प्रतिमा
प्रतिमा
दुपारची वेळ. घरात आई आणि मुलगी अशा दोघीच. मुलीला झोपवल्यावर आईदेखील थोडावेळ तिच्या शेजारीच पहुडते. काही वेळाने मध्येच मुलीला जाग येते. काय आणि कसं सुचतं कुणास ठाऊक पण तिला आईप्रमाणेच स्वयंपाकघरात जाऊन काम करण्याची लहर येते. ती ठरवते आपणसुद्धा आईप्रमाणेच भाजी चिरूया. ती रोज आईला भाजी चिरताना बघतच असते आणि अगदी तसंच आपणसुद्धा भाजी चिरून आईला थोडी मदत करावी असं तिला वाटतं. पण सुरी कशी घ्यायची कारण ती तर ओट्यावर आहे आणि तिची उंची तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग ती बाहेरच्या खोलीतून एक खुर्ची हळूहळू (आवाज न करता) स्वयंपाकघरात ओढत आणते. खुर्चीवर चढून ती ओट्यावरील सुरी आधी घेते.
मिसळपाव
प्रवेशद्वारावरील नक्शिकाम अप्रतिम करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाहि.