उन्हाळी सुट्टीमधल्या सहली
उन्हाळा हा फिरण्यासाठी फारसा योग्य सीझन नाही त्यामुळे सहलीच्या ठिकाणांचे पर्याय कमी असतात पण शालेय सुट्ट्या या वेळेस असल्याने ट्रिपचे नियोजन करायचे आहे.
सहकुटुंब फिरता येतील . गाडीने जाउन ४ दिवसात ट्रिप करायची आहे कारण ऐन वेळेस ट्रेन बुकिंग मिळत नाहीत.
अशा पर्यटन स्थळांची माहिती ( हॉटेल, पाँईटस, प्रवास , इतर) हवी आहे .
मी शोधलेली काही ठिकाणे
१. सापुतारा : पुण्याहून ३५० किमी असणारे हे गुजरात मधले थंड हवेचे ठिकाण आहे. हस्तकला प्रदर्शन, तलाव , बोटींग, रोप वे, सुर्यास्त पाँइट ही आर्कषणे आहेत. येताना वणीची सप्तश्रृंगी देवी बघता येते.
मिसळपाव
जीवावर उदार होऊन अनेक संकटांना तोंड देत समुद्रसफरीवर निघालेल्या सिंदबादच्या सुरस कथा आपण बालपणी वाचल्या व ऐकल्या असतील. जीव घेणा नसला तरी असाच अदभूत घटनाक्रमात घडत गेलेला प्रत्यक्ष शोध प्रवास आपल्यासाठी सादर.
नेपाळमधील काठमांडू विमानतळावर उतरल्यावर जायचे कुठे व भेटायचे कुणाला अशा साध्या प्रश्नांचे उत्तर ठाऊक नसलेल्या प्रवासात मी, जळगावचा नाडीग्रंथ प्रेमी - विवेक चौधरी, ओक सरांच्या सोबत या यात्रेला निघालो.