Skip to main content

वाघोबा at ताडोबा भाग - ४

लेखक अभिदेश यांनी शुक्रवार, 01/01/2016 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं ताडोबाविषयी . ताडोबाचे (भारतातल्या सगळ्याच टायगर रिसर्व ) २ भाग पडतात . बफर आणि कोअर झोन. नावाप्रमाणेच कोअर झोन हा वाघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा इथे कोणत्याही प्रकारच्या मानवी अतिक्रमणाला बंदी . वाघाचे वास्तव्य , शिकार , विश्रांती आणि प्रजनन साधारण ह्या भागात असते . बफर झोन हा कोअर च्या बाहेरचा अंदाजे १० किमी पर्यंत , पण संरक्षित . इथे काही भागात मानवी वस्ती , रस्ते असतात . ताडोबाचा कोअर हा जवळपास ६२६ sq . km आणि बफर ११०१ sq km ( जंगल ७०० sq km आणि जंगल नसलेला ४०१ sq km ). बफर झोनच्या सफारीसाठी आरक्षण करता येत नाही , तिथे (गेट) वर त्या त्या वेळेस जाऊन करावे लागते .

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी: मतदान

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 01/01/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वप्रथम आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! छायाचित्रणकलेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. यंदा ही स्पर्धा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आयोजित केली होती अन या पद्धतीला सर्व स्पर्धकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ही बाब उत्साह वाढवणारी आहे. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे १० तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती.

सिंहलव्दीपाची सहल : १५ : याला राष्ट्रीय उद्यान...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 31/12/2015 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

कळसूत्र आणि Life of Brian

लेखक Anand More यांनी गुरुवार, 31/12/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
काजळमाया हे जी ए कुलकर्णींचे एक पुस्तक. लहानपणी वाचलेले. नंतर विसरलेलो. पुन्हा वाचायला घेतले. काल त्यातली कळसूत्र ही कथा वाचत होतो. दूर डोंगरात राहणारी, आदिमानवाच्या आस्था बाळगणारी आणि निसर्गावर अंधविश्वास ठेवणारी एक टोळी. त्यांचा प्रमुख म्हणजे लाल गरुडाचं चिन्ह अंगावर रंगवलेला माणूस.

४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

लेखक सुधीर वैद्य यांनी गुरुवार, 31/12/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे: प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवत असतो. ध्येय निश्चित करताना स्वत:ची कुवत (ability ) लक्षात घेणे जरुरीचे असते. तसेच ध्येय सिद्धीसाठी अपार श्रम आणि जोडीला कमीतकमी नशीब आवश्यक असते. काहीवेळा ध्येय अपेक्षेप्रमाणे साध्य होते. काही वेळा प्रयत्न करून सुद्धा, अपेक्षित यश हुलकावणी देत राहते. यश किंवा अपयश ह्याची गाठ घालणारे नशीब असते. अपयश आले तरी माणूस प्रयत्न सोडत नाही पण यश मिळाले नाही तर मात्र कालांतराने निराश होतो. ध्येय ठरवताना मनात असलेली 'आस ', प्रत्येक अपयशाबरोबर 'ध्यास ' मध्ये रुपांतरीत होत असते.

एकटा

लेखक सुधीर वैद्य यांनी गुरुवार, 31/12/2015 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
एकटा प्रत्येक माणसाच्या मनाच्या कोपऱ्यात एकाकी पणाची भावना असतेच. तुम्ही मान्य करा अथवा नका करू.

लकी

लेखक मीन यांनी गुरुवार, 31/12/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
आई गंऽऽ! खूप कंटाळा आलाय आज. खूप दिवस काही काम केलं नाही. कुठे बाहेर फिरायलाही गेले नाही. अश्शी एका जागी बसून आहे. मी मुळात आळशी नाही बरं का! खूप कामसू आहे. लोकांना मदत करायला खूप आवडतं मला. कुठे काही वाईट घडलं की जशी काही मला सूचनाच मिळते. डोळ्यांसमोर लाल वर्तुळं दिसतात. कानात भोंगे वाजू लागतात. एक प्रकारचा सिक्स्थ सेन्सच म्हणा ना. मग मी अगदी धावपळ करुन लोकांच्या मदतीला जाते. आणि एक अभिमानाची गोष्ट सांगू? मी आजपर्यंत ज्यांना ज्यांना मदत केलीये, त्या सर्वांवरील संकट टळून ते अगदी सुखरुप बचावले आहेत. म्हणूनच माझे मित्र, नातेवाईक सगळेजण मला ‘लकी’ म्हणतात. माझे खूप लाड करतात.

छंदाच्या पलीकडे

लेखक केतन बारापात्रे यांनी गुरुवार, 31/12/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक भेटी पूर्ण झालेल्या किंवा न झालेल्या, अनेक संवाद झालेले किंवा न झालेले त्यांच्याशी अतुटपणे जोडल्या गेले असतात समाधान आणि असामाधान दोन्ही एकाच रथावर जुंपल्यासारखे त्यांच्यासोबत चालत राहतात, समाधान आणि असमाधान एकसोबत जुंपलेले असूनही त्यांच्या सुरात तालात कमालीची शांतता आणि धीर असतो आणि ते फक्त आणि फक्त अनुभवायच असत. गझल किंवा ठुमरी यांचं माझ्यासोबतच वेगळच नात आहे खरंतर त्यांच्याशी नात जुळायला वेळ लागत नाही हे अत्यंत हळवं आणि तितकच जिव्हाळ्याच असत, विशेष म्हणजे याला कसलीच बांधिलकी नसते,कुठले करार नाही,कुठलीच मागणी नाही हे नात फक्त देण्यासाठी असत.

ऑपरेशन

लेखक समीर१२३४५६ यांनी गुरुवार, 31/12/2015 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज रोहित हॉस्‍पीटलमधून लवकर घरी अाला, त्‍याची तब्‍येत ठिक नव्‍हती. येताक्षणीच त्‍याने आपला राग श्‍वेतावर व अश्विनवर काढायला सुरवात केली. श्‍वेता ही रोहितची दुसरी बायको होती, तर अश्विन त्‍याच्‍या पहिल्‍या बायको रंजनाचा मुलगा होता. होता.काही महिन्‍यांपूर्वी एका अपघातात रंजनाचा मृत्‍यु झाला होता, तेव्‍हापासून तोच आश्विनचा सांभाळ करत होता. आईच्‍या सांगण्‍यावरुन त्‍याने दुसरे लग्‍न केले होते,परंतू आल्‍या दिवसापासून त्‍याची दुसरी बायको श्‍वेता अश्विनचा छळ करीत होती, ती त्‍याला दिवसभर रगाडयाला लावत असायची आणि धड त्‍याला काही खायला ही देत नसे.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 31/12/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.