Skip to main content

नातं - भाग २

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 21/11/2014 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
नातं - भाग २ प्रत्येक व्यक्तिची साधारणतः किंवा प्रामुख्याने चार प्रकारची आयुष्यं असतात. वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक आयुष्य. या चार निरनिराळ्या आयुष्यातील प्रत्येक नातं म्हणजेच चार वेगवेगळ्या प्रकारची नाती. वैयक्तिक नातं, कौटुंबिक नातं, सामाजिक नातं आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक नातं. या प्रत्येक नात्यामध्ये एक ठरावीक भूमिका प्रत्येक व्यक्ती बजावत/निभावत असतो. पण जर त्या भूमिकांची सरमिसळ झाली तर काय होतं ते या कथेतून समोर येतं.

बिड्या मारायला, तंबाखू मळायला निवांत टपरी

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी शुक्रवार, 21/11/2014 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून दचकू नका. मी माझ्या प्रोजेक्ट साठी एक विषय घेतला आहे. Barriers to intention to quit tobacco among adult tobacco users. आता यासाठी किती जणांना विचारू ना की तुम्ही सेवन करता का म्हणून...म्हणून मीच टपर्यांवर जाणार आहे. आपण पीत असलो काय नसलो काय, चांगल्या निवांत टपऱ्या नक्की माहित असू शकतात, खास अड्डे असू शकतात. ४०० लोकांचा इंटरव्यू मला घ्यायचा आहे. सर्वांची माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाईल, अन माझ्या रिसर्च साठी त्याचा उपयोग केला जाईल. Intenet based survey हे भारतात तरी सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ ठरतात.

बलबन का मकबरा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 21/11/2014 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्‍याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या! दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत.

गांधारेश्वर

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 21/11/2014 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
चिपळूणला गांधरेश्वर नावाच शंकराच देउळ आहे.मूळ शहरापासून जरा बाजूलाच आहे.वाशिष्ठी नदीकिनारी हे वसलय.माझ एक आवडत देउळ.खर तर देउळ साधास आणि छान आहे.पण त्याभोवतीचा परिसर जास्त रम्य आहे. शंकरच देउळ असल्याने सहाजिकच सोमवारी इथे जरा गर्दी असायची आणि श्रावण सोमवार असेल तर जास्तच.नदीकिनारी असल्याने नदीत उतरायला छोटासा घाट आहे.७/८ पायरया असतील जांभया दगडाच्या.तिथून मस्त नदीच रुंद अस पात्र दिसत.पायरया उतरुन नदीत पाय धुवायचे आणि मग देवाच्या दर्शनाला जायच अस आमच ठरलेल असे.देवळात गेल की आधी छान मांडव आणि मग समोर आधी नंदी आहे.त्याला नमस्कार करून पुढ ४ पायरया उतरुन मग गाभारा आहे.आत शंकराची कळिभोर

घटकाभरचं झुरणं..

लेखक Targat Porga यांनी गुरुवार, 20/11/2014 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम! हा शब्द तुम्ही फक्त ऐकलेला,वाचलेला असतो.त्या बाबतीत तुम्ही जास्त विचारही केलेला नसतो ती केवळ एक रम्य कल्पनाच आहे अशीच तुमची समजूत असते.ह्या गोष्टीची तुम्हालाही अनुभूती मिळावी ही कल्पना तुम्हाला कधी कधी शिवून जाते पण तुम्ही मात्र 'श्या !आपलं काम नाही हे प्रेम बीम ' अस मनातच म्हणून ती कल्पना करणं सोडून देतात.त्याचे फक्त वाईटच परिणाम असतात असं म्हणून तुम्ही स्वतःला समजावतात.

सीट

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 20/11/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून) खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार इवलसं दुःख पिउन टाक बघ माझी आठवण येते का? रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे, पदर सांभाळ, हात दाखव इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, नजरेच्या अगणित सुया टोचून घे चालत रहा टॅक्सी मिळेपर्यंत, ती मिळणार नाहीच, ऑफिसला ये केस सेट करु नकोस, घाम पुसू नकोस, पुन्हा त्याच गॅलरीत ये आता तो तारेवर बसलेला कावळा बघ बघ माझी आठव

मामाचे गाव - (भरत)

लेखक दशानन यांनी गुरुवार, 20/11/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग मळ्यावर असले की ही शेतं ती शेतं अशीच भटकंती सुरु असायची, मळ्यात मोजून १५-१६ घरं. त्यात एक भरतचे घर, भरतला आई-बाबा नव्हते, तो आज्जी-आजोबा सोबत रहात असे, आम्ही त्याला भरत जरी नावाने हाक मारत असू तरी तो आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. मोठी माणसं नेहमी त्याच्याकडे बघून चूकचुकायची पण का? हे आम्हाला कळत नसे, पण भरत सोबत खेळायला आम्हां लहानांना खूप आवडायचे कारण एवढं मोठ्या वयाचे त्यावेळी कोणी आमच्या सोबत खेळतच नसायचे, पण भरत खेळायचा, अगदी लपाछपीपासून ते कवड्यांचा सारीपाट पण.

जडण-घडण 14

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 20/11/2014 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशवाणीच्या वृत्तकक्षात मी छान रमले होते. विद्यार्थी कधीतरी शंका विचारायला यायचे, शुभेच्छापत्रांसाठी कॉपी रायटिंगही सुरू होतं. घरात बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. घरातलं पहिलं कार्य. सगळेच उत्साहात होते. ठरल्याप्रमाणे सगळं छान पार पडलं आणि ती आपल्या नव्या घरी रूळली. आमच्या घरी आम्ही अवघे पाच जण. आई-बाबा आणि आम्ही तीन भावंडं. त्यामुळे ताई लग्न करून गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिचं नसणं खूप प्रकर्षाने जाणवत राहिलं. घरात आम्हा भावंडांमध्ये कॉलेजमध्ये जाणारी ताई पहिली. त्यातून ती कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून अर्धवेळ नोकरी करायची. तिच्याकडे तिच्या रोजच्या अनुभवांचा खजिना असायचा.

डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 20/11/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षण या खूप चघळून झालेल्या विषयावर खूप जणांनी वाचल, लिहिल आहेच. हेमु कर्णिक नावाच्या ब्लॉग धारकाने हे आरक्षण म्हणजे राज्यकर्यांच्या गेल्या साठ वर्षातील अपयशाची कबूली नाही का असा जरासा वेगळा प्रश्न त्यांच्या अनुदिनीतून विचारलेला दिसला. त्यांच्या ब्लॉग मध्ये खूप काही विश्लेषणात्मक आहे अस नाही पण सर्वांच्याच आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा राहतो. आरक्षण विषयक बहुतांश विश्लेषणातून काही मुद्दे सुटलेले आढळतात त्यांची दखल घेणे आणि डॉ.