Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] शयना

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/08/2015 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
अज्जिब्बात येत नाही ती,पूर्वीसारखी! एक काळ होता... ती माझी वाट बघत असायची. कधी येतोस रे माझ्या बाहुपाशात? असे म्हणत ! माझाहि रुबाब काही कमी नव्हता तेंव्हा . पण तो असायचा काही क्षणांपुरता. नंतर मी कधी विरघळून जायचो तिच्यात ? कळायचंहि नाही मला! कारण तेंव्हा मुळातच ती होती शयना. आणि मी??? केवळ शयनी! पण आता मात्र काळंहि बदललाय ,आणि वेळंहि. आता येते ती,तशी केंव्हातरि..अधूनमधुन येते.जुन्या क्षणांचि सोबत घडतिये असं वाटलं...तर! पण एरवी? ढुंकुनहि पहात नाही . आणि झालीच सामील अर्ध्या रात्री..तर? रुपडे पार बदललेले असते तिचे . 'आधीना' झालेली असते ती ही. आणि मी ही हल्ली होतो मग तिचा.., आधीन!

[शतशब्दकथा स्पर्धा] गोची

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 11/08/2015 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी, बापलेकर, पालेकर थोडं लवकरंच शाळेत पोचलो. सकाळची शाळा सुटायला अजून अवकाश होता, म्हणून गेटवरच टिवल्या बावल्या करायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे चावताना च्युईंगम दोन बोटांनी बाहेर खेचणे, समोरच्या थियेटरवरचे 'तसल्या' सिनेमाचे पोस्टर न्याहाळणे इत्यादी टुकार उद्योग बापलेकरने सुरू केले होते. तेवढ्यात गेटमधून ज्युनिअर काॅलेजच्या गणवेषातली एक सुंदर मुलगी येताना दिसली. गोरीपान,काळेभोर डोळे!! "आयला! काय कडक माल आहे राव!." बापलेकर चवताळला. "बैला, तुझ्यापेक्षा मोठी दिसतेय ती." मी. "असूदे ना! मं काय झाला?

सिर सलामत तो ...(परदेशकथा)

लेखक मंदार कात्रे यांनी सोमवार, 10/08/2015 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
(** देशाचे नाव देणे हेतुपूर्वक टाळले आहे. ) शाहिद ने विमानातळावरून कराचीच्या विमानात बसल्यावर सर्वप्रथम अल्लाहतालाचे आभार मानले “या खुदा शुकर है तेरा की तूने जिंदा निकाला मुझे इस जहन्नम से! मै शुक्रगुजार हू तेरा!...........” बरोबर दोन वर्षापूर्वी तो इथे आला होता . पाकिस्तानमध्ये मॅट्रिकपर्यन्त शिक्षण कराचीजवळच्या एका छोट्याशा गावात झाले होते. शेजारचे अनेक मित्र आखाती देशात कामाला होते . मग स्वप्नाळू शाहिदलाही आखाती देशात जाण्याची स्वप्ने पडू लागली. मग अब्दुलचाचाच्या ट्रकवर क्लीनर म्हणून काम करू लागला आणि वर्षभरातच तो ट्रक चालवू लागला.

[शतशब्दकथा स्पर्धा] टॅक्स

लेखक उदय८२ यांनी सोमवार, 10/08/2015 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
"मिस्टर उन्निथन, काय प्रकार आहे हा?" "इंन्स्पेक्टर, मी काही चुकीचे केले नाही , तुमचाच नियम फॉलो केलाय." "मिस्टर शर्मा, यांना नियम समजवा जरा, शेड्युल दाखवा" "साहेब, मी सरळ बिझिनेस केलाय, यात एका पैशाचीही चोरी नाही. "टॅक्स कमी भरलात की !" "टॅक्स म्हणून जवळपास साडेसात लाख रुपये भरलेत मी, " "एकूण टॅक्स एकोणीस लाख असतांना तुम्ही ७.५ लाख रुपये काय म्हणताय ? मला कारवाई करावी लागेल" "मी नियमानुसारच टॅक्स भरलाय, तुम्ही एका केरळी माणसाला उगीच त्रास देताय" "हेअर ऑईलवर १२.५% व्हॅट लागतो, तुम्ही ५% हिशोबाने पैसे भरलेयत." . . . . "सर, आमच्यासाठी ते "खाद्यतेल" आहे.

कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 10/08/2015 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पहिलेच स्पष्ट करतो की मला या धाग्यात श्रद्धा ,अंधश्रद्धा,नियती,नशीब,कर्तुत्व वगैरे बाबींचे घोळ घालायचे नाहीयेत.ज्याने त्याने आपापल्या परीने अर्थ घ्यावा. आपण प्रत्येक जण थोड्या फार फरकाने शिक्षण ,नोकरी, लग्न,मुले या चक्रातून फिरता असतो.हळूहळू वय वाढता असते .अनेक चिंता विवंचना मागे लागलेल्या असतात .कधी त्यावर तात्पुरता उपाय काढला जात असतो तर कधी त्या प्रलंबित ठेवल्या जातात .अशातच कधीतरी कोणी घरातील अथवा बाहेरील वयस्कर माणूस सुचवतो की वर्षातून एकदा किंवा जेव्हा जमेल तेव्हा ,घरात मंगलकार्य झाले किंवा ठरले असल्यास कुलदेवतेला जाऊन या .आणि मग बरीच वर्षे मनात घोळत असलेला बेत डोके वर काढत

भाषेरी कुंपण

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 10/08/2015 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
लेख दुसरा... हा एक प्रयोग आहे... माहित नाही किती जणांना कनेक्ट होऊ शकेन... प्रतिक्रियांची वाट पाहत आहे... ........भाषेरी कुंपण......... आता मी हळू हळू लिहायला घेतोय. माझ्या नेहमीच्या टेबलवर -नाही- खुर्चीवर बसून. -बसलोय. पेन वही समोर ठेऊन. -ठेवलीय. आता हळू हळू हे आर्टीकल लिहिता लिहिता मी स्वत:च्या सबकॉन्शियस मधे अलगद$$ प्रवेश करेन. -केलाय. मी आज भाषेशी खुप भारदस्त प्रयोग करणार आहे. -करतोय. माझ्या -'इथल्या!' सबकॉन्शियस मधे वडलांना आणणार आहे. -आनलंयही. अन वडलांच्या 'गावच्या' सबकॉन्शियस मधे मी जाणार आहे. -गेलोयही. (मला भाषा हवी तशी वळवता येईल काय?? 'हा' तो प्रयोग. मी यशस्वी होईल??

तिसऱ्याची आमटी.

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 10/08/2015 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मांसाहारी लोकांसाठी कॅल्शियमचा निसर्ग स्त्रोत म्हणजे कवचमासे (शेलफिश);कोलंबी,शेवंडी,खेकडे किंवा कुर्ल्या,कालवे,खुबे,शिनाण्या,तिसऱ्या,एक ना दोन.तिसऱ्यानाच,शिंपल्या,शिवल्या,मुळे असे म्हणतात.

आमचीबी चालुगिरी…

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 10/08/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा…. आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा.. त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्‍या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो.

[शतशब्दकथा स्पर्धा] सुगंधी हातरूमाल

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 10/08/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
"शरद ४१ वर्षाचा मला सोडून गेला.ती रात्र मला खूपच भयानक वाटली.सकाळी बेडवर शरद दिसला नाही.त्याच्या उशी खाली सुगंध लावलेला त्याचा हातरुमाल दिसला.