Skip to main content

एका नव्या इतिहासाची सुरुवात -१

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 19/11/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक काल्पनिका आहे – फँटसी. मराठीत दुर्मिळ असलेला प्रकार. इथे तांत्रिक तपशिलापेक्षा कथानकात रस घ्यावा अशी वाचकांना विनंती आहे. शक्यतेच्या पातळ्या तपासण्याचे निकष मानवी ज्ञानाच्या कक्षेत कमी आहेत. शास्त्रे भौतिक पातळ्या तपासू शकतात. अभौतिक अस्तित्वे शास्त्रीय उपकरणांनी टिपता येणार नाहीत. कलाकाराचा मेंदू अन व्यवहारी माणसाचा मेंदू यात वैद्यकीय उपकरणे तारतम्य करू शकतील का शंका आहे. तेव्हा चिकित्सक दृष्टीपेक्षा तरतम दृष्टी ठेवली तर या कथेचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल. ..

कामाचे बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग १

लेखक arunjoshi123 यांनी बुधवार, 19/11/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे. तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात.

Saint आधी की संत आधी?

लेखक चिगो यांनी बुधवार, 19/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. आजच इथं शिलाँगात एका सेंट पिटर्स नावाच्या शाळेत गेलो आणि डोक्यात सहज एक किडा वळवळला.. संत आणि Saint ह्यातील कुठला शब्द आधी आला? एक शब्द दुसर्‍यावरुन उचलला किंवा रचला आहे का? असल्यास कुठला? मला नेहमीच दोन भिन्न भाषांतील समानार्थी शब्दसाधर्म्याचे कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळेच जेव्हा अहोमियात आई, भात, खेदणे इत्यादी शब्द मराठी शब्दांसारखेच अर्थ असलेले आहेत हे कळलं, तेव्हा त्या भाषेशी सख्य वाढले. "नमस्ते लंडन"मध्ये जेव्हा अक्षयकुमार कोण्या इंग्रजाला मातृ, भ्रातृ, त्रिकोणामिती पासून मदर, ब्रदर, ट्रिगोनामेट्री हे शब्द कसे बनलेत हे ठासून सांगतो, तो प्रसंग मला आवडतो.

माणुसकी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 19/11/2014 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी …. रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला …. कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून" अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं ! मग म्हणायचे आधी माणूस हो …. वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं … पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा दबतच गेली सगळी स्वप्न त्याखाली ….रोज….

गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)

लेखक आरोही यांनी बुधवार, 19/11/2014 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : गाजर अर्धा किलो ,डेसिकेटेड कोकोनट १ वाटी ,साखर अर्धी वाटी ,condensed milk अर्धी वाटी ,मिल्क पावडर २० ग्राम,साजूक तूप ३ चमचे सजावटी साठी बदाम .

स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे

लेखक स न वि वि यांनी बुधवार, 19/11/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे…. १. अचानक बंद होतो २. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा ३. अचानक mute मोड मधेय जातो ४. फोन घेताना hang होतो. ५. wallpaper वेगवेगळा दिस्तो.

हरियाणाचे संत रामपाल प्रकरण आणि न्यायालयांचा अवमान करणारे चाहत्यांचे सांशंकीत वर्तन

लेखक माहितगार यांनी बुधवार, 19/11/2014 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरियाणा राज्यात (तथाकथीत संत) रामपाल नावाच्या व्यक्तीवर न्यायालयीन अवमाननेचे आणि हत्येचे काही आरोप आहेत. न्यायालयात उपस्थिती टाळण्याचे चाळीसपेक्षा अधीक प्रयत्नांनतर उच्चन्यायालयानी अजामीनपात्र वॉरंट काढून रामपालला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे या रामपाल महाशयांनी चक्क स्वतःचे खासगी सशस्त्र कंमाडो आणि चाहत्यांच्या भरोशावर न्यायालय आणि शासन यंत्रणेलाच खूले आव्हान दिले आहे. न्यायालयासमोर हजर न राहण्याचे त्याचे म्हणणे न्याययंत्रणा भ्रष्ट आहे.

छावणी - १

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 19/11/2014 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
पंजाबच्या पश्चिम प्रांतातील गुजरानवाला शहर. शहराच्या मध्यवर्ती भागात एक मोठा वाडा होता. हा वाडा होता चौधरी महेंद्रनाथ यांचा. महेंद्रनाथ हे शहरातील प्रतिष्ठीत व्यापार्‍यांपैकी एक होते. समाजात त्यांना मोठा मान होता. धातूच्या भांड्यांचं एक मोठं दुकान त्यांच्या मालकीचं होतं. त्याखेरीज एका मोठ्या धान्यभांडाराचेही ते मालक होते. आपली पत्नी कमला आणि मुलगी सरिता यांच्यासह ते या वाड्यात राहत होते. या दुमजली वाड्यातील वरच्या मजल्यावर चौधरी आणि त्यांचा परिवार राहत होता तर खालच्या मजल्यावरील बिर्‍हाडांत अनेक भाडेकरु होते.

त्यागासारखं ढोंग नाही

लेखक वडापाव यांनी बुधवार, 19/11/2014 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 18/11/2014 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्‍या क्रमांकाचा! शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला. शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;) चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत.