बागेसंदर्भात सल्ला हवा आहे
गावाकडे म्हणजे विदर्भात एक 50ft×96ft एक प्लॉट घेतलाय. आजूबाजूला सध्या तरी उघडे माळ आहे. या प्लॉटवर आईबाबांना विरंगुळा म्हणून आणि त्यांची नातवंडे गावाकडे आली की त्यांच्यासाठी नवल आणि बदल म्हणून एक छोटीशी बाग उभी करायचे योजिले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ईशान्य कोनावर बोर घेतली. पाणी भरपूर आहे. वीज जोडणी आणि सबमर्सिबल पंप ही दोन्ही महत्वाची कामे झाली आहेत. माळ असल्याने पक्के कुंपण उभारणीचे काम सध्या सुरु आहे. एक 12×12 ची पूर्वाभिमुख खोली, संडासबाथरूम एक कोपऱ्यात असेल. ईशान्येलाच बोअरशेजारी गेट असेल.
बाग नेमकी कशी असावी यावर घरी सध्या भरपूर काथ्या कुटला जात आहे.
मिसळपाव
खूप लहानपणी जळगावला राहत असतांना घराजवळ, मोरॅको रेस्टॉरंटजवळ समोरासमोर दोन पेपरचे स्टॉल होते आणि तिथे बरीच गोष्टींची पुस्तकंही मिळायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत आई-बाबांना पटवून कित्येक पुस्तकं विकत घ्यायचो आणि घरात किंवा बाहेर बागेत वाचत असायचो तासंन-तास! अगदी काल-परवापर्यंत त्यातील 'जांभळ्या दाताची राजकन्या' होतं माझ्याकडे, मग कुठे गेलं काय माहित! असो!