बंगाली मातीचा साजरा बुरूज
एखादी क्रिकेटची बातमी खुपच हौशी क्रिडा रसिक असाल तर फुटबॉलची बातमी, कधी मधी राजकारणाच्या निमीत्ताने-कम्युनीस्ट किंवा आजकाल ममता बॅनर्जी- अल्पसा उल्लेखाच्या बातम्या फारफारतर बांग्लादेशींची घुसपैठ या पलिकडे 'कलकत्ता' आणि 'पश्चिम बंगाल' हा विषय तुमच्या माझ्या सर्वासामान्य मराठी माणसाच्या फारसा नजरेस येत नाही.
विचारवंत आणि रॅशनलीस्ट असलेल्या बंगाली बाबूंनी गेली ३० ३५ वर्षे कम्युनीस्टांना लोकशाही मार्गाने स्वत:हून वाहून दिली होती म्हटल्यावर पश्चिम बंगाल मधला सेक्युल्रीझमचा झेंडा चांगलाच गाढ असेल आणि ब्राह्मोस्माज - विवेकानंदांची ते रबिंद्रनाथ टागोरांची पुरोगामी प्रतिमा आणि पश्चिम बंगाल बद्द्ल अस्म
खुशबू (एकत्रित कथा, पुनःप्रकाशित)
उपोद्घात
आज: १७ फेब्रुवरी २०१५
'पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना जिंकणं म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं आहे. माझा मुलगा पाकिस्तानविरुद्धच्या 'या' युद्धात शूर सैनिकासारखा लढला. त्यानं दाखवून दिलं की भारतीय मुसलमान हा आधी भारतीय असतो, मग मुस्लिम असतो!' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याचे अब्बाजान मोहम्मद तौसिफ यांचे.
सुभ्या
पाठीत धापकन् बुक्का बसला तेव्हा सुभ्या खड़बडून जागा झाला.
"कारे गाढवा! इ.भु.ना. चा तास म्हणजे काय झोपायचा तास वाटतो काय रे तुला!" गुरुजी मोठ्याने त्याच्या कानाजवळ येऊन खेकसले.
तो, त्याच्या अगोदारचा म्हणजे मराठीच्या वालावलकर बाईंचा तास चालु झाला तेव्हा झोपलेला, इ.भु.ना. च्या कोंडुळे गुरुजींना समोर पाहुन पुरता गोंधळला.
"असा अफजल खान पाहिल्यावानी काय बघतोयस? चल ताजमहल कुणी बांधला सांग लवकर?"
सगळा वर्ग त्याच्यावर डोळा लाउन बसलेला आणि त्याची खाली बाकावर चुरगळलेले मराठीचे पुस्तक सरळ करण्याची धांदल.
"इ.भू.ना.
बंडयादादाची फेफे - कथा
----------बंडयादादाची फेफे - कथा ------------
"चला , विद्याभवन शाळेचा स्टॉप आला. ए पोरा, तुला इथच उतरायचं आहे ना?" कंडक्टरचा आवाज बसमध्ये घुमला. देवीदास गडबडीने बसमधून उतरला . बराच वेळ बस प्रवास झाल्याने तो जरा कंटाळून गेला होता . पण समोरची विदयाभवन शाळेची भव्य ईमारत पाहून त्याचा कंटाळा पळून गेला . आज तो या शाळेमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी आला होता . त्याने एकदा खिशामधले घरातून निघताना आईने फीसाठी दिलेले पैसे तपासले . व तो गेट मधून शाळेच्या आवारामध्ये शिरला .
शाळेमध्ये तुरळक शिक्षक , विद्यार्थी व पालक यांची लगबग चालू होती . शाळेचे वर्ग सुरु झालेले दिसत नव्हते .
गजाननाचे वंदन गाऊ
****************************
मिसळपाव वर माझी ही पहिली कविता.
म्हणूनंच, सुरुवात गणरायाच्या स्तवनाने.
गजाननाचे वंदन, गजाननाला अर्पण!
****************************
गजाननाचे वंदन गाऊ|
रोज आधी हो त्यालाच पाहू||
हाच देवसे कला-बुद्धीचा,
हाच कांत प्रिय रिध्दी-सिद्धीचा,
आशीष हा साफल्य, वृद्धीचा,
कृपा निरंतर मागत राहू|
गजाननाचे वंदन गाऊ||१||
दुर्वांकुर नीरज जासवंद,
केवड्याचा ये मंद सुगंध,
मोदकाचा ही पुरवू छंद,
शुभ्र कपाळी चंदन लाऊ|
गजाननाचे वंदन गाऊ||२||
कार्याच्या शुभ आरंभाला,
मिळून आळवू गणरायाला,
विसरु नित संकट विघ्नाला,
फूल भक्तीचे चरणी वाहू|
गजाननाचे वंदन गाऊ||३||
काव्यरस
कीस बाप्या कीस, गाजर कीस
ताजे ताजे गाजर हि आवाज ऐकली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. लाल सुर्ख कोवळे गाजरे पाहून तोंडाला पाणी आले. तेवढ्यात सौ. हि बाहेर आली. मी म्हणालो गाजरचा हलवा खाण्याची इच्छा होते आहे. गाजर घेते का? (आ बैल मुझे मार, यालाच म्हणतात). आमची सौ. तशी सौदेबाजीत खरोखरच पटाईत आहे. ३० रुपये किलो वाले गाजरे, १०० रुपयात ५ किलो घेतले. गाजरे धुऊन माझ्या पुढ्यात ठेवली. हलवा खायचा असेल तर गाजरे किसावी लागतील.
काव्यरस
सोशल नेटवर्किंग (भाग ४)
आज सकाळी सकाळी facebook लावताच श्रावणीचं दर्शन. अगदी छोटा काळा मायक्रो स्कर्ट आणि त्यावर फिकट गुलाबी रंगाचा आणि स्कर्टच्या मानाने बऱ्यापैकी मोठा म्हणता येईल असा टी-शर्ट. अगदी वर
खोचून बांधलेले केस. आणि गवतावर एका कुशीवर झोपून हातात धरलेली गुलाबाची कळी. बाकी आजूबाजूला काहीच नाही. फक्त हिरवंगार गवत. अप्रतिम एकदम. मयंकला जितक्या वेळा श्रावणी आठवून छान वाटत असे, तितक्या वेळा मल्हार आठवून कमालीचा संताप येत असे. नेहमीप्रमाणे हा ही फोटो त्यानेच काढला असणार. आपल्यावरची लाईम लाईट कमी होत चाललीय हा एक राग तर होताच मल्हारबद्दल. शिवाय श्रावणी-मल्हार काय प्रकरण आहे हेपण नीट कळत नव्हत.
मिसळपाव