अनमोल ते सारे

काव्यरस
भागो जनता भागो
हल्ली म्हणजे गेले ५-६ महिने मला "मॅरॅथॉन" चं वेड लागले आहे...अर्थात हे वेड चांगलेच आहे म्हणा.. तसा मी जॉगिन्ग ला अनेक वर्ष जातो पण प्रत्यक्ष मॅरॅथॉन मधे भाग घ्यायचा योग आला नव्ह्ता. किंबहुना मी सेरियसली त्याकडे बघितलेच नव्हते. मुम्बई मधे स्टॅन्डर्ड चार्टर्ड मॅरॅथॉन गेले कही वर्ष होत आहे. तसेच इतरही दर महिन्यात कुठे ना कुठे तरी मॅरॅथॉन आयोजित केली जाते.
धावण्यात फार आनंद आहे. स्वत:शीच स्पर्धा लावण्यात मजा येते. गेल्या वेळचा रेकोर्ड पुढिल वेळी मोड्णे हेच एक ध्येय घेऊन धावायचे. अनेक ५०-६०+ वयोगटातील लोकही हिरिरीने या शर्यतीत भाग घेत असतात. त्यांना धावताना बघून थक्क व्हायला होते.
वकिल
एम.आय.डी.सी ला असताना एक चपळगावकर नावाचा मित्र होता ..
पेशाने वकिल पण वकिली चालली नाहि म्हणुन जोब भादरायच काम करायचा एका लहानश्या शेड मधे......
.
गप्पात एकदा त्याने सांगीतले...आपल्या कडे आपला कायदा नाहि.सायबाचा कायदा आपण उधार घेतला व त्याला " ईंडियन पिनल कोड" असे नाव देत तो आपण वापरत आहोत..
सायबान कायदा लिहिताना भारतिय माणुस मुळात चोर मनोवृत्तिचा आहे असे गृहित धरुन कायदा लिहिला आहे....
.
कश्या वरुन? असे विचारतात त्याने उदाहरण दिले.....
.
रेल्वेत इमरजंसी च्या वेळी चेन खेचण्याची सोय असते ज्या मुळे गाडी थांबते....
स्वस्तिक
खुप वर्षापुर्विची नव्हे तर अगदी अलिकडची गोष्ट आहे.रम्य पहाटेची वेळ. मंद गार वारा वाहतो आहे आणि अशावेळी काहीच घडत नाही. सर्व गोष्टींची सुरवात रम्य पहाटेने व्हावी असे काही नाही.असो.
रात्र्ी मित्र्ांसोबत[फक्त मित्रच हं] फिरताना नेहमीप्रमाणे अचानक मोबाईल वाजला.फोन अक्षयचा. "स्वस्तिकला बघितल का बे?" " नाय बा काय झाला?" "अरे ते येड्याxx कालपासुन गायब आहे." माझ्या पायाखालची वाळुच काय दगड माती सगळच सरकलं.
" घरच्यांशी भांडुन गेला तो आलाच नाही अजुन. आत्ता फोन केलो तेव्हा कळालं." " मग आता?" " ए मंद बुद्धी सुंद काम निघ आणि माझ्या घरी ये."
गाडीवरुन लगेच निघालो.
सफर तामिळनाडुची !- कोइंबतोर आणि टॉय ट्रेन (भाग ४)
भाग १ - प्रस्तावना
भाग २ - रामेश्वरम आणि धनुषकोडी
सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३)
खरं सांगु का.. कोइंबतोर विषयी मला काहीच माहिती नाही! आम्ही इथे दोनच कारणांसाठी गेलो, एक तर दिर कुठे रहातो, काय काम करतो वगैरे पहायला आणि दोन म्हणजे साड्या! दिराची रुमच मुळात कोइंबतोरच्या बाजारपेठेत असल्याने काही फिरायचा योगही नाही आला. सकाळी उठलो, दणकट सौदेंडियन नाश्ता केला आणि दुकानांमध्ये घुसलो!
श्रीमंत: शतशब्दकथा
आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्या आईची आठवण झाली.
भाव तेथे देव (असं म्हणतात खरं!!)
मनुष्यास्वभावाला औषध नाही हे सर्वविदीत आहे. जगाकडे पहाण्याचा दॄष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तसेच आयुष्याकडून कुणाला काय अपेक्षा असतील हे सांगणे कठीण आहे. कोणत्याही दोन व्यक्ती घ्या, वर नमूद केलेल्या बाबतीत फरक हा आढळणारच. कुणाच्या खांद्यावर काय ओझे असेल याचा अंदाज येत नाही. वरवर सामान्य वाटणारे हे स्वभावविशेष किती टोकाचा परिणाम घडवून आणू शकतात, हे दाखवून देणारा हा एक माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला अप्रिय प्रसंग आहे.
जे झाले ते आनंददायक मुळीच नव्हते. तो कटु प्रकार संपूर्णपणे टाळता येण्याजोगा होता. जवळची माणसे त्यात गुंतली असल्यामुळे जास्त वेदना झाल्या.
वेगळ्याचं वेगळं नशीब
ही पुस्तकं एक अजब गोष्ट आहे. मानवाच्या सर्व संभाषिक प्रकारांमधला सर्वात जास्त "हेकेखोर" प्रकार आहे हा … खरंच !!! माझे विचार, माझ्या संवेदना, माझा न्याय आणि माझाच निवाडा… माझ्या भिंगांमधूनच जग पहा … नाही आवडलं तर वेळीच प्रतिक्रिया द्यायची सोय नाही … पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय तर शक्यच नाही … लेखकाला सगळं छापून आल्यावर मग प्रतिक्रियांची पत्र , इमेल पाठवून काय उपयोग?
भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड
भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड
लोणावळ्यापासून विसेक किलोमीटरवर असलेल्या सालतर खिंडीच्या पलीकडे आहे एक अद्भुत विश्व. किल्ले घनगड, एखाद्या टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटप्रमाणे भासणाऱ्या तैलबैलच्या कातळ भिंती, या भिंतींच सौंदर्य निरखत तिच्याच पायाखाली विसावलेला सुधागड, निळेशार पाणी असलेला मुळशी धरणाचा जलाशय, भांबर्डे गावातील नवरा, नवरी आणि वऱ्हाड सुळके आणि त्यांना चोहोबाजूने आपल्या कवेत घेऊ पाहणारे उंचच उंच कडे, हा परिसर पाहताना अक्षरशः डोळयांच पारणं फिटते.
मिसळपाव