Skip to main content

यक्ष प्रश्न - भस्मासुराला वरदान देणारे

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 19/05/2016 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
भस्मासुराची कहाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे. तरीही थोडक्यात सांगतो. भस्मासुराने उग्र तपस्या केली. महादेव प्रसन्न झाले. भस्मासुराने वरदान मागितले, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो भस्म होईल. महादेवाने पुढचा काहीच विचार न करता तथास्तु म्हंटले. भस्मासुराने महादेवाने दिलेल्या वरदानाचा प्रयोग महादेवावारच करण्याचे ठरविले. महादेवाला स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. महादेवाने भगवान विष्णूंचा धावा केला. भगवंताने मोहिनी रूप धारण केले. स्वत:च्याच डोक्यावर हात ठेऊन भस्मासुर भस्म झाला. इति. भस्मासुराची कथा काल्पनिक असली तरी त्यात सर्वकालिक सत्य दडलेले आहे.

सरदार दिठेरीकरांची गढी - कथा - काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी गुरुवार, 19/05/2016 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार दिठेरीकरांची गढी - कथा - काल्पनीक शहरातुन दुपारी बाराच्या सुमारास निघालेली जीवनराज ट्रॅव्हल्सची बस दिठेरी गावापाशी आली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. बसमधील प्रवासी जरा पेंगुळले होते . बसमध्ये पुढच्या सीटवर बसलेले टुर मॅनेजर श्री. कारेकर हे सर्व प्रवाशांना तत्परतेने माहिती सांगु लागले . "मंडळी , दिठेरी नदीच्या काठी वसलेले गाव म्हणुन या गावालाही दिठेरी किंवा दिठेरीवाडी असे म्ह्णतात . आपण चाललो आहोत ते ठिकाण इथुन फार लांब नाही . फार तर अर्धा तास . आता हा उजवीकडे जाणारा रस्ता दिठेरी नदीवरील पुलावरुन जातो . हि नदी ओलांडली की ते पहा दिठेरी देवीचे मंदिर लागते.

मराठी ने समृद्ध केलं...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 19/05/2016 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीशी जवळीक-साधल्यामुळेच मला जगातील सर्वोत्कृष्ट कृतींचा आनंद उपभोगता आला. काही गोष्टी आयुष्यांत कां घडतांत, याला तात्पुरतं जरी उत्तर नसलं तरी त्याचे दूरगामी परिणाम सुखद असतात. मी बघितलेला पहिला इंग्रजी चित्रपट व इंग्रजी नावेल दोन्हीं हिटलरशी संबंधित होते, हा योगायोग असेल. चित्रपट होता चार्ली चैप्लिनचा-‘दि ग्रेट डिक्टेटर’, नावेल-इर्विंग वेलेस चं ‘दि सेवंथ सीक्रेट’ प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. वयाच्या एका ठराविक टप्यावर ही आवड निर्माण होते. त्या वयात मला देखील शास्त्रीय संगीताची ओढ लागली. रेडियोवर मी मनमुराद मराठी-अमराठी गायक ऐकले. आज देखील खूपशा बंदिशी तोंडपाठ आहेत.

एक ओपन व्यथा २

लेखक वटवट यांनी गुरुवार, 19/05/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं अत्यंत गूढ घर असावं. त्या घराबद्दल खूप मतमतांतरे असावीत. बर्याच जणांची त्या घराबद्दल वेगवेगळी धारणा असावी. ह्या अश्या कुतुहुलमिश्रीत वातावरणात त्या घराकडे सगळे शंकित नजरेने बघत असावेत. त्या घराबद्दल, त्या घरामध्ये राहणार्या माणसांबद्दल नक्की आणि खात्रीलायक माहिती कोणालाच नसावी. आणि त्याचवेळेस त्या घरामध्ये जायचीही तयारी कोणाची नसावी. अश्यावेळेस एकानं धाडस करून त्या घरामध्येच जाऊन चौकशी करण्याचे ठरवावे. गेट उघडून आत जावे. आणि आता दार ठोठावण्याचा विचार करावा.

हाती लागलेले मृगजळ - 'लास वेगस'

लेखक हृषिकेश पांडकर यांनी गुरुवार, 19/05/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाने ताटात वाढून ठेवलेलया पदार्थांचा उपभोग घेणे ही पर्यायाने सोपी गोष्ट आहे.सोपी असलेली गोष्ट देखील आपण पूर्णपणे करत नाही हा भाग निराळा.बरेचदा या निसर्गाच्या वरदहस्ताची अवहेलनाच दिसून येते.दुर्दैव देणार्याचे कि आपल्यासारख्या स्वीकारणाऱ्याचे हा प्रश्न तितकाच अनुत्तरीत.

