Skip to main content

व्हय ओ भैय्या

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 26/11/2014 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
“व्हय ओ भैय्या, त्या अक्षयच्या लेकराचे नाक कसलं सरळ आसंल ओ” “गोर्या ते टेबल बघ रे आधी सात नंबरचं, आणि कोण बे अक्षय?” “ओ भय्या आताच कट केलाव की सात नंबर. गेलं पण गिराइक.” “बर बर, अक्श्या कोण रे, ते जाधवाचं का?” “नाय ओ, आपला अक्षयकुमार पिच्चरमदला. तेच्या बायकोचबी नाक कसलं सरळ हाय. ह्यो बी लैच स्मार्ट आन नाकेला हाय तवा लेकरू कसलं आसंल आं?” “तुला काय करायचंय बे, का तुझी पोरगी देणारेस का त्याला?” “ह्याह्याह्या आपला अजून लग्नाचा पत्ता नाय, पण उगा माहिती असलेली बरी” “मग इज्जतीत काम कर, नायतर अक्षयकुमारकडे तुझा पगार माग आता.” गोरख बिचारा टीव्हीकडे बघत बघत एका रिकाम्या टेबलावर टेकतो.

Our Undoing ,शेवटचा दिवस.

लेखक Targat Porga यांनी बुधवार, 26/11/2014 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
'शॉर्ट फिल्मच्या'शूटिंगचा शेवटचा दिवस..., नेब्याने (दिग्दर्शक) सर्वांना संध्याकाळी ७:३० पर्यंत शाम्याच्या घरी(शुटींग च ठीकाण) हजर राहण्याची आधीच ताकीद दिली होती. त्या नेमाने मी ७:१५ लाच शाम्याच्या घरी धडकलो. खरेतर शाम्या आणि कंपनी नेब्याच्या घरी सुट्याची वाट पाहत बसलेले होते. तिकडून ते सर्व लोक मिळून शाम्याच्या घरी येणार होते. मी(स्क्रीनप्ले रायटर) एकटाच माझ्या गाडीवर बुड टेकवून शांतपणे शाम्याच्या घराबाहेर कानात हेडफोन टोचून सगळ्यांची वाट पाहत उभा होतो. खरेतर हा शांतपणा थोडाच वेळ टिकाव धरून राहिला. त्याची जागा एव्हाना प्रचंड राग आणि व्देषाने घेतली. कारण,अर्थातच सुट्या!

२६/११

लेखक _मनश्री_ यांनी बुधवार, 26/11/2014 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
1 2 3 आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला झालेल्या घटनेस सहा वर्षे पूर्ण झाली , या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व शहीद जवान ,पोलिस आणि निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली

पण आपल्या दृष्टीचं काय ?

लेखक आतिवास यांनी बुधवार, 26/11/2014 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपापल्या परीने, पध्दतीने काम करणा-या कार्यकर्त्यांची ती बैठक होती. स्त्री प्रश्नांबाबत, कामांबाबत, त्यामध्ये येणा-या अडचणींबाबत आणि विकासाच्या वाटचालीबाबत या सर्व कार्यकर्त्यांची आपापसात चर्चा घडवून आणावी असा संयोजकांचा हेतू होता. सुखद आश्चर्याची बाब अशी की, स्त्री प्रश्नांबाबत संवेदनशील असणारे मोजके का होईना, पण पुरुष कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते. विविध राज्यांमधली स्त्रियांची परिस्थिती ऐकली, की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यातही विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरांत जगण्याची संधी आपल्याला मिळाली, हे स्वतःचं परमभाग्यच वाटायला लागतं!

बदक आले हो अंगणी..

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 26/11/2014 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
इस्पिक एक्कांकडचे पाहुणे पाहून आमच्याकडे खूप पूर्वी आलेल्या पाहुण्यांची फार आठवण आली. म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख येथे पोस्ट करत आहे- मार्च सरत आला की वसंताची चाहूल लागते. कोवळी, लालसर, लुसलुशीत इवली पालवी फुटू लागते, ट्युलिप्सच्या अस्फुट कळ्या दिसू लागतात, चिमुरडी रंगीत गवतफुले डोलू लागतात, मॅग्नोलियाच्या फिक्या गुलाबी कळ्यांनी फांदीन् फांदी सजते. हिवाळ्यात गारठून, गुरफटून झोपलेली झाडेझुडुपेही आळस झटकून उठतात, एवढंच नव्हे तर सूर्यदेवही करड्या ढगांच्या जाड दुलईतून बाहेर येतात.

