Skip to main content

सायकलीशी जडले नाते २९: नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 29/04/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सत्यनारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 29/04/2016 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे. मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते.

बधुंद (भाग ७)

लेखक अविनाश लोंढे. यांनी शुक्रवार, 29/04/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षाला काय बोलावे हे कळेना ! त्यात शिवेकाच्या डोळ्यातील 'अश्रूत' त्याला त्याच प्रेम वाहताना दिसू लागलं . त्याने काहीच न बोलता आपला उजवा हात तिच्या खांद्यावर ठेवत तीला अजून जवळ ओढले . आत्ता वासनेला काहीही वाव नव्हता , मनात फक्त 'आत्ता पुढे काय ? ' नकळत त्याचा हात तिच्या नाजूक , मध्यम आकाराच्या स्तनांना लागला . झटका लागावा तसा त्याने हात मागे घेतला ! शिवेका ने पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहिलं अन त्याचा हात तिने आपल्या छातीवर ठेवला अन त्याच्या हातावर तिने आपला हात ठेवला .अक्षा तिच्याकडे बघतच राहिला . पुढच्या वादळाची कल्पना आता आली होती . तो आता तिच्या स्पर्शाने पेटेनासा झाला .

सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : १ :

लेखक जगप्रवासी यांनी शुक्रवार, 29/04/2016 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
"तुमका येउक लागात, तुमचे पैशे भरलय मी" "माझा काय काम थय, आणि येउन करुचा काय हा???" "काय करुचा मंजे, आमच्या वांगडान किल्लो फिरा, आम्ही काय बघताव ता बघा. ते आपल्याक माहिती सांगती ती ऐका, मग तुमका पण कळात आम्ही कशाक भटकताव ते" "माझे घुडगे दुखतत त्यांका काय आग लावू" "मी पट्टी आणलंय, ती लावा आणि चला" आणि शेवटी वडील सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेकला यायला तयार झाले. यावेळच्या ट्रेकची उत्सुकता होती ती वडिलांना देखील गड किल्ले फिरवायची. सगळी तयारी करून एकदाचा ट्रेकचा दिवस मावळला, मावळला कारण आम्हाला रात्रीच्या मंगलोर ट्रेन ने प्रवास करायचा होता.

सायकल राईड - शिरकोली यात्रा

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 29/04/2016 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या एका मित्राच्या गावी; शिरकोलीला यात्रेचे आमंत्रण आले आहे. शनिवारी निघून रविवारी परत..!!" असा संदेश किरणने ग्रूपवर टाकला आणि पटापट "हो येणार", "चुकवणार नाही", "फायनल रे" असे रिप्लाय आले. यात्रा, बगाड, गांवरान चिकन-मटण आणि कँपिंग वगैरे गोष्टी असल्याने या राईडचे फारसे प्लॅनींग झालेच नाही. सगळे जण लगेचच तयार झाले. माझ्यासह कांही मित्रांची सायकल अनेक दिवसांपासून (की महिन्यांपासून) घरातच विसावली असल्याने सायकल राईडचे निमीत्त हवेच होते. त्यामुळे गाडीने जायचे की सायकलने हा मुद्दाही लगेचच निकाली निघाला. शिरकोली - पानशेत धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेले एकदम छोटे व टुमदार गांव.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - २

लेखक मेघना मन्दार यांनी शुक्रवार, 29/04/2016 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला भाग दुसरा - आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते २३ January २०१६. सगळी तयारी झाली होती. हिवाळ्यामध्ये UK फिरायला जाणार असाल तर भरपूर गरम कपडे न्यावे लागतात. आणि हो तिथे लेयर्स मध्ये कपडे घातले म्हणजे एकावर एक ३/४ कपडे घालायचे आणि सगळ्यात वरचा लेयर म्हणजे तुमचं जाकीट किंवा स्वेटर. हे सगळं घातल्यावर मग तुम्ही आरामात फिरू शकता. आमचा तिथे राहायचा प्रश्न नव्हता कारण नवऱ्याला कंपनी कडून सर्विस अपार्ट्मेण्ट मिळणार होतं तिथे राहणार होतो आम्ही. सगळी तयारी झाली होती आणि आता फक्त घरून निघायचीच वाट बघत होतो.

कस सांगु ???

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 29/04/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय बायको... कस सांगु??? माझ्यासाठी कोण आहेस तू तू झुळुक हळुवार हवेची तू सांज रिमझिम सरीची मी अलगद मदहोश होतो अशी तू धुंद कळी निशिगंधाची तू एक ओढ़ हवीहवीशी तू एक नशा अनिवारशी मी नकळत हरवत जातो जेव्हा चाले जादू तुझ्या डोळ्यांची तू क्षितिज माझ्या स्वप्नांचे तू आभाळ माझ्या विश्वाचे मी घेतो भरारी तुझ्या पंखाने तू घरपण माझ्या घराचे जरी भेटे रोज, तरी नवी तू नको जग सारे, फ़क्त हवी तू माझ्या अस्तित्वास अर्थ तूझ्यामुळे या खरचं कस सांगु??? की माझ्यासाठी कोण आहेस तू तुझाच जबरा Fan नवरा

मराठी भाषा प्रेमींचा कट्टा

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 29/04/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, १ मे च्या महाराष्ट्र दिनानिमित्त मायमराठीवर प्रेम करणार्या लोकांचा सर्वसमावेशक कट्टा उद्या संध्याकाळी संभाजी उद्यान, पुणे येथे आयोजीत करण्यात आला आहे, ज्यात मराठी ब्लाॅगर्स, इतर मराठी संस्थळावरील आयडी हजेरी लावू शकतात. वेळ: शनि. दि. ३० एप्रिल २०१६, संध्याकाळी ५ ते ८ कट्ट्यानंतर रात्री सुकांताला आमरस थाळीचा पर्याय उपलब्ध आहेच. अधिक माहितीसाठी येथेही पाहावे.

वाबळेवाडीची शाळा - विलक्षण प्रेरणादायी अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 29/04/2016 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.h… ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं.

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 28/04/2016 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उड उड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ !