Skip to main content

इंग्रजाळण्यासाठी जागतीक ई-निवीदा

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/11/2015 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलून देऊ शकणारे खालील तंत्रज्ञ हवेत! * भाषातज्ञ हवेत : कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलणे, आणि असे संपादीत केलेले यश सातत्याने भविष्यात पुढील पिढ्यांसहीत कायमस्वरुपी टिकवणे. * अर्थतज्ञ : कामाचे स्वरुप : संपूर्ण मनुष्यजात जरी इंग्रजाळली तरीही मागणी-पुरवठा नियमांचा कोणताही प्रभाव न पडता, प्रत्येक व्यक्तीसाठी केवळ इंग्रजी कौशल्याच्या उपलब्धतेच्या बळावर संपूर्ण मानवजातीतील प्रत्येक व्यक्तीची आर्थीक संपन्नता वाढवत नेणे. * वैद्यकीय व्यावसायीक : अशा गोळी, इंजेक्शन्स, जेनेटीक साधनांचा शोध लावणे जेणे करून भ

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १ . . .

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 24/11/2015 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

गाज

लेखक आत्मधून यांनी मंगळवार, 24/11/2015 14:57 या दिवशी प्रकाशित केले.

दाहीरची यमदिक्षा

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 24/11/2015 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
चुका वांझोट्या नसतात कधीनाकधी त्या प्रसवतात भूतकाळातील पातके मग सारे जगणे यातनामय होवून जाते. गलितगात्र असे जगणे मोहपाशात गुरफटलेले, सतत भूतकाळाची सावली घेवून नाचणारे, सारे थरारून जाते अन सुन्न पडते. बाणासारखा अंधार छेदुन चिवडलेला काळोख त्याच्या चित्रविचित्र मुर्त्या होवून नाचतात अन घेवून जातात त्या अनाकलनीय जगात जिथे मानवाचे प्रथम वंशज प्रत्येक भयाण वस्तूला देवत्व देत होते. मग संस्कृतीपाठोपाठ हाव आली त्याचाच परिपाक आक्रमणे, प्रत्येक संस्कृतीवर बलात्कार होवून अनौरस वंशाचे ओझे वाढत राहिले, त्यात शेवटची आहुती दाहीरची पडली मग सारेच दाहीर होत राहिले.

माझं प्रेम प्रकरण!!

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 24/11/2015 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
आई:- मग काय ठरलं तुझं? इतक्या पाहिल्या आतापर्यंत... कुठली पसंत पडतेय का? तुझ्या मनात दुसरी कुठली असेल तर स्पष्ट सांग बाबा. मी:- (मनाचा हिय्या करून) होय आई... ठरलंय माझं. आई:- (सुस्कारा टाकत) वाटलंच मला... बोल कोणती? नाव काय तिचं? आणि कुठे भेटली तुला? मी: "अंजली".. अगं मागे नाही का एका दुकानात गेलो होतो आपण? तिकडेच पाहिली होती तिला. तुही म्हणाली होतीस बरी वाटतेय नई!! आई:- अरे माझ्या कर्मा!! ती अंजली!! त्या गुजरात्याची!! काय एव्हढ बघितलंस तिच्यात? ऐकलं आहे मी तिच्याबद्दल.. काही कामाची नाही ती! मी:- अगं आई तू आता पूर्वीसारखी अढी मनात ठेवू नकोस. आता जमाना बदलला आहे. नव्या विचारांची आहे ती!

रन फॉरेस्ट रन

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 24/11/2015 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मध्यंतरी 'काही वेगळे चित्रपट' या धाग्यावर हॉलीवुडचे बरायचश्या सुंदर चित्रपटांचे उल्लेख मिळाले, त्यापैकी 'टॉम हँक्स' अभिनीत 'फॉरेस्ट गम्प' पासून सुरवात केली. निसर्गाने मानवाला बनवताना कोणते रसायन वापरले याचा उलगाड़ा अजूनही आपल्याला झालेला नाही, फॉरेस्ट गम्प मधून पुन्हा एकदा हे रसायन समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. विन्स्टन ग्रूम या लेखकाने लिहिलेल्या "फॉरेस्ट गम्प' याच शीर्षकाच्या कादंबरीवर हा चित्रपटला ऑस्करचे उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, संपादन इत्यादी एकूण सहा पुरस्कार मिळाले.

