Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] मन्या

लेखक अद्द्या यांनी शनिवार, 08/08/2015 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
१०-११ वर्षं अंगाखांद्यावर नाचून, बापाची गादी असल्यासारखं झोपलेलो असताना पोटावर बसून. गुदगुल्या करून , थंडीच्या दिवसात नको असतानाही कुशीत शिरून. सवय लावली हरामखोराने. गविंनी खरं म्हणलं होतं . मांजर जात असतेच नालायक, थंडी वाजते म्हणून पांघरुणात शिरलं,झोपेत मी खाली ढकललं म्हणून चुलीत जाऊन झोपायची गरज होती का , पावसाच्या दिवसात राखेखाली निखारे असतात . इतकी वर्ष घरात असून एवढं कळत नाही का. एका बाजूच्या मिश्या जळाल्या. मिशी गेली कि अंदाज चुकतो यांचा . तरी मस्ती गेली नाही. उंदराच्या मागे गेला पळत पळत. शेवटी मांजरंच ते. . पण आता मला खड्डा खणायला लागतोय त्यासाठी.

शाप भाग - २

लेखक माझिया मना यांनी शुक्रवार, 07/08/2015 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
"वहिनी सरकार" शारदेची हाक आली. चार पाच तरी हाका झाल्या असाव्यात. "काही होतंय का? दिवेलागणीला अशा का बसून राहिला आहात?" काय सांगणार तिला..काय होतंय माझे मलाच कळत नव्हते. मी जर मनातून हादरलेय हे उघड झाले तर वाड्यातले वातावरण बिघडायला वेळ लागणार नाही. अजिंक्यराजे अन् राजश्री नव्या प्रोजेक्टचे काम पहायला गेले आहेत. परत येईपर्यंत जीवात जीव नाही. पोर्चमध्ये गाडीचा आवाज आला तशी धावत गेले. कधी एकदा अजिंक्यला सुखरुप पाहते असं झालेय. ते दोघे हसत येताना पाहून हायसे वाटत आहे. इतका वेळ उलटसुलट विचार करणारे मन थोडे शांत झाले.

[शतशब्दकथा स्पर्धा] रात्र आरंभ (भाग-१)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 07/08/2015 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीबाहेर पडणारा मुसळधार पाउस, अंधारलेलं आकाश,घोंगावणारा वारा, ढगांचा गडगडाट आणि कडाडणार्‍या वीजा ह्याचं गोष्टी दोन दिवस तिच्या सोबतीला होत्या. दिवाणखाण्यामधल्या घड्याळाने रात्रीच्या अकराचे टोल दिले तशी ती एकदम दचकुन जागी झाली. तो अजुनही घरी परतलेला नव्हता. तिनी त्याला परत एकदा भ्रमणध्वनीवर संपर्क करायचा विफल प्रयत्न करुन पाहिला. तिने सहज बंगल्याचा पुढचा दरवाजा उघडुन बाहेर एक नजर टाकली, कोणीचं नं दिसल्याने ती उलटी फिरणार एवढ्यात लखकन वीज चमकली, तिची नजर बंगल्याच्या फाटकाकडे गेली. तो फाटकामधे उभा होता. त्याला ओळखुन पावसाची फिकिर नं करता ती त्याच्याकडे धावली.

मिसळपावातील भय

लेखक पाटीलअमित यांनी शुक्रवार, 07/08/2015 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
संपुर्ण मिसळपावात निरव शांतता होती,मात्र डू(आईडी) हातात पाटी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक संपादकीय शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण मिसळपावाला शतशब्दग्रस्त करुन सोडले होते.अचानक डू ला समोरुन एक शत(शब्द) पावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती पावली गुल झाली आणि पुढच्याच क्षणी डू च्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... ..
काव्यरस

[शतशब्दकथा स्पर्धा] गणू

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 07/08/2015 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात." "बरं मी सांगते गुर्जींना पोरांना सांगायला." गणूची आई. "पण मीच का जाड? " "ते देवाच्या हातात असतं बाळा.” आईनी गणूची कशीबशी समजूत काढली. संध्याकाळी गणू आनंदाने ओरडतच घरी आला. "आई, पुण्याला बाल नाटय स्पर्धा हाये. गुर्जी म्हंटले आपल्याला तब्येतवान राजा पायजे. आख्ख्या वर्गात माझीच निवड झाली.” "अरे वा! आता देवावर राग नाय ना तुझा?

[शतशब्दकथा स्पर्धा] जलधारा

लेखक nasatiuthathev यांनी शुक्रवार, 07/08/2015 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
महादेवाच्या मंदिरात लगबग चालली होती, जलधारांचा आज तिसरा दिवस होता . जलधारा म्हणजे महादेवाची पावसासाठी केलेली आराधना ... पुरोहितांचा मंत्रघोष दुमदुमत होता . गावकरी आनंदात होते . गावकर्यांची इच्छा पूर्ण झाली होती , पाऊस दोन रात्री पासून मुसळधार बरसत होता . हा मात्र धापा टाकत तिथे पोचला. याच्या कानात फक्त रात्री डोंगर माथ्यावरच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या . एका झाडाच्या मुळामुले वाचलेला हा ! तेवढ्यात कोणीतरी सांगितले कि “अरे डोंगरावरच्या शालू चे प्रेत मारुतीच्या पाराजवळ तरंगतय” तसा पळतच हा पारावर पोचला .

सड़ला वाटाना

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 07/08/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
त गोठ असि आय का आपल्या सप्पाइच्याच् स्यारेत सबज्जन एकमेकाइले चिड़वतेत. पोट्टे पोट्टिइनले चिड़वतेत अना पोट्टया पोट्टयाइले. नवी त काई बात नसे न बाप्पा. माह्या गोऱ्याले चार पाय अना तुह्या गोरा लंगडत जाय असा त काई नियम नसे. पर कई कई आंगभर होऊन जाते अना मंग सेकावाची बारी येउन जाते. आमच्या वर्गात एक भाजीवालीची पोट्टी बी सिकत होती. मंगरवार बाजार भरे तं तेती या मायलेकी भेद्रा,वांगा, वाटाना विकाले बसत. कोनी पोटापान्याले चोरीचकारी करते तं कोई नोकरिपानी करते. गरीब मानुस मेहनतीचे खाउन राह्यले होते. आता लाहानसा गाव मनला त सबज्जन एकमेकाइले ओरखत राह्यतेत.

[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया!

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 07/08/2015 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी! बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२." शाळा सुटल्यावर तीन ढांगात घरी! तायला म्हन्लो, "ताये मला येक रुपाया दी, शाळत चित्रकला पर्धा हाय." धुनं वाळू घालीत म्हन्ली, "त्यान्ला न्हाय काम आन तुला नाय धंदा!" धा रोज तायच्या म्हाग लाग्लो. रडलोबी. एक दिवस शाळला जाताना तायनी रुपाया दिला. पुना तीनच ढांगा!