Skip to main content

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -६

लेखक मेघना मन्दार यांनी बुधवार, 25/05/2016 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग सहावा - हा भाग टाकायला सुद्धा जर उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व !! सर्व वाचकांचे मनापासून आभार :) वीकांत असल्याने आज जरा निवांत चाललं होतं. आज ग्रीनिच ला जाणार होतो. नाश्ता करून घराबाहेर पडलो. ग्रीनिच ला जाण्यासाठी आपल्याला स्टेशन बदलून जावं लागतं म्हणून सर्वप्रथम आम्ही बँक स्टेशनवर आलो जिथून DLR लाईन जाते. हीच लाईन पुढे ग्रीनिचला जाते. हा प्रवास खूप छान झाला कारण त्याचं एक वैशिष्ठ्य होतं ते असं की या लाईन वरून जाणाऱ्या काही ट्रेन्स या बिना चालकाच्या आहेत. आपणच चालक असं समजून पुढे बसायचं. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यात पुढची जागा पटकावली. आणि ही स्वयंचलित ट्रेन निघाली.

व्हिडीओ शूट

लेखक चाणक्य यांनी बुधवार, 25/05/2016 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
......आणि मग थोडं पुढे गेल्यावर मला दिसला एक नेता जो देत होता आश्वासन कसलेतरी पाच वर्षापूर्वी तो हेच बोलला होता...असं मला पाच वर्षापूर्वी वाटलं होतं ते आठवलं . . पुढे जात होतो तसतसं बातम्या ऐकायला येत होत्या रोज एक पुतळा पडल्याच्या काही पुतळे बनले होते घाईघाईत तर काहींना लोकांनी पाडले होते काहीचे पायच तकलादू होते म्हणे तर काहींची डोकी फार उंच गेल्यामुळे तोल गेला होता काही मात्र पडले होते हकनाक ....माझ्या शहरात खूप पुतळे झालेत . . थोड्या वेळाने एका डोंगरावर चढलो तिथून दिसत होती ठिकठिकाणी भांडणारी लोकं काहींकडे कारणं होती भांडायची काही विसरून गेली होती कारणं भांडता भांडता काहींना माहिती नव्हती

वादळचा उत्तरार्ध

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 25/05/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच रातराणीच्या कळते रे फॅनक्लबमध्ये सामील झाल्यावर त्यांच्या जुन्या कथाही वाचून काढल्यात आणि मग त्यांनी सुचविल्याप्रमाणे वादळ (शतशब्दकथा)चा उत्तरार्ध लिहण्याचे ठरवले. पण शतशब्दाच बंधन नाही घालून घेतलं. रातराणी .. बघा काही जमलंय का ? जास्त टाकावू वाटल्यास संमना धागा उडवायला सांगा बिनधास्त. --------------------------------------------------------------------- नेहाशी बोलून त्याने फोन ठेवला.

मायीवाली ग्लोबल कविता

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 25/05/2016 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
'कविता वृत्तात हवी' 'हओ' 'कवितेला लय हवी' 'हओ 'कवितेत सुयोग्य यमक हवेत' 'हओ 'कविता जगातल्या कुठल्याही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी हवी' 'मंजे?' 'म्हणजे कविता ग्लोबल हवी रे' 'अच्छा!

बारा अमावास्यांचे अंधार

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 25/05/2016 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
संभोगावेशात मला तू एकट्याला सोडून गेलीस तेव्हा बारा अमावास्यांचे अंधार भोवती दाटून आले अन् आठ दिश्यांची वादळे अंगात भरून राहिली मग अनामिक ग्लानीने मी कोसळून पडलो. तू दिलेल्या सुगंधी सहवासाची आवर्तने भोवती रुंजी घालू लागली अन् मनात दाटले वासनामृग आवेशी गवतांचे भाले कुरतडू लागले, सारी हिरवळ नष्ट होवून मातीला सूर्य दिसू लागला पण माझ्याभोवती दाटलेल्या अंधाराला माझी दया आली नाही.