डोम्या म्हणे...

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 24/11/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय लीलासूत श्री. भंसाली यांच्या ऐतिहासिक असहिष्णूतेचा वाढता गदारोळ पहाता, सिनेसृष्टीतील काही नामवंत कलाकार, त्यांनी महत्प्रयासाने कमवलेले पुरस्कार परत करण्याच्या तयारीत आहेत याची उडती बातमी कळताच डोम्याने चोच टवकारली. येणार्‍या जाणार्‍या कोळीणीच्या पाट्या न्याहाळत बसलेल्या कावळ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून त्याने ताबडतोब उडत उडत अभिनयाचे बादशाहा श्री. शाहरुख खान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस किंगखान जवळ-जवळ शेजारी बसलेल्या त्यांच्या फार जवळच्या मित्राशी चर्चा करत होते. डोम्याला ते दर्शनी भांडणं वाटलं. पण ती चर्चाच होती असं दोघांनी छातीठोकपणे (एकमेकांची छाती ठोकून) सांगितलं.

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग २

लेखक भानिम यांनी मंगळवार, 24/11/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात आपण भारतीय संस्कृतीच्या प्रसाराला कशी सुरवात झाली आणि भारतीय शास्त्राध्यापक तिबेटपर्यंत कसे पोहोचले ते पाहिले. या भागात आपण चीन आणि इतर आशियाई देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला ते पाहुया. हान राजघराण्यातील 'मिंग ती' या सम्राटाच्या आमंत्रणानुसार इ. स. ६७ मध्ये 'कश्यप मार्तंग' आणि 'धर्मरक्षित' हे दोन भारतीय विद्वान चीनमध्ये गेले आणि त्यानंतर नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला आणि ओदान्तपुरी येथील अनेक विद्वान तेथे पोहोचले. ख्रिस्त पश्चात चौथ्या शतकात 'वी' राजघराण्यातील सम्राटाने बौद्ध धर्म हा राजधर्म म्हणून घोषित केला.

गोष्टः अकबर बिरबलाची!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 24/11/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती.... कुणी म्हणालं की, "तरवार वा पट्टा. जोवर हातात दम आहे तोवर चिंता नाही." कुणी म्हणालं की, "धनुष्य-बाण. दूरवरूनच गनीम गारद करता येतो." अजून कुणी म्हणालं की, "तोफ. एका गोळ्यात अनेक गनीम मारता येतात." वगैरे, वगैरे... बिरबल काहीच बोलत नाहिये हे पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं, "क्यों बिरबल, तुम्हारा क्या खयाल है?" बिरबलाने दोन क्षण विचार केला आणि उत्तर दिलं, "जी हुजुर, ये सब लोक सही फर्मा रहे है.

बेसन पोळा / पिझ्झा काहीही ......

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 24/11/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मिपाकर्स , सध्या पावसाळा परत सुरु झालाय ;) आमच्याकडे शिळ्या पोळ्या उरल्या की नेहमीच त्याचा तिखट चुरा नाही तर तुप गुळ घालुन गोड मलिदा बनवतात. पण काल धो - धो पाउस कैतरी चमचमीत करावे असे राहुन राहुन वाटत होते पण भजी / वडे तेलकट पदार्थ नकोसे वाट्त होते. काय क्रावे बरे ? असा विचार करता करता आहे त्या साहित्यात ही रेसेपी सुचली न प्रयत्न सगळ्याना आवडला देखील म्हणुन इथे हा रेसेपी प्रपंच :) पदार्थ झालाय पण बारस कै जमल नै आपल्याला :) साहित्य : १ )शिळ्या पोळ्यांचे तुकडे.