Skip to main content

जि. प. प्रा.

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 18/12/2015 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
"पाटीवर तुमचं आवडतं चित्रं काढा" गुर्जी मनले. मी समद्यात पुढं. म्हंजी बसायला. बसलो 'टरक' काढत. दोन आडव्या रेघा. मग ऊभ्या. मग कॅबिन. मग चाकं. गेलो गढून. म्हागं समदी ऊभी राहिली. नान्या वाकून माझ्या पाटीत बघाय लागला. "थांबा रं, त्यला आधी टरक काढू द्या" खुडचीवर बसलेल्या 'बाई' माझ्या डोक्यात टुपक्कन छडी मारत मनल्या. ही तर जगदंबाच. माझ्या ओझरतं कानावर आलं पण सुटून गेलं. डोक्यावर काय पडलं म्हणुन हात बी फिरवला. नान्या माझ्या म्होरनं वर्गाभाईर जायला लागला. "ये, आरं सर, माज्या आधी?" पाटी फेकत त्याला आडवत म्या आडवलं. आन एकदम ध्यानात आलं, मधली सुट्टी झाली वाटतं.

घोस्टहंटर-३

लेखक DEADPOOL यांनी शुक्रवार, 18/12/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
१६६५! इंग्रज सैन्य स्पेनवर चालून गेले! काउंट ब्रॅक्स्टन या लढ्याचे नेत्रुत्व करत होता! ब्रॅक्स्टन हा अत्यंत ताकदीने लढणारा योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. आजपर्यंत म्हणून तो एकाही लढ्यात हरला नव्हता! मात्र आज त्याची लढाई एका सैतानाबरोबर होती! आंद्रे!!!!! "ब्रॅक्स्टन!" "कोण?" "मी लाओ!" लाओ हा ब्रॅक्स्टनचा उजवा हात. हा अत्यंत चाणाक्ष हेर म्हणून प्रसिद्ध होता. "बोल लाओ." "ईशान्येला सैन्य हलवा!" ब्रॅक्स्टन ला कळायला वेळ लागला नाही! ईशान्येकडील दरवाजा तुटला. कीम्बहुना रखवालदार फितूर झाल्यामुळे तोडला गेला! आणि लाओने पहिला जीव घेतला.

जंटलमन्स गेम - ७ - The Barnacle & The Tortoise

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 18/12/2015 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
१९५३ चा जून महिना.... लिंडसे हॅसेटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ अ‍ॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्वतः हॅसेट, आर्थर मॉरीस, नील हार्वे, कॉलिन मॅक्डोनाल्ड, ग्रॅहॅम होल असे बॅट्समन होते! डॉन टॅलनसारखा गाजलेला विकेटकीपर होता. रॉन आर्चर, डग रिंग, रिची बेनॉ, अ‍ॅलन डेव्हीडसन यांच्यासारखे ऑलराऊंडर्स संघात होते! त्याखेरीज फास्ट आणि स्पिन बॉलिंग सारख्याच परिणामकारकपणे टाकू शकणारा बिल जॉन्स्टनसारखा हरहुन्नरी बॉलरही होता!

सिंहलव्दीपाची सहल : ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 18/12/2015 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

विटाळ

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 18/12/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
काचेच्या काळ्या, आरसा नसलेल्या तावदानी फक्त तुझाच चेहरा दिसतो जन्मजात जार तू जारिणीचा संग करतो ! देऊनी माझ्या कळीला फुलाची भूल, काय साधलेस सांगताना जरा शहारते कौमार्याच्या गळी माळलास कामाग्निचा अंगार ! कौमार्याच्या अनवट क्षणी तू शिलगवलास वासनेचा कोळसा माळती माझ्या कुंताली कौमार्ययोग्या आरसा ! कातरवेळी, कुवारवेळेस मी मागते कुकवाचा जोगवा गारठधूक्यात दडल्या चंद्रास माझा विटाळ देईल सांगावा ! तुझ्या परतवाटेस मी फासला शेंदुर गोठणबिंदू गाठणा-या बेवारशी रात्रीस शरीरी पेटे अंगार ! कोवळ्या आर्द्र बोटानी मी चाळवते निखारे उरलेत माझ्या भोगल्या शरीरी रासवटलेले तुझे शहारे ! विजयकुमार..................

Where There is 'I' there is 'Ego '

लेखक विश्वव्यापी यांनी शुक्रवार, 18/12/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे ' मी ' ची जाणीव आहे , तिथे ' अहंकार ' उपजतो .जिथे ' अहंकार ' उपजतो , तिथे ' भय ' उत्पन्न होते .जिथे ' भय ' असते , तिथे ' संदेह ' निर्माण होतो .जिथे ' संदेह ' असतो , तिथे 'अपयश ' हमखास येते .जिथे ' अपयश ' आहे , तिथे ' कष्ट ' कार्य्ण्याची तयारी असावी .जिथे ' कष्ट ' आहेत , तिथे ' प्रामाणिकपणा ' रुजतो .जिथे ' प्रामाणिकपणा ' आहे , तिथे ' आशा ' आहे .जिथे ' आशा ' आहे , तिथे ' प्रकाशाचे ' अस्तित्व आहे.जिथे ' प्रकाश ' आहे , तिथे ' श्रद्धा ' आहे.जिथे ' श्रद्धा ' आहे , तिथे ' विश्वास ' आहे.' विश्वास ' हा ' स्वानुभवातून ' निर्माण होतो .हाच 'स्वानुभव' , 'स्वानुभूति '

घोस्टहंटर-२

लेखक DEADPOOL यांनी शुक्रवार, 18/12/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
बावीस दिवसांपूर्वी! एक तरुण रस्त्याने जात होता. त्याच्या शरीरावर अत्यंत उंची वस्त्रे होती.त्याने रस्त्यावरील एका टॅक्सीला हात दिला. "मेरीओ हॉटेल!" भरधाव वेगाने टॅक्सी निघाली. मेरीओ हॉटेल ही लंडनमधील अत्यंत उंची हॉटेल म्हणून गणली जात असे. अनेक अभिनेते,उद्योजक,नेते,या हॉटेलमध्ये विचारविनिमय करत असत.जगातल्या सर्व सुखसोयी या हॉटेलमध्ये होत्या. "हॅलो मि. ग्रेग!" तो तरुण म्हणाला. ग्रेगने मान हलविली! "मी काउंट मॉर्सेलिस. माफ करा मला थोडा उशीर झाला." "इट्स ओके!" ग्रेग हसत म्हणाला. कॉफी विदाऊट शुगर! मॉर्सेलिसने ऑर्डर दिली! "तर मी आता मुद्यावर येतो. सर्वप्रथम मला आपली ओळख करून द्यायला हवी.