Skip to main content

रॉँग नंबर--२

लेखक भागो यांनी मंगळवार, 06/06/2023 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
चहा पिऊन ताजा तवाना होतोय तेव्हढ्यात फोन आला. “हॅलो अमुक. मी तुझ्यावर भयंकर रागावले आहे. का आला नाहीस? किती वाट पाहायला लावायची?” आवाजावरून तरी कोमल-१ वाटत होती. “कोमल एक तर तू फ्रॉड आहेस किंवा मी म्याड आहे.” मी माझ्या आवाजावर नियंत्रण ठेवत बोललो. “अर्थात तू म्याड आहेस. ते राहू दे. आज तुला हा साक्षात्कार व्हायचे काही खास कारण?” ती खोडकरपणाने बोलली. “प्लीज, तुझा हा फाजीलपणा बंद कर.” मी जवळजवळ ओरडलो, “माझ्या कोमल भावनांशी निर्दयपणे खेळणाऱ्या स्त्रिये, कान खोलके सुनो. मी तुला भेटण्यासाठी पळत पळत पाचव्या मजल्यावर गेलो होतो.

रॉँग नंबर --१

लेखक भागो यांनी मंगळवार, 06/06/2023 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
‘What we think is impossible happens all the time.’ ५ डिसेंबर २०१६. ‘What we think is impossible happens all the time.’ मी अमुक अमुक. वय वर्षे अठ्ठावीस. लग्न? नाही केलेले अजून. केव्हा करेन? करेन कि नाही? का? तशी कोणी भेटली नाहीये अजून. भेटावी अशी इच्छा आहे. आणि भेटली. शिक्षण. सी ए. स्वतःचा बिझिनेस आहे. तुम्हाला “आरखेडीया” ही पंचाहत्तरी मजल्यांची बिल्डिंग माहित आहे? तीच ती सेन्ट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट मधली. त्या बिल्डिंगच्या बाविसाव्या मजल्यावर माझे ऑफिस आहे. मी माझ्या बळावर हे उभारले आहे. मला याचा अभिमान आहे. ऑफिस स्पेस सध्या भाड्याची आहे. विकत घ्यायची तयारी करतो आहे.

'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 05/06/2023 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!

साधारण अडीच वर्षांपूर्वी मिपावर चार भागांत लिहिलेल्या "दुबई : मरूभूमितले नंदनवन" ह्या प्रवास वर्णनाच्या पहिल्या भागात दुबईतल्या एका सुपर मार्केट मध्ये, तो पर्यंत ऐकून-वाचून माहिती असलेला 'चायनीज सेक्स डॉल' हा प्रका

ग्रॅण्ड शो

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 05/06/2023 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
नवं शैक्षणिक वर्षं उजाडलं, आम्ही नोटीस बोर्डासमोर जमलो. बघतो तर लोचा! आम्हाला दिलेला वर्ग साक्षात जुन्या इमारतीत आणि नवे विद्यार्थी (नी) मात्र नव्या इमारतीत. ही फाळणी कुणालाच मंजूर नव्हती. काही लडीवाळ शब्दांची देवाण घेवाण झाली आणि सर्वांची पाऊले हॉलिवुड कडे वळली. हॉलिवुड म्हणजे आमच्या कॉलेजची मागची बाजू. मोठा नयनरम्य परिसर. ईमारतीच्या भिंतीलगत हिरवळ आणि काही शोभिवंत झाडं. अशोक, गुलमोहर आणि नारळाचे उंच वृक्ष. दुसर्‍या म्हणजे खाडीलगतच्या बाजूला सलग बांबूची बेटं. मधे पायवाट. टोकाला खाडी, डावीकडे वळलं की आमच्या नव्या इमारतीला वळसा घालून कला, वाणिज्य च्या इमारती आणि पुढे कँटीन.

एका नोटेची छोटी गोष्ट…

लेखक नीळा यांनी शनिवार, 03/06/2023 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
एका नोटेची छोटी गोष्ट….. एक पाचशेची नोट बरेच दिवस पाकिटातहोती. कुठून आली माहित नाही. अजिबात फाटली नव्हती पण बहुतेक धुतली गेल्यामुळे पुसट झाली होती बऱ्याच ठिकाणी चालवायचा प्रयत्न केला पण कोणी घेतच नव्हता बँकेच्या डिपॉझिट मशीन मध्ये देखील भरायचा प्रयत्न केला पण तीथेही रिजेक्ट झाली.. मग शेवटी ज्या राष्ट्रीयकृत बँकेत माझे खाते आहे तीथे गेलो. आधी शीस्तीत रांगेतून जाऊन कशिअर कडे नोट बदलून मागीतली…त्याने नकार दिला. मग त्याला म्हंटले माझ्या खात्यात जमा कर…तर ही नोट चालणार नाही….घाटकोपर ला जाऊन बदला असा सल्ला मीळाला.

