Skip to main content

"नाही" चा महिमा!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 17/02/2016 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वासघात त्याचाच केला जातो जो विश्वास ठेवतो. म्हणून जास्त आणि पटकन कुणावर विश्वास ठेवत जाऊ नका. इमोशनल ब्लॅकमेल त्यालाच केले जाते जो इमोशनल असतो. म्हणून आजच्या जगात जास्त इमोशनल राहून चालत नाही. भिडस्त राहून सुद्धा चालत नाही. नाहीतर भिडस्त माणसाचा सर्वात प्रथम बळी जातो. तुम्ही दाबले जाल तर दुनिया तुम्हाला आणखी दाबेल. आजकालच्या जगात जो सगळ्यांचा मनाचा विचार करतो त्याच्या मनाचा विचार कुणीच करत नाही. जो सगळ्यांच्या स्वभावाला सांभाळून घेतो, त्याच्या स्वभावाला मात्र कुणीच सांभाळताना दिसत नाही. अशा व्यक्तीला दुखवणे आपला हक्कच आहे असे लोक मानतात कारण अशा व्यक्तीला गृहीत धरले जाते.

राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार, शिक्षक आणि शिक्षणाची भूमिका

लेखक माहितगार यांनी बुधवार, 17/02/2016 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ चौकशी आणि चर्चेत असतानाच काल कलकत्यातील जादवपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या मोर्चातून दिल्या गेलेल्या राष्ट्रविरोधी घोषणा बातमीत आल्या आहेत, सुभाषचंद्र बोसांबद्दल भावूक होणारा बंगाली विद्यार्थी असा दुसर्‍या टोकाच्या वर्तणूकीला सोबत कशी काय देतो ? वस्तुतः सहसा प्रत्येक व्यक्तीला स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेणे आवडत असावे तरीही विपरीत वर्तन का घडत असते ?

लेडिज स्पेशल

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 17/02/2016 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवार देउळ दिवस लोअर परेल ठाणे दादर फास्ट-दाद्रर परेल- शेअर टॅक्सी गेल्या पाच वर्षात न चुकणारा कार्यक्रम. मेलवर आजच्या देउळातल्या पाहुण्यांची जळजळीत कहाणी डोक्यात भिनलेली. सर्व दुष्काळी भागातील मुले. सर्व प्रकारची आव्हाने परतवुन लाउन मुंबई च्या सरकारी इंजिनियरिंग आणि नेडीकल कॉलेज मधे प्रवेश घेतलेली. शिष्यव्रुती अर्जाची मुलाखत.

औरंगाबादला पाहण्या, करण्या आणि खाण्यासारख्या गोष्टी

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 17/02/2016 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगाबादला कट्टा करण्याविषयी एक धागा उघडला गेलाय. मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला. माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच. ह्या धाग्यावर मी हि खालचीच माहिती पुरवली होती. पण तिची लांबी पाहून ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा असावा असे वाटले. इथे नसलेली औरंगाबाद विषयी उपयुक्त माहिती मिपाकरांनी पुरवावी. मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन. पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय.

माझी भटकंती - प्रबळगड व कलावंतिणी दुर्ग ट्रेक

लेखक sagarshinde यांनी बुधवार, 17/02/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रबळगड व कलावंतिणी दुर्ग ट्रेक kalavantini durg

वसईच्या किल्याच्या स्वारीवरून परत आल्यावर मी प्रबळगड कलावंतिणी दुर्ग एक रात्र एक दिवस या ट्रेक च आयोजन केल आणि तशी पोष्ट मी माझ्या ब्लॉग वर टाकली आणि तशी तय्यारी हि चालू केली. काही चौकशी साठी फोन हि आले. माझा ट्रेक हा १३ – १४ फेब्रुवारी ला होता त्यात १४ तारखेला व्हलेन्तिएन डे असल्यामुळे त्याचा हि परिणाम म ट्रेक वर झाला. शेवटी ७ लोक फिक्स झाले.

२५१ रुपयात मोबाईल !!

