Skip to main content

कथा लेखन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 18/11/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.

चांगली कथा कशी लिहावी ?

"आजकाल काही लिहित का नाहीस रे ?" कूठल्यातरी वेगळ्याच विषयावर चर्चा चालु असताना गिरिजाने अचानकच हा प्रश्न विचारला . " आजकाल काही लिहित का नाहीस रे ? आधी काही ना काहीतरी लिहित असायचास ? कशा का होईना वादग्रस्त का होइना गोष्टीबिष्टी लिहायचास ... आता एकदमच बंद केलेलं दिसतय ... लिहिना एखादी चांगली गोष्ट " ह्या संवादावरुन डोक्यात विचार चक्र सुरु झाले . आधी सुचायचे ते जसे च्या तसे लिहुन काढायचो , पण आता ते चांगले होईल का ह्या विचाराने लिहायचे टाळतो .

एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 18/11/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ दिवाळीचे दिवस बेंगलोर मधली एक संध्याकाळ. इंदीरा नगर एरिया. ऑफिसचं शेड्यूल पक्कं नसल्यानं त्यानं हैद्राबादची रिझर्वेशन्स केलेली नव्हती. बंगळूर ते हैद्राबाद आणि तेथून निजामाबाद. नेहमीचाच मार्ग होता. दिवाळीची चार दिवस असलेली सुट्टी बेंगलोर मध्ये घालवायची त्याची मुळीच ईच्छा नव्हती. ट्रेन मिळायची शक्यता आता शून्याहून कमी. सुट्टीचे दिवस म्हणल्यावर विमान कंपन्या लुटायला बसणार. बसने जाणे हाच एक आणि एकमेव पर्याय होता. खाली नही है- ऑपरेटर. दुसरे एजंटसे पूछके देखो. दुसर्या एजंटने तीन चार फोन केले. त्याचे पण तेच उत्तर आणि तोच सल्ला. सात आठ एजंटना विचारून झाल्यानंतर तो वैतागला.

दैव ,नशीब कि शाप ? भाग २

लेखक स्वीत स्वाति यांनी मंगळवार, 18/11/2014 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
bhag ek हे कुटुंब ज्या गावात राहते ते गाव छोटे च असून पूर्ण गाव एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी असते. जेव्हा किरण चा अपघात झाला तेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यासाठी खूप लोक धावले . लोंकाचा या कुटुंबावर असणारा जिव्हाळा तेव्हा दिसून आला. अर्थात या कुटुंबातील सर्वजन माणुसकी जपणारी आहेत . ग्रामीण भाग असल्यामुळे बर्याच वेळा वीज गायब असते .

कन्फ्यूजन /कम्युनिकेशन/कन्व्हिक्शन

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 18/11/2014 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, बर्‍याच दिवसाने मिसळ्पाव वर लिहितोय.. आणि सांगायची गोष्टही तशीच आहे.. साधारण ६ वर्षापुर्वी हा प्रवास सुरु झाला, आधी कोल्हापुरी दादा या टोपणनावाने आणि मग स्वतःच्या नावाने इथे लिहु लागलो. अनेकदा बालिश आणि क्वचित बरे असे त्या लिखाणाचे स्वरुप होते. पण या कालावधीत बर्‍याच मिपाकरांनी मला मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले. कित्येकदा चेष्टाही केली, पण या सार्‍यातुन खुप काही शिकायला मिळाले. महत्वाचे म्हणजे लिखाणाची उर्मी कायम राहिली. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आता हा माझ्या लिहिण्याचा प्रवास एका महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे .

मला पडलेले काही (गहन) प्रश्न

लेखक सुनील यांनी मंगळवार, 18/11/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपणा सर्वांना प्रत्यही अनेक प्रश्न पडत असतात. काही प्रश्नांची उत्तरे मिळून जातात तर काही तसेच मनात पडून राहतात. माझ्या मनात पडून राहिलेल्या अशाच काही प्रश्नांची ही जंत्री. मी त्यांचे वर्गीकरण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे (जित्याची खोड!). वर्ग १ - वर-खाली शर्ट घातल्यानंतर शर्टाची बटणे ही वरून खाली लावीत जावीत की खालून वर? एखाद्या देशातील बहुसंख्य जनतेच्या ह्या सवयीचा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काही संबंध जोडता येईल काय?

सगळीकडे नुसती चर्चा ब्रँड आणि फक्त....... ब्रँडची

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 18/11/2014 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे काय अन् पायताण काय, अवस्था तीच खाण्या पिण्याची सगळीकडे नुसती चर्चा, ब्रँड आणि फक्त.......

त्रास

लेखक शिरीष फडके यांनी मंगळवार, 18/11/2014 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – १२/१०/२०१४ – लेख ७ - त्रास त्रास २५ माळ्यांची इमारत. आठवड्यासाठी या इमारतीमधील लिफ्ट बंद. कारण नवीन लिफ्ट बसवण्याचा निर्णय सोसायटीने घेतलेला आहे. बरं, पर्यायी लिफ्ट किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सगळ्या फ्लॅटधारकांची, आठवड्यापुरती का होईना गैरसोय होणार आहे. आपण आता २५व्या माळ्यावर राहणार्या चार घरांमधील एक-एक प्रतिनिधिची या आठवड्यातील (म्हणजेच ज्या आठवड्यात लिफ्ट बंद होती किंवा नवीन लिफ्ट बसवण्याचं काम सुरू होतं) प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्ती रोज अनेकदा अनेक कारणांसाठी पायर्यांवरील प्रवास करत होती.

एका विचारवंताचा सल्ला...

लेखक चंद्रनील मुल्हेरकर यांनी सोमवार, 17/11/2014 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारच्या वेळी एडव्होकेट बॉबी केसकर आपल्या ऑफिसात बसले होते,षेजारीच माश्या मारायचे रॅकेट ठेवले होते, त्यातुन जळकट वास येत होता..आजचे काम संपल्याचा तो पूरावा होता.. बॉबी केसकर तसा मॉड माणूस ,त्यांच्याकडे प्रचंड बुद्धीमत्ता असल्याने त्यांच्या कडे एकही 'केस' फिरकत नव्हती.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 17/11/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या डावातल्या सिसिलिअन नंतर आनंदने पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स निवडलाय! हा मॅग्नुसचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे आनंदने कोणते विरिएअशन सुट्टीच्या दिवसात तयार केले आहे हे बघायची उत्सुकता आहे. आनंद वेगाने खेळतोय त्यामुळे तयार होऊन आलाय हे नक्की. आज त्याला किमान बरोबरी करावीच लागेल अन्यथा सामन्याचे पारडे बरेचसे मॅग्नुसच्या बाजून झुकेल हे नक्की. चला डाव बघूयात.

दैव ,नशीब कि शाप ?

लेखक स्वीत स्वाति यांनी सोमवार, 17/11/2014 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
दैव ,नशीब कि शाप ? हि एक सत्य गोष्ट आहे.. माझ्या आयुष्यातील कटू घटना ज्या पाहून वाटते कि का असे झाले ? एका कुटुंब प्रमुखाचा मृत्यू होतो आणि त्या घरावर एका मागे एक संकट यायला लागतात. हे कुटुंब ग्रामीण भागातील आहे .