Skip to main content

संस्कृती

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 18/11/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
१. पुलाच्या पलीकडे एक जमात राहते रानटी आहे असे ऐकून आहे फ़क्त मी कधी पूल ओलांडला नाही पुलाच्या अलीकडे माझी जमात राहते सुसंस्कृत म्हणवते पूल न ओलांडणे हीच आमची संस्कृती आहे २. पुलापलीकडे राहते एक विचित्र जमात दुर्बीण लावून बघतात असे डोकावून पाहणे म्हणजे शुद्ध असंस्कृतपणा! पुलाअलीकडे आम्ही राहतो आमच्या घरांना नसतात भिंती,खिडक्या आणि दारं. पारदर्शक व्यवहार असणे हीच आमची संस्कृती ३. एका पावसाळ्यात नदीला पूर आला पूल वाहून गेला गावे बुडाली. अलीकडचे-पलीकडचे दोघेही झाले आता असंस्कृत!

आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 18/11/2015 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे... कधी रीकामं पाहिलच नाही, त्यात मध्येच १जण असा यायचा जो नंबर लाउन गेलेला असायचा, अजुन चीडचीड, असो, जुनी गाणी ठीक लागली/लावली तर ठीक, पण ९०ची कुमार शानू हिट्स लागले/लावले की माझं डोकं फीरायचं/फीरतं! मग वेळ जायचा पोस्टर्स पाहण्यात, वेगवेगळ्या फालतू चेहर्यांचा मस्तकावरचे विविध ढंगाच्या चित्रविचित्र केश-रंजना, बापरे विचारू नका, असले आउट ऑफ़ घीस वर्ल्ड वाले कट्स! त्यांकडे बघुन झालं की मग निरनीराळ्या तेलाच्या, क्रीमांच्या... बाटल्या! तिथून नजर जायची, अरश्याकडे... ते अरश्यासमोर आरसा आणि त्यातले इंफीनाइट प्रतिबिंब... १० तुम्ही आणि बाकीचे १०...

दोन वेडे - २

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 18/11/2015 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
हॉल! लॉझ बनवायची जागा! अनेक कामगार येथे काम करत. जगातली सगळी सुरक्षा अमेरिका येथे पुरवत होती. १००० सैनिक येथे तैनात होते.

जास्त नाही..

लेखक रातराणी यांनी बुधवार, 18/11/2015 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
बहरलेल्या ताटव्या, एक कळी उमलू दे जास्त नाही.. अस्तित्वाला थोडा तुझा बहर दे. धगधगणार्या विस्तवा, एक निखारा फुलु दे जास्त नाही.. प्रेमाला थोडी तुझी धग दे. शहारलेल्या रात्री, एक प्रहर ढळू दे जास्त नाही.. स्पर्शाला थोडा तुझा शहारा दे. रंगलेल्या आभाळा, एक छटा खुलू दे जास्त नाही.. आयुष्याला थोडा तुझा रंग दे. तेजाळलेल्या पहाटे, एक किरण उधळू दे जास्त नाही.. मृत्युला थोडे तुझे तेज दे.

पुण्यवंतांची स्मारके आणि वाद घालणारे आपण करंटे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 18/11/2015 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिक्स्लेमरः सदर लेख कोणत्याही जात, धर्म, पंथ, राजकिय पक्ष, विचारसरणी विषयी किंवा त्या विरूद्ध भाष्य करीत नाही. लेखातील विचार केवळ लेखकाचे वैयक्तीक आहेत. लेखकाची सामाजिक वागणूक आणि विचार या लेखात आलेल्या विचारसरणीस अनुसरून असतीलच असे नाही. साहित्याचं नोबेल मिळवणारे प्रसिद्ध इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या मुंबईतील जन्मस्थळावरुन वाद सुरु झाला आहे. (संदर्भः "किपलिंगच्या शोधात.." ओंकार करंबेळकर, मंथन पुरवणी, दै. लोकमत) बाबासाहेबांचे लंडनमधील निवासस्थान घेण्याचा मार्ग मोकळा - दै. सकाळ महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक - दै.

लाल भोपळ्याची बाकर भाजी

लेखक मधुरा देशपांडे यांनी बुधवार, 18/11/2015 03:13 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीचा ऋतु आला, लाल भोपळा मिळाला आणि लगेच ही अत्यंत आवडणारी भाजी करण्यात आली. विदर्भात लग्नकार्यात, सणावाराला ही भाजी केली जाते. या भाजीचेही बरेच व्हेरिएशन्स आहेत. जर घरात काही धार्मिक कार्याच्या दिवशी केली, तर फक्त लसूण यातून वगळला जातो, बाकी वेळा लसूण घालून केली जाते. लाल भोपळा अजिबात न आवडणाऱ्या व्यक्तींनाही ही भाजी हमखास आवडते असा अनुभव आहे. तेव्हा अवश्य करून बघा. साहित्य - लाल भोपळा चिरून - अर्धा किलो (बरेचदा सालासहित घेतात, मी सालं काढली आहेत) सुके खोबरे - ३ टे.स्पून. खसखस - ३ टे.स्पून.

किर्रक्केट

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 18/11/2015 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
'किर्रक्केट' क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती... कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस!   आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे'...

पावडर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 17/11/2015 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
(ह्या कथेत इंटरनेटच्या एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली आहे. ही कथा वाचत राहा, तिचा आनंद घ्या पण चुकूनही ह्या जगाची ओळख स्वत: करून घ्यायचा प्रयत्न करू नका हीच कळकळीची विनंती.) **************************************************************************** गोष्ट तशी फारशी जुनी नाही. सहा आठ महिन्यांपूर्वी मी माझे गुजरात राजस्थान मधले काम संपवून नुकताच पुण्यात स्थानापन्न झालो होतो. गणपती संपत आले होते, अचानक तेव्हाच एके दिवशी आमचा मोबाईल खणखणला. बघतो तर कश्यप साहेबांचा फोन. कश्यप साहेब गेल्या वर्षीच पुण्याच्या सायबर क्राईमला जॉईन झाले होते.

कमोदिनी काय जाणे तो परिमळ

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 17/11/2015 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : गेले काही दिवस मिपावर फार मजेशीर प्रकार चालु आहे (म्हणजे तसा तो आधी पासुन चालु असावा, माझ्या निदर्शनास नुकताच आलाय.) काहीतरी अल्पस्वल्प वाचनाने आपले स्वतःचे काही तरी एकांगी मत बनवुन घ्यायचे, ते पकडुन कचकुन लेख पाडायचा , भले मग इतरांच्या भावना दुखावल्या जाओ न जाओ आपल्याला त्याच्याशी काय .

दोन वेडे !

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 16/11/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र झाली होती. विसपुते मेन्शन सुद्धा निद्रादेवीच्या आधीन झाला होता. मात्र एका रूम मधील लाइट अजूनही चालू होती. "मार्क झोपा आता" अल्डेर म्हणाला. "अल्डेर १३ वर्षे झाली आता, नाही झोप येत." "येत नसेल तरीही झोप, कारण विसपुते मेन्शन जागा राहणं जगाला परवडणार नाही." "विसपूते मेन्शन जागा राहणं जगाला चालेल पण मार्क विसपूते नाही." "मार्क विसपुतेने जग जिंकलं पण स्वत:ला नाही, अल्डेर." मार्कचा आवाज कंप पावत होता. "मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, जग जिंकणं सोपं असतं, पण "स्वतःला जिंकणं अवघड असतं." कोण ? सिकंदर ?" "नाही, सर आर.एम.