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी बुधवार, 17/02/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
‘रिंगिंग बेल्स‘ या कंपनीनी ‘फ्रीडम 251‘ ह्या नावाने स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली आहे. उद्या तारीख १८ फेब्रुवारी पासून सकाळी ६ पासून या मोबाईल चे registration सुरु होत आहे.. www.freedom251.com हि वेबसाईट चेक करा . फोन ची माहिती: चार इंचाचा डिसप्ले असलेल्या स्मार्टफोनमध्ये 1.3 गीगाहर्टझचे क्वाडकोर प्रोसेसर आहे. तसेच एक जीबी रॅम, आठ जीबी इंटर्नल मेमरी, 3.2 मेगापिक्सेल कॅमेरा. मी नेट वर वाचलेल्या काही रंजक प्रतिक्रिया. १) फक्त २५० हा हा हा आकाश ट्याब चे काय झाले ? २) छान.. आमचे भारतीय तिथे पण भाव कमी करतील..

लदाख सायकल ने : मटायन ते श्रीनगर (भाग १८)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी बुधवार, 17/02/2016 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
साडे सहा वाजता मटायन मध्ये पोहोचलो. छोटंसं गाव आहे. मुसलमान जास्त असल्या कारणाने मस्जिद पण आहेत. रस्त्याच्या कडेलाच दोन दुकाने दिसली. मुलांनी थांबवले. मला थांबायचेच होते. माहिती पडले कि, गावात कुठे राहण्याची व्यवस्था नाहीय. मी मुलांना गावात विचारायला पाठवले कि, शम्शा सारखेच राहण्याची व्यवस्था होईल का ते. पण सगळी कडून नकार आला. मग मी तंबू लावायचा निर्णय घेतला. मुलांच्या सांगण्या नुसार रस्त्याच्या एका बाजूला शेत मध्ये तंबू लावायचा निर्णय घेतला. तंबू लावायला मुलांनीच मदत केली. त्या नंतर मी त्यांचे फोटो काढले खूप खुश झाले.

(बाटा रुते कुणाला)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 17/02/2016 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
बाटा रुते कुणाला, आक्रसतात ऍक्शन रीबॉक मज रुतावे हा दैवयोग आहे सांगू कसे कुणाला कळ फाटक्या बुटांची शिवून आठ जागी मी चालतोच आहे डिस्काउंट येतो, टाकून 'अर्थ' देतो माझी निवड बुटांची घाईत होत आहे अस्सल असेल की चीनी माल आकळेना ब्रांडेड मागवोनी ही त्रस्त त्रस्त आहे -- स्वामी संकेतानंद
काव्यरस

(महवांची गाळ फुले)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 16/02/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
कवी वा. रा. कांत ह्यांची क्षमा मागूनच >> महवांची गाळ फुले अजुनि पिंपड्यात चोरपावली पळशी काय तू वनात? आले ते जोमात तीन शुंभ पोलिसाचे ओल्या रानात खुले दार गाळपाचे मनकवडा मग पळतो दूर डोंगरात ती जागा, ती भट्टी नारळिच्या खाली पूर्ण तोच लगबग मी मग करतो खाली रिमझिमते अमृत 'तो' विकल मंडईत हातांत लोहाचे बंध गुंफताना सगळ्यांना स्वच्छ कळे मिळुनि मोजताना कमलापरी मिटति दिवस उमलुनी सळ्यात तू गेलास सोडुनि तो माळ, सर्व अड्डे तडफडणे 'स्वामींचे' फक्त उरे खड्डे सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ? -- स्वामी संकेतानंद
काव्यरस

मागील वर्षीची माझी सोलापुर , तुळजापुर , पंढरपुर , नळदुर्ग भटकंती.

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 16/02/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, २०१४ च्या दिवाळीत मी सोलापुर , तुळजापुर , पंढरपुर , नळदुर्ग भटकंती केली. त्याचा संक्षिप्त व्रुत्तांत देत आहे. सोलापुर एक निवांत शहर. महाराष्ट्र कर्नाट्क आणि आंध्र प्रदेशातील भारतीय येथे गुण्यागोविंदाने राहतात. मला सोलापूरातील अर्थातच आवड्लेले ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर मन्दिर. विस्तीर्ण सरोवर आणि त्याच्या मध्यभागी वसलेले हे पवित्र शिवमंदिर अतिशय प्रेक्षणीय ठिकाण ! बाजूलाच सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे. सोलापूर ला एक दिवस राहून मी तुळजापूरला महाराष्ट्राच्या कुलदेवतेचे तुळजाभवानी चे दर्शन घ्यायला गेलो. त्यानंतर निवांत नळदुर्ग पाहिला.