Skip to main content

उद्या रत्नागिरीला एक छोटासा कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/06/2016 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मी उद्या दुपारपासून रत्नागिरीला आहे. बुधवारी सकाळी परत मुंबईला येणार आहे. बरेच दिवसापासून रत्नांग्रीकरांना भेटायची इच्छा होती, ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण होईल, अशी आशा आहे. आपला लोभ आहेच. तो अशा भेटी-गाठीने वाढेल अशी अपेक्षा, आपलाच मुवि

"इंटरेस्ट"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 06/06/2016 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
उद्योजक असताना ब्यांके कडूनं कर्ज घेतले..नियमाप्रमाणी क्वारट्रली "ईंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला. यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."इंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाही.. यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना.. या वर त्याने एक गोष्ट सांगितली.. नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेंढी होती.. पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत.. एकदा अचानक पेशव्यांना पैशाची गरज लागली...

पुरुषी अहंकार.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 05/06/2016 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
जास्त तोंड वाजवू नकोस अन अक्कल शिकवू नकोस ...गृहिणी आहेस घर व पोर सांभाळ नीटं अन भाक-या भाज...बिनडोक ..मला शिकवतेय...... श्रीमंत यशस्वी बिझनेस मन नवरा चिडून बोलला.. . मिळालेली "मास्टर डिग्री..ति बक्षिसे कॉलेज मधली..अन त्याच्या प्रेम व हट्टापायी सोडलेली नोकरी तिच्या डोळ्या समोरून तरळून गेली.. व डोळ्यात पाणी तरारले...

सुबह का भूला शाम को घर लौट आए तो...-कैथरीन हेपबर्न

लेखक महामाया यांनी रविवार, 05/06/2016 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघतेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अविस्मरणीय हाॅलीवुड/ चार ‘वूमन ऑफ दि इयर...’ नायिकेला घरा ऐवजी समाजसेवेत ज्यास्त इंटरेस्ट आहे.

मामाडे लेनेस वलुरकेस

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 05/06/2016 19:18 या दिवशी प्रकाशित केले.

भूतकाळ - (सुमारे २१०० वर्षांपूर्वी. शकसंवताच्याही आधी सुमारे दिडशे ते दोनशे वर्षे )

एक संघ मैदानातला - भाग १३

लेखक शि बि आय यांनी रविवार, 05/06/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही सगळ्याजणी दादा कधी परत येतायत आणि काय सांगतायत ह्याची वाट बघत होतो. आमचं आवरून झालं होत.मेस मध्ये जाऊन जेवण आणि मग रूमवर धतिंग हा अघोषित कार्यक्रम होता. ह्यावेळी 'चद्दर प्रोग्राम'चा बकरा कोण ह्याचा मी आणि योग्या विचार करत होतो. आमच्या डोळ्यांनी चाललेल्या खाणाखुणा दीदीने पहिल्या आणि डोळे वटारले. आम्हीही निर्लज्जासारखं स्माईल दिलं आणि बकरा शोध मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं. तेवढ्यात डुलत-डुलत दादा आले. "दादा... कशाला आले होते ते ? काय म्हणाले ?" आम्ही दादांवर आँलमोस्ट झडप घातली. " अरे.. काय आहे हे.. थांबा जरा..

आयड्याबाज

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 05/06/2016 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
गांव जन्मल्यापासून म्हणा किंवा मग देशात आमदार-खासदार निवाडायची प्रथा चालु झाल्यापासून म्हणा, पहिल्यांदाच या गावाला कुणी आमदार भेट द्यायला येणार होता. मागचे इलेक्शन झाल्यापासुन जवळपास पाच वर्षात या गावाची लोकसंख्या दोनावरून चारावर गेली. बहुदा त्याचेच गणित बांधुन ही भेट योजिलेली असावी. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच विनायकराव एकटेच डोक्याला हात लाउन बसलेले. पाच दिवसांनी आमदार साहेब येणार ही गोष्ट त्यांना आजच समजलेली. ती समजल्या पासून विचार करुन करुन त्यांच्या डोक्याचा पार खुळखुळा झालेला. आता पुढल्या दोन चार महिन्यात आमदारकीचे मतदान. म्हणजे साहेब आले की जाऊन थेट लोकायलाच भेटनार.

गाढवा समोर वाचली गीता - गोंधळ घालणारा गाढव ?

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 05/06/2016 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
गाढवा समोर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. हि मऱ्हाटी म्हण कित्येक वेळा वाचली किंवा ऐकली असेल. नेहमीच मनात एक प्रश्न उभा राहतो, गाढवाला मिठाच्या आणि कापूसाच्या गोणीतला फरक कळला नाही. कापूस घेऊन पाण्यात उतरल्या मुळे त्याची कंबर मोडली. गाढवाला अतोनात कष्ट सहन करावे लागले. जर गाढवाला मीठ आणि कापूस यातला फरक माहित असता तर तो कापूसाची गोणी घेऊन नदीत उतरला नसता. गाढव अडाणी होता, पण अडाणी माणसाला गीता किंवा उपदेशातले काही समजले नाही तरीही तो गोंधळ निश्चित घालणार नाही.

भुजणं/भुजणे

लेखक उल्का यांनी रविवार, 05/06/2016 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही रेसिपी एका मिपा मैत्रिणीला हवी होती. मग इथेच दिली म्हणजे इतरांना पण उपयोग होईल. भुजणं अनेक प्रकारे बनवतात. ते जाडसर असतं. मुख्य घटक कांदा, आलं, लसूण, ओले खोबरे, कोथिंबीर आणि ओल्या हिरव्या मिरच्या हे हवेतच. मी ज्या प्रकारे बनवते ती कृती इथे देते आहे. मी फक्त बोंबलाचे भुजणे बनवते. परंतु बटाटा, वांगे, पापलेट, कोलंबी ह्याचे पण बनवता येते.

उपनिषदे-५

लेखक शरद यांनी रविवार, 05/06/2016 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...