Skip to main content

वॉर्स ऑफ द रोजीस-भाग 1

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 04/08/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
'वॉर्स ऑफ द रोजीस' या अतिशय गुंतागुंतीच्या युद्धमालेबद्दल थोडक्यात माहिती देणं अतिशय कठीण. या 'कझीन्स वॉर'ने इंग्लंडच्या इतिहासात बऱ्याच उलथापालथी घडवल्या. त्याबद्दल शक्य तितकं सुसंगत आणि जमेल तेवढं थोडक्यात माहितीपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. 'वॉर्स ऑफ द रोजीस' म्हणजे 'गुलाबांची युद्धे'. प्लँटाजीनेट वंशाच्या लँकेस्टर व यॉर्क या उपशाखा. लँकेस्टरांचं चिन्ह लाल गुलाब व यॉर्कांचा पांढरा. म्हणून या साधारण १४५५ ते १४८७ दरम्यान झालेल्या दोन घराण्यांमधील युद्धांना अशा नावाने ओळखले जाते. लँकेस्टर इंग्लंडचे राजे होते आणि पाचव्या हेन्रीच्या मृत्यूपर्यंत(१४२२) सगळे बरेच सुरळीत चालले होते.

असतं

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 03/08/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य जरी असलं अवघड खूप काही शिकवत असतं उतरत्या चंद्रकले प्रमाणे जीवन आपलं सरत असत नवी दोस्ती नवं नात जोडणं जरी सोपं असत एकदा जोडल्यानंतर मात्र टिकवणं मोठं कसब असत बघू-करू म्हणता म्हणता आयुष्य सर्रकन सरकत असत  आठवणींचे मोती ओवता ओवता म्हातारपण येत असत सरणावर देह विसावतो तेव्हा जगणं आपलं संपत असतं तिथवर पोहोचण्याआधी मात्र माणूस म्हणून जगायचं असतं ---------- 149
काव्यरस

जी नाईन

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 03/08/2016 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यात कालवा इतका झाला की शंकर्‍या उठलाच. खाटेवर टेकलेल्या बूडाचा आधार घेउनच अशी गिरकी फिरली की पाय खाटेखालच्या बुटावर आले. स्लीव्हलेस टीशर्टाचे खांद्यावरचे दोन कोपरे बोटाच्या चिमटीत पकडले गेले. एक हिसका देऊन दोन्ही हात सवयीने कानावरच्या केसातून फिरