Skip to main content

एक पोएटीक कन्फ़्युजन झालय

लेखक मारवा यांनी शुक्रवार, 24/10/2014 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेक वर्षांपुर्वी एक सुंदर गझल जगजित सिंग च्या आवाजात ऐकली होती. ती प्रचंड आवडली होती. तीच्या मधुर चालीमुळे ती डोक्यात अधुनमधुन घुमत राहयची. नंतर ती कॅसेट (ती काळ्या फ़िल्म वाली) हरवली मात्र गझल डोक्यात रुतुन बसली. तिचे शब्द व त्यांचा एक मनात लागलेला अर्थ देखील तसाच फ़ीट्ट झाला. आपले गैरसमज जसे घट्ट होउन जातात तसाच. मी ती बेहोश गुणगुणत असे व मोठा आनंद मला ती गझल गुणगुणतांना व्हायचा. तिचा अर्थ त्यातले शब्द व सर्वात महत्वाच म्हणजे जगजित चित्रा चा आवाज तर खुपच पागल करायचा, प्रचंड आवडायचा.

चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

लेखक खोंड यांनी शुक्रवार, 24/10/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
"५ कटिंग दे रे…. " माझ्या कडून ऑर्डर गेली … "जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं … दोघे सिगरेटी घेऊन आले…. "च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता "काय झालं रे " मी सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला सगळे सावंत कडे डोळे लाऊन "सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … " "अर्रर्र ….

चहा व कोंबडीच्या अंड्या पासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ?

लेखक मारवा यांनी शुक्रवार, 24/10/2014 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
चहा व अंड (कोंबडीच यापुढे कों.च हे शार्टफ़ार्मात वाचावे) हे विधात्याने दिलेले मर्त्य मानवाच्या जीवनाच्या कठोर संघर्षात त्याच्या थकलेल्या मना-शरीराला दिलासा व विलक्षण आनंद देणारे दोन वरदान आहेत. या दोन वरदानाच्या सेवनाने मनुष्य भौतिक च नव्हे तर आध्यात्मिक जीवनातील अडथळे देखील सहज पार करु शकतो. म्हणजे ते इटसेल्फ़ अडथळे पार पाडत नाही मात्र यांचे सेवन मनुष्याला एनर्जाइझ करते व थकवा घालवुन तरतरी प्रदान करते. त्या तरतरी च्या तरफ़ेवर स्वार होउन मनुष्य भवसागर पार करु शकतो. वरचा आध्यात्मिक उल्लेख सीरीयस आहे.

डोंबिवली कट्टा पंचनामा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 23/10/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले.

मित्रा

लेखक तुषार जोशी यांनी गुरुवार, 23/10/2014 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रा मी पहिला श्वास घेतला तेच महानगरात आणि.. तू पहिला श्वास घेतलास गावात...

पत्रकार ब्रॅडली...

लेखक विकास यांनी गुरुवार, 23/10/2014 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
वॉशिंग्टन पोस्टच्या एकेकाळच्या कार्यकारी संपादकाचे, बेन ब्रॅडलीचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या बायकोने मध्यंतरी गुपित फोडले त्यानुसार ब्रॅडलींना काही वर्षे अल्जायमर झालेला होता ज्यामुळे त्यांची स्मृती लयाला गेली होती. पण त्यांच्या नेतृत्वाखाली १९७०च्या सुरवातीस वॉशिंग्टन पोस्टने जे काही केले त्यामुळे त्यांच्या बद्दलच्या स्मृती आजही अमेरीकन माध्यमात जाग्या असलेल्या दिसल्या. बेन ब्रॅडली हे मुळचे बॉस्टनचे.

उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखन पद्धतीच्या निमीत्ताने

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 23/10/2014 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखनात वडीलांचे नाव नमुद करण्याची प्रथा कमी असावी. एक उदाहरण म्हणून हरयाणाचे नवे मुख्यमंत्री त्यांचे नाव मनोहर लाल खट्टर असे लिहितात. संदर्भ त्यांचे संकेत स्थळ http://manoharlalkhattar.in/ मराठी/महाराष्ट्रीय लेखन परंपरेने मनोहरलाल असे एकत्र न लिहिता, मनोहर आणि लाल हे शब्द वेगवेगळे लिहून नंतर आडनाव लिहिलेले आढळले जसे की मनोहर लाल खट्टर असे लिहिले तर आपण सर्व साधारण पणे मनोहर हे त्यांचे स्वतःचे नाव लाल हे मध्ये आले म्हणून वडलांचे नाव आणि मग आडनाव असे आपण सर्व साधारणपणे समजतो.

दिवाळीच्या फुलझड्या

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 23/10/2014 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
चंचला कमळा ती हातातुनी निसटली दिव्यांच्या उजेडात कमळावर स्वार झाली. पीएम इन वेटिंग सारखा सीएम इन वेटिंग राहिला कोकणचा राजा आज ही उपाशी राहिला धनुष्य बाणाचा नेम कसा काय चुकला? शकुनी पास्यानी दगा का दिला? अंधार दूर झाला वनवास आज संपला आज वोट पाउलांनी सत्ता घरात आली.

काही आवाज.. हरवलेले....

लेखक विक्रान्त कुलकर्णी यांनी बुधवार, 22/10/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
वैज्ञानिक संकल्पनेनुसार आवाज म्हणजे कंपनलहरी असतात व आपल्या कर्णपटलावर आदळल्यावर मेंदू त्याचा अर्थ लावतो व आपल्याला नादाचा बोध होतो. मात्र काही आवाज हे आपल्या मन:पटलावर नाद म्हणून टेपरेकॉर्डरच्या टेप सारखे कायमचे कोरलेले असतात, जे आपण केव्हाही रीवैंड करून ऐकू शकतो. त्यालाच आपण आठवणी म्हणतो. अशाच कांही हरवलेल्या आवाजाच्या आठवणी. माझे लहानपण मुंबईतील विक्रोळी या कामगार बहुल उपनगरात गेले. दिवसाच्या ठराविक वेळी ठराविक येणारे आवाज ऐकतच आमचा दिवस उजाडत असे व संपत असे. ते आवाज व ती ठरलेली वेळ इतकी मनात पक्की बसली आहे कि आजही तसा एकादा आवाज ऐकला कि बरोब्बर ती वेळ डोळ्यासमोर उभी राहते.

दिवाळीचे फटाके !

लेखक मनो यांनी बुधवार, 22/10/2014 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(वाघाच्या गुहेतला एक सीन) धाकटे राजे (बात्तीसाव्यांदा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?" थोरले राजे: "थोडी वाट पहा अजून" धाकटे राजे (स्वतःशीच पुटपुटत): "पंधरा वर्षे झाली, लहान असल्यापासून लाल दिव्याची वाटच पाहतो आहे … " थोरले राजे: "काय म्हणालास?" धाकटे राजे: "काही नाही. दुपारी आमदारांना काय सांगायचं मग?" थोरले राजे: "त्यांना काय कळतंय, सगळे निर्णय मीच घेणार" धाकटे राजे: "मग सुभाषला का पाठवायचं?" थोरले राजे: "तुला काहीच कळत नाही. अरे त्याच्याकडे दोन अग्रलेख तयार आहेत.