[शतशब्दकथा स्पर्धा] "सृजनचौर्य"
साल १९७०. पाक्षिक कार्यालय.
“तुझी कथा एकदम भंगार आहे. तू दहा वेळा बदल केलास तरी त्यात जीव येत नाही!” संतापलेले संपादक माधव अनुबंधला म्हणाले.
त्याच्या डोळ्यातून मागच्या वेळेपेक्षाही जास्त दु:खाने जडावलेला अश्रू तरळला.
“पुन्हा येऊ नकोस. तू लेखन बंदच केलेले बरे!”
त्यांनी कथा न फाडता कचरापेटीत भिरकावली.
“माझे ऐका. ही कथा वाचकांना नक्की आवडेल!” अनुबंध रडत म्हणाला.
“मी दहा वेळा तुला येऊ दिले. दुसऱ्या कुणी तुला तिसऱ्या वेळाच हाकलून लावले असते. निघा आता!”
भोळ्या अनुबंधने लेखनविचार सोडला.
शतशब्दकथा स्पर्धेच्या निमित्ताने
स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेचा सिक्वलही लिहायचा आहे हे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली त्यासाठी धागा काढतोय. आदूबाळच्या धाग्यावरही ते सांगता आलं असतं. पण हा मुद्दा त्या धाग्यावरील इतर प्रतिसादांपुढे वाचला गेला नाही तर स्पर्धकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून नवा धागा. पुरेशा लोकांनी वाचल्यावर हा धागा उडवला तरी चालेल. आत्ता उडवला तरी चालेल.
तर...
वाचकांना ही विनंती आहे की...
कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या संबंधीचे तुमचे अंदाज कॄपा करून धाग्यावर टाकू नका.
धन्यवाद.
सरदारी बेगम -एक संगीतिक सुन्न अनुभव
सरदारी बेगम
बंगलोर मधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझा मित्र , सतीश , राहत आहे. काल त्याला भेटायला गेलो होतो. बंगलोरचे भयाण ट्राफिकमुळे दोन तास लागले. सतीशला बराच वेळ रिसेप्शनमध्ये ताटकळत बसावे लागले. वर्षभराने भेटत होतो त्यामुळे गप्पा लगेच रंगल्या. आमच्या अनेक आवडीनिवडी समान आहेत आणि म्हणून मैत्री २० वर्षे टिकून आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा मात्र त्याच्या (कु)चेष्टेचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंद संगीत सुरु होते. गिटार , सतार आणि तबला ह्यांचे फ्युजन ( बहुतेक प्रेम जोसुआचे) ऐकत त्याने आपल्या भारतीय संगीताची ( खरेतर माझी ) मापे काढायला सुरवात केली.
माझे व्यायामाचे फंडे -१ ,
शरीर माध्यम खलु धर्म साधनम ! असे एक संस्कृत मधील सुभाषित आहे. माणसाचे शरीर उत्तम आसेल तर ,त्याचे भवितव्य ही उज्वल असते य़ा वरील उक्ती प्रमाणे ,रोज थोडातरी व्यायाम करावा आसे मी रोज ठरवतो . रात्री झोपताना नित्यनियमाने गजर लावणे ,सर्व कपडे ,बूट याची योग्य व्यवस्था करून मगच झोपतो . मात्र नेमका गजर वाझला की माझे नियोजन पूर्ण पणे बदलून जाते .त्या उबदार पांघरुणात असे वाटते कि "जाऊ दे यार !
[शतशब्दकथा स्पर्धा] मोलाची माया
“अग आटोप!”
“झालंच! दीपच्या आवडीचा शिरा भाजतेय.”
दीप यायच्या आधीच उरकले पाहिजे. तान्हा असतांना मुलाच्या विनंतीमुळे सपोर्टसाठी त्यांच्या घरीच रहायचो. सासूसासऱ्यांचे रहाणे आवडत नसल्याचे सुनेने आडवळणांने सुचविले. आधी- “तुम्हाला त्रास होतो, सगळ्यांचे करावे लागते”, मग- “आजकाल प्रत्येकाला स्पेस पाहिजे असते!”
स्वत:च्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. कामावर जाण्याआधी मुलगा दीपला पोहचवतो, संध्याकाळी घेवून जातो! बरेच आहे! आपण स्वतंत्र, नातवाचा सहवास देखील! दिप तर आपल्या लोभासाठी आसुसलेला असतो!. येणाऱ्या चैतन्याच्या झुळुकीने ती मोहरली.
एवढ्यात फोन....
[शतशब्दकथा स्पर्धा] स्वाभिमानी मुलगा
गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा?
फारेनला आहे आजकल.
कुठे दुबई ला?
आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब कनाडात सेटल झाला आहे.
काय करतो तिथे?
मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम टू टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पण पुण्या-मुंबईपेक्षा बेस्ट आहे.
अस होय, मग लग्न वैगरेह तिथेच केले असेल त्याने?
छे हो, स्वाभिमानी मुलगा आहे, म्हणतो करेल तर मराठी मुलीशीच. आता साहेब तुम्हीच सांगा, तिथे ओटावाच्या जेल मध्ये मराठी मुलगी कुठे मिळणार.
आ!!!
माया (भयगुढकथा)
अमावस्येची रात्र होती . रात्रीचे ८ वाजले होते . 'काल्या' बाबा राजीव सोबत आपलं सगळं समान घेवून आला .गुढघ्यापर्यंत काळी कफनी , खाली काळी लुंगी , कमरेला कमरपट्ट्या सारखं लाल कापड बांधलेलं . खांद्याला काळ्याच कापडाची झोळी. कपाळावर काळा टिळा. डोक्याला काळं फडकं गुंडाळलेल. ह्या सगळ्याला म्याचींग असा शरीराचा रंगहि काळाच . पण डोळे मात्र कमरपट्ट्याला म्याचींग असे लाल आणि बटबटीत .त्याच्या ह्याच अवतारामुळे ज्यांना तो माहित होता ते त्याला काल्या बाबा म्हणायचे . काल्या एक तांत्रिक होता . काळ्या शक्तींची उपासना करायचा तो . काही काळ्या शक्ती आणि सिद्धी वश होत्या त्याला .
[शतशब्दकथा स्पर्धा] पदार्पण
संपलाचकी खेळ आता, शेवटचीच विकेट, शेवटचे दोन चेंडू, चारच धावा जिंकायला.... बॉलर शॉर्ट टाकणार अशी
शंका येऊनच फलंदाजाने मारलेला हुक हुकलाच!
मिसळपाव