Skip to main content

रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/03/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २०१६ मध्ये 'ज्ञानयोद्धा' नावाची काही एक व्याख्यानमाला झाली असावी, रमेश ओझा नावाचे कुणि एक गांधीवादी आहेत त्यांचे या व्याख्यानमालेत रास्वसंघाची ९० वर्षे या विषयावर भाषण झाले असावे; ज्याचे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने वृत्तांकन केले होते. , रमेश ओझांनी रा.स्व.

मागे वळून पाहताना

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 12/03/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा स्त्रोत रे मामा गाडी पकडलेली पाहताना त्रास होतो- मागे पळून गाडी पकडू नकोस! आठवून भूतकाळ वाईट वाटतं- नंबरप्लेट तू पाहू नकोस! दिल्या-घेतल्या पावत्यांची फिकिर तू करू नकोस पकडलेल्या गाडीस दया बिलकूल दावू नकोस! गेलास निघुनी गाडीची चाबी घेउनी आता पैसे नाकारु नकोस या चौकात भेटलास , कृपया पुढल्या चौकात भेटू नकोस!! (ताजी कविता- आताच 9/10वाजता हाफिसात येताना केली होती.)
काव्यरस

युटा आणि अरिझोनाचे वाळवंट - भाग १

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 12/03/2016 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीच्या निमित्ताने सध्या आम्ही अमेरिकेतील युटा राज्यात राहत आहोत. निसर्गसौंदर्य म्हणजे घनदाट झाडी, डोंगर-दऱ्या आणि हिरवा रंग हा माझा आपला उगाचच (गैर)समज होता. युटा हे खरेतर वाळवंट, त्यामुळे मला इथे आल्यानंतर फार काही निसर्गसौंदर्य वैगेरे पहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. पण इथे आल्यानंतर ग्रैंड कॅनियनबद्दल ऐकले. ऐकून फार काही नवल असेल असं वाटलं नाही. कॅनियन म्हणजे मोठ्या डोंगरांच्या मधील खोल दरी. बऱ्याच कॅनियनमधून नदी किंवा पाण्याचा प्रवाह वाहताना आढळतो. ग्रैंड कॅनियन या अमेरिकेतील युटा, अरिझोना आणि नेवाडा या ३ राज्यांमध्ये पसरल्या आहेत.

हिवाळ्यातला लदाख - सुरुवात (भाग १)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शुक्रवार, 11/03/2016 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
1 . --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिवाळ्यातला लदाख : दिल्ली वरून सुरुवात (भाग १)

हा प्रवास आमचे मित्र नीरज यांनी जानेवारी २०१३ मध्ये केला होता. हिवाळ्यामध्ये लदाख कसा दिसतो? एवढ्या थंडीत तिथले लोक राहतात कसे, जगतात कसे ?

सायलेंट ऑबझव्हर, सोनोग्राफी, आणि सेक्स रेशो तसेच बायल्ये

लेखक गॅरी शोमन यांनी शुक्रवार, 11/03/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या एक माणसाने अथक प्रयत्न करुन सायलेंट ऑबझर्व्हर नावाचे एक सयंत्र शोधुन काढले त्याचा सत्कार "चला हवा येऊ द्या" कार्येक्रमात ८ मार्च च्या दिवशी अनेक स्त्रीयांनी केला हे आपण पाहीले असेल. परदेशात नोकरी करुन भारतात स्थायीक झालेल्या माणसाने हे उपकरण शोधले जे सोनोग्राफी मशीनने काय काय दाखवले ते रेकॉर्ड करते. हे रेकॉर्डींग पाहिले की समजते की सोनोग्राफी सेंटर्स ना सेक्स रेशो संदर्भात किती सामाजीक जाणिव आहे.

श्री गिरनार -दत्तात्रेयांचे अक्षय निवास स्थान

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 11/03/2016 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्षांपासून गिरनारला जायचे मनात होते.आम्ही २-३ मित्र भेटलो कि गप्पांमध्ये गिरनार चा विषय हटकून निघायचा.मग त्यातला एक जण परस्पर गिरनारला जाऊन आला आणि एकटाच जाऊन आल्याबद्दल त्याने आमच्या शिव्या खाल्ल्या. मग काही महिने आम्ही त्याच्या मागे लागायचो कि आम्हालापण गिरनारला घेउन चल आणि तो हि जाऊ जाऊ करायचा पण ते काही जमत नव्हते. कधी सुट्टी नाही, कधी कोणीतरी परदेशी गेलाय कधी कोणी आजारी आहे अशी काही न काही कारणे निघायची.असे करता करता अनेक वर्षे गेली.मी जमेल तशी गिरनार बद्दल माहिती गोळा करतच होतो. जे लोक जाऊन आले त्यांच्याशी बोलत होतो.१-२ पुस्तकेही आणून वाचली.