'अज्ञात पानिपत'

लेखक मनो यांनी शुक्रवार, 02/06/2023 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मर्वेन टेकनोलॉजीज् यांच्याद्वारे प्रकाशित 'अज्ञात पानिपत' या माझ्या आगामी मराठी पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झाली आहे. या पुस्तकाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या पुस्तकाचे स्वरूप काय, ते कोणाला उपयुक्त ठरेल याविषयी थोडक्यात पुस्तक-परिचय इथे करून देतो आहे. मराठे आणि गिलचे यांमधील पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दलची नवीन आणि आजवर अज्ञात अशी माहिती देणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. पुस्तकाची पहिली ३५० पाने केवळ या उद्दिष्टाला वाहिलेली आहेत.

भारताबाहेरचा भारत -अंदमान १

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 02/06/2023 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी गेले १.५-२ वर्षे घरात बसून पकलो असल्याने एखादी मोठी सहल करायचा मोह होत होता. आणि समुद्र हा नेहमीच आवडीचा विषय असल्याने बहुधा ३-४ दिवस कुठेतरी समुद्राकाठीच जायचे डोक्यात घोळत होते. त्यामुळे सुरुवात अलिबाग पासून होऊन, कोकण,गोवा,कोस्टल कर्नाटक करत करत चर्चा अंदमानला जाऊन पोचली. मालदिव्ह्स आणि सेशेल्स ५.५ ते ६ रुपयाला पडत होते आणि श्रीलंका ५० पैसे असले तरी आधीच झाले होते. शिवाय आत्ता तिथे परिस्थिती वाईट आहे.अंदमान भारतातच असल्याने करन्सी रेशो बघायची गरज नव्हती. दुसरे म्हणजे जालावर शोध घेतला असता चेन्नई आणि कोलकाताहून तिकडे थेट विमानसेवा उपलब्ध होती .

बस्स! फक्त एवढंच कर...

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 01/06/2023 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस कसाबसा निघून जाईल कातरवेळ मात्र अंगावर येईल तू फक्त माझी सय काढू नको "ती" आली तशी संपून ही जाईल मग काही अबोल-अनाथ स्वप्ने वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील त्यांना अजिबात थारा देऊ नकोस डोळे अगदी घट्ट मिटून घे हात बाहेर न काढता आतूनच निग्रहाने "ती" खिडकी बंद कर मग मऊ केस झटकून जरासे कुरळ्या बटांना मोकळं कर सुकलेले ओठ घट्ट करून पाठीला उशी लावून स्वस्थ बस पुर दाटून आलाचं पापण्यांमध्ये तर त्याला तिथेचं थोपवून ठेव अन् माझा चेहरा आठवलाचं तर चुकूनसुद्धा झरू नकोस मी "हरवून" गेलोय कधींचं मला पुन्हा शोधत बसू नकोस तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला
काव्यरस

प्रॉफेट : खलील जिब्रान : पुस्तक परिचय

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 30/05/2023 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रॉफेटः खलील जिब्रान.. प्रॉफेट हे अगदी छोटेखानी पुस्तक . त्यातल्या भाषेने अगोदर लक्ष्य वेधून घेतले. आणि मजकुराने वेड लावले. पुस्तक कधी वाचले हे आता लक्ष्यात नाही. पण रजनीशांची प्रवचने ऐकताना त्याचा उल्लेख बरेचदा होतो. प्रॉफेट हे पुस्तक प्रकाशित झाल्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील १०० पेक्षाही जास्त भाषांमधे या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. ( बोरकरांनी याचा कोकणी मधे अनुवाद केला आहे) खलील जिब्रान हा मूळचा लेबनान मधला. कुटुंबा समवेत तो अमेरीकेत आला.

मोठेपणा.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 30/05/2023 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला जाता जाता रवीने,कांचन ठेवा सांडला काही डोळ्यांनी टिपला,काही नदीने लुटला डोळ्याच्या कडांनी,मनाच्या तळी तो पोचला नदीने मात्र, मुक्तहस्ते नभाला देऊनी टाकला श्यामश्वेत मेघांनी,तो गिरी कंदरी वाटला चाखला डोलणाऱ्या बकांनी,ठाव सोनेरी जाहला पच्छीमेच्या मंद वाऱ्यांनी, त्यातला,थोडा किनारी आणला मोठेपणा नदीचा पाहूनी जीव माझा भारावला.