Skip to main content

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 10/02/2015 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर अजुन बरोब्बर ५ दिवसांनी, रविवार, १५ फेब्रुवारी २०१५ रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासुन बघा, २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे.

५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 10/02/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अ‍ॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे) प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो.

ये कहाणी थी दियेकी और तुफानकी

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 10/02/2015 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुम्हापैकी काही लोकांना आठवत असेल, कि ८ वी किंवा ९ वी मध्ये इंग्रजीच्या पुस्तकात बायबलमधील ऐक कथा धडा म्हणून होती, 'डेविड आणी गोलायथ' असा, अश्याच काहिश्या आधुनिक कथेचा मी आज इंटरनेटद्वारे अनुभव घेत आहे. अस म्हणतात, जेव्हा इस्रायेलचा राजा सॉल आणि फिलीस्तिनी सैन्य लढाईमधे एकमेका समोर उभे ठाकले होते, जेव्हा फिलीस्तिनी योद्धा गोलायथ, जो की जवळ जवळ ९ हात उंच, व बराच धिप्पाड, मजबूत चिलखताने मढलेला, मैदानात पाहून, इस्रायेली सैन्यातले बहुसंख्य भीतीने चळाचळा कापू लागले, त्यांची लढ्याची उर्मी कमी होऊ लागली. अश्या परिस्थितीत ऐक तरुण पुढे आला, तो होता डेविड.

केजरीवाल / राज ठाकरे

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 10/02/2015 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम आदमी पक्षाला टोलेजंग बहुमत मिळाले आहे. त्यांची लढाई अक्षरशः दिया और तुफान की लडाई होती. तरीही त्यानी नेत्रदीपक यश मिळवले. कदाचित त्यांचेकडे नक्की काय करायचे आहे याचे प्लॅनिंग होते. भाजपचा पूर्ण नि:पात झाला. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सुद्धा निवडणूक हरला. याची कारणे काय याची चर्चा होईल. मात्र हा धागा काढलाय तो केजरीवालांच्या या विजयातुन महाराष्ट्रात मनसे या पक्षाला बरेच काही शिकण्यासारखे आहे. पुढेमागे राज ठाकरे बाउन्स ब्याक करुन भरघोस यश नक्की मिळवतील. पण सध्यातरी मनसे ची अवस्था फार काही बोलावे अशी नाही.

राँग नंबर - भाग ४

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/02/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : मागील कथानक “हम्म….! पुढे मागे जर मा. राष्ट्रपतींनी परवानगी दिलीच तर मी तुला त्याअ शस्त्राबद्दल सांगेनही ब्रिगेडीयर. पण त्या आधी ती चिप परत मिळवणे किंवा नष्ट करणे हे आपले पहीले काम आहे. त्यासाठी तरी निदाम पख्तुनीपुढे गळाला लावलेले आमिश बनून उभे राहणे मला गरजेचे आहे मित्रा. आय एम सॉरी बट यु हॅव टू अरेंज दॅट समहाऊ.

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 10/02/2015 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील. पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे. कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले. शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत. मी पण तीच लोकल पकडणार आहे. माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही. कळावे, आपलाच मुवि.

रिबटेबल प्रिझंप्शन

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 09/02/2015 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला. "हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही." तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे. "याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला. "तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं. आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी.

एक इंटर्व्ह्युचा दिवस

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 09/02/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती.

क. सांगता येत नाही

लेखक जातवेद यांनी सोमवार, 09/02/2015 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
असो. आता या पुलाखालचं नुस्तं पाणिच काय अख्खा पुल वाहून गेल्यात जमा झाला आहे कदाचित कोरड्या प्रवाहामुळेपण पुल पडत असतो अशा ह्या विचित्रपणाचा मी पहिल्यांदाच अनुभव घेतलाय म्हणलं ठिकाय, आपण आता नविन पुल बांधुया ठरलं तर. पण नविन पुल बांधायचा कुठे जुन्या पुलाचा पाया तर काढता येत नाही तसही इथे पाणि कुठाय?