लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहान भूक नाही. फक्त पुस्तकं आणि मी. पहाटे पडलं होतं का काय माहिती नाही पण ते स्वप्न मी प्रत्यक्षात अवतीर्ण झालेलं पाहिलं, आमच्या बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयात, वाचन संस्कृतीच्या माहेरी, माझ्या माहेरी, माझ्या काकामुळे .
बदलापूरभूषण श्याम जोशी सर हे बदलपूरातलं चिरपरिचीत नाव. जोशी सर म्हणजे मराठी साहित्याचा चालताबोलता ज्ञानकोश! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत्, वाचली गेली पाहिजेत्, बदलापूरासारख्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत या वेडाने झपाट्लेला हा माणूस.
मिसळपाव