गुढ (एक रहस्य कथा-भाग 3)

लेखक चेतन677 यांनी बुधवार, 26/11/2014 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
आता शिवमदेखिल स्वरासोबत त्यांच्या टीम मधला एक मेंबर होता. " मस्त हॉट आहे ना स्वरांजली...." या आवाजाकडे शिवमचे लक्ष गेले. "Excuse me???" शिवम. तोच समोरुन एक तरुण त्याच्याकडे येत होता.त्याचे डोळे लाल झाले होते.बहुतेक तो रोज निदान एकतरी बियर घेत असेल यात अजिबात शंका नव्ह्ती.आणि कदाचित कालची त्याची अजुन उतरली नव्हती. "प्लीज तुम्ही जरा नीट बोला.." शिवम जरा मोठ्यानेच म्हणाला. तोच एक तरुणी शिवमच्या कानात कुजबुजली. "तो संदीप आहे.आपला टीम लीडर...जरा सांभाळुन नाहीतर बॉस कडे तक्रार करेल तो तुझी." "का?

कधी तू..... (वाहनवेड्याचं व्हर्जन)

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/11/2014 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
बहुगुणी यांच्या मायामी बीच ऑटो शो या धाग्यातील फोटो बराच काळ डोळ्यासमोर पिंगा घालत राहिले. वाहनवेड्यासाठी वाहन काय असतं हे वेगळं सांगायला नको. तीच दारू असते, तेच प्रेम असतं, तोच जोश असतो, तेच समाधान असतं. त्याच वरून प्रेरणा घेत सुचलेलं हे विडंबनकाव्य. मूळ गाणं : कधी तू.... चित्रपट : मुंबई पुणे मुंबई कधी तू.... स्टियरिंगवर बसण्याच्या क्षणात कधी तू.... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात कधी तू.... रस्ता एक स्ट्रेट, आपलं जणु जेट स्पीडोमीटर वर एकशेसाठ टर्न अप द स्टिरियो, रोल डाउन द विंडो वेगाची मस्ती चाखण्यात कधी तू...
काव्यरस

सेंसॉरशीप विषयी अवतरणे , अनुवाद आणि सुयोग्य मराठी शब्द इत्यादी

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/11/2014 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिक्वोट या अवतरण/ (सु)वचन प्रकल्पातील सेंसॉरशीप विषयासंबंधी लेख अद्ययावत करण्याच्या दृष्टीने १) सेंसॉरशीपसाठी सुयोग्य मराठी शब्द परिनिरीक्षण, अभ्यवेक्षण कि मराठी भाषेने सेंसॉरशीप शब्द स्विकारला आहे आणि म्हणून लेख शीर्षक सेंसॉरशीप असणेच बरे असेल. २) खालील वाक्यांचे मराठी अनुवाद हवेत.

छावणी - ६

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 26/11/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरानवाला इथल्या छावणीतील निर्वासितांमध्ये आता हिंदुस्तानात जाण्याच्या उमेदीने चैतन्यं आलं होतं. हिंदुस्तानात पोहोचल्यावर पुढे काय हा प्रश्न सर्वांपुढे आSS वासून उभा राहणार होता! छावणीत आलेला प्रत्येकजण आपलं घरदार, नोकरी किंवा व्यवसाय पाकीस्तानात सोडून कायमचा हिंदुस्तानात जाण्यासाठी निघणार होता. प्रत्येकाला पुनश्च हरी ॐ म्हणूनच पुन्हा सुरवात करावी लागणार होती. परंतु हिंदुस्तानात पोहोचल्यावर निदान जीवाची सुरक्षीतता तरी लाभणार होती! कोणत्याही क्षणी एखादा धर्मांध माथेफिरू आपल्यावर चाल करुन येईल आणि आपला जीव घेईल ही तरी भीती नव्हती. मेजर चौहाननी या जथ्याची दहा तुकड्यांमध्ये विभागणी केली होती.

म्हणींचे अर्थ आणि वाक्यात उपयोगाची उदाहरणे हवीत

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/11/2014 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी विकिक्वोट्स नावाचा एक मराठी विकिपीडियाचा एक बंधू प्रकल्प आहे. ज्यात एखाद्या विषयास धरून अथवा व्यक्तींची (सु)वचने आणि अवतरणे नोंदवण्याची सोय आहे. मराठी विकिक्वोट्स प्रकल्प अद्याप खूप परिचीत झाला नसला तरीही त्यातील म्हणी आणि वाकप्रचारांवर आंतरजालावरील मराठी लोक संग्रह करत असतात असे दिसते. विकिक्वोसवरील लेख विकिसाच्या दृष्टीने मराठी म्हणींचे अर्थ वाक्यात उपयोगाच्या उदाहरणांसहीत हवे आहेत.