ज्याची योग्य तक्रार त्यालाच परतावा....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी बुधवार, 25/05/2016 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
cOMPLAINTS अनुभव 1 - कोथरुड, पुणे येथे जाण्यासाठी एसटीच्या सात बंगला - जेजुरी गाडीचं तिकिट मी काढलं. बसच्या ठिकाण म्हणून माझ्या घराजवळच्या थांब्याचं नांव दिलं. तिकिट एसटीच्या अधिकृत आरक्षण केंद्रावर काढलेलं असल्यामुळे मला रीतसर संगणकीकृत तिकिट मिळालं.

एक्सेल एक्सेल - भाग १ - रकान्यांचं जाळं

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 25/05/2016 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एक्सेल हे सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर या दोघांची नाळ इतकी घट्ट आहे की एक्सेलशिवाय कॉम्प्युटरचा विचारही करता येत नाही. विशेषतः आमच्यासारख्या आकडेमोड करणार्‍यांना तर कॉम्प्युटरची प्रत्येक गोष्ट एक्सेलशीच खातात असं वाटतं. पण या सॉफ्टवेअरबद्दल बहुतेकवेळा प्रचंड बाऊ असतो अनेकांच्या मनात. मोठाले डेटा, लांबचलांब फॉर्म्युले हे सगळं काहीतरी अगम्य आहे असं मानून 'ते एक्सेल वगैरे मला जमत नाही' असं डिस्क्लेमर देऊन टाकतात बरीच मंडळी. हे एक्सेल माझ्या कुवतीनुसार, माहितीनुसार सोपं करण्याचा हा प्रयत्न जानेवारीपासून मी लोकमत वृत्तपत्रातून करतोय. दर सोमवारी ठाणे पुरवणीत मी एक्सेलबद्दल लिहितो.

जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 25/05/2016 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
*************************************** मी तरी कोठे स्वतःचे मोजतो निःश्वास आता डाव मांडायास कोठे राहिला सहवास आता भोवताली गारद्यांचे कृर जथ्थे केवढाले आरशाला टाळतो, जपतोच मी जीवास आता मरण झाले यार आता रंगते मैफल स्मशानी जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता ऊन्हओल्या सावल्यांचे सोसले चाळे मुक्याने पावसाचा थेंब नाही कोरडे आभास आता कोण येतो कोण जातो खूण ना उरते कशाची 'चित्रगुप्ताच्या' सहीला मागणी हमखास आता *************************************** विशाल २३-५-२०१६
काव्यरस

वारूळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 25/05/2016 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी सुटता सुटता टिपला फलाटावरील माणसांच्या दलदलीत रुतलेला तुझा कमळासारखा देखणा चेहरा.. स्लीव्हलेस ब्लाऊज व साडीतला तुझा मादक रेखीव आकृती बंध.. काहीतरी पडलेल उचलण्या साठी वाकली तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं.... गाडी सुटता सुटता ओझरतं झालेलं तुझं दर्शन रात्र झाली की क्षिताजा पर्यंत पसरते अंधाराची चादर निरव शांतता करते गप्प सारा कोलाहल.. अश्या वेळी क्षितिजा पालींकडून खुणावत असतो तुझा देखणा मादक आकृती बंध मला वारंवार अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत... अविनाश

आईचा विश्वास सार्थ ठरवणारी-एलिजाबेथ टेलर

लेखक महामाया यांनी मंगळवार, 24/05/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अाठवणीतला हॉलीवुड/ दोन-’नेशनल वेलवेट’ आपल्या भारतीय समाजात लहानपणापासून मुलांच्या आवडी-निवडीकडे बारीक लक्ष्य दिलं जातं. त्यांचे सारे हट्‌ट पुरविले जातात, कौतुक केलं जातं. पण मुलींबद्दल असा दृष्टिकोण सहसा वापरला जात नाही.