[शतशब्दकथा स्पर्धा] सामक्षा
आमचं गाव काय हे न्हवे. ते तिते तळकोकणात!!
किनार्यावरना गोरे आले, धर्मांतरं सुरु केल्यानी. भरीसभर शाहाची माणसा होतीच. मग आमच्या सासर्यांच्या पणजोबांनी सगळा बाडबिस्तारा उचलल्यानी नि आले हिकडे आडगावात!! चांगली जागा बघून घर बांधू म्हटले, गावकरी सांगत जागा बरी नाय. दुसर्या कुटंव्ह बांदा पण हिते नको. पणजोबा पण खमके, घर बांधून दाखवलंनी.
सगळं नीट झालं, घर बांधून गाठीस पयशे र्हायले. म्हयन्याभरान घरभरणीचा मुहूर्त काढल्यानी.
पणजीबाई पंगतीसाठीचे तांदूळ सडायला म्हणून उभ्या र्हायल्या नि दोन घाव घातले नाय की लकाटल्या.
मिसळपाव
रात्रीचे दहा वाजत आले होते.अनघा अरविंद्च्या खांद्यावर डोके ठेऊन रडत होती.अरविंद तिला समजावुन सांगत होता "रडु नकोस पोरी.तुझ्या सासरी तु सुखी राहा.सासरच्या लोकांचं मन सांभाळ."आज अरविंद्च्या लाडक्या छ्कुलीचं लग्न होतं.ती सासरी जात होती आणि अरविंद तिला सगळं समजावुन सांगत होता.पण अनघाच्या डोळ्यांतलं पाणी काही थांबत नव्हतं.अखेर ती अलिशान ऑडी कार मध्ये ब