हर्बल टी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 19/05/2016 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा गांधीभवन कोथरुड ला निसर्गोपचार आश्रमात एक व्याख्यान ऐकायला गेलो होतो. तिथे पाहुणचार म्हणून मला हर्बल टी दिला. मी प्रथमच तो घेतला. प्यायल्यानंतर तो चांगला वाटला. हा हर्बल टी नेमका काय प्रकार आहे? तो कसा करायचा? तो कुठे मिळतो?

अळवावरचे पाणी (नागपूर डायरी-२)

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 19/05/2016 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
अळवावरचे पाणी (नागपूर डायरी-२) दीर्घ काल नागपूरला रहाण्याचा गेल्या पंचेचाळीस वर्षातला हा पहिलाच प्रसंग. त्यामुळे पंचेचाळीस डिग्री तापमान, (कदाचित त्यामुळे) जिकडे तिकडे अंगात भिनलेली सुस्ताई, सतत ऐकू येणारा नकारात्मक दृष्टीकोन, अशा कित्येक गोष्टीना आता सामोरे जावे लागणार आहे या काळजीने मी पछाडलो होतो. पण सगळ्यात जास्त त्रास देणारी त्रुटी म्हणजे विनासायास मिळणारे, विसंबून रहाता येईल असे जनता वाहन. आणि माजलेले उर्मट ऑटो रिक्षा चालक. या आधी नागपूरला जेव्हा आलो, तेव्हा फक्त दोन तीन आठवड्यांच्या सुट्टीसाठी असायचो. मजा करायला आलो आहोत, तर कशाला मनाला लावून आपलीच मजा किरकिरी करायची?

अजनी, एपी आणि ती उडी

लेखक महामाया यांनी गुरुवार, 19/05/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडून उठलो. सामान घेऊन दारा जवळ पोचलो, इतक्यांत अजनी स्टेशनचा पहिला साइनबोर्ड मागे गेला. मी पिशवी खांद्यावर चढवली, सूटकेस डाव्या हातात घेतली आणि उजव्या हाताने दांडा धरुन शेवटच्या पायरी वर आलो. आता गाडीचा वेग वाढू लागला होता, आणि मी उडी घेतली...! आयुष्यांतील काही क्षण अविस्मरणीय असतांत. एखादी घटना घडत असतांना त्याचं अप्रूप वाटत नाही, नंतर कधीतरी ती घटना आठवतांना जाणवतं की आपण काय दिव्य केलं होतं...! जरा काही बरं-वाइट झालं असतं तर...! आईचं माहेर असल्यामुळे लहानपणी वर्षातून एक चक्कर नागपूरचा व्हायचाच.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न

लेखक मार्गी यांनी बुधवार, 18/05/2016 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न आपण आधी बघितल्याप्रमाणे आज मोठ्या प्रमाणात निसर्गामधलं असंतुलन वाढतं आहे. ह्युमन चेंजमुळे पर्यावरण बदलत आहे. मानवाच्या आज आहे त्या प्रकारच्या अस्तित्वामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात बदलतं आहे.

रगडा पॅटीस

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 18/05/2016 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
45 डिग्री सेल्सियसचा कडक उन्हाळा. फुल स्पीडच्या फॅनखालीपण घाम फुटण्याची दाट शक्यता. कॅम्पूटरवर ऑटोकॅड उघडून मशीन डिझाईन करण्यात गुतून गेलेलं एक नवीन जॉईनींग. अन पलिकडच्या टेबलावर बसलेला एक जुना बोका. "'मघधीरा' हाय कारं तुज्याकडं?" समोरच्या टेबलावर रिकामं बसलेलं एक बेळगावी सॅम्पल. हा बोक्याचा नातेवाईक. हा रिसेपनिस्ट कम प्यून कम हेल्पर कम ऑपरेटर असा ऑल इन वन बळी. बोका एक तुच्छ कटाक्ष त्याचाकडे टाकतो. अन पुन्हा कामात गडून जातो. शेडवर बसलेला कावळा क्वॉक करतो "सर, हे गिअर इथे कसे टाकायचे ?" नवीन जॉईनींगला अचानक पडलेला प्रश्न. बोका उठतो अन दोन चार कमांड टाकून सरळ गिअरच बनवून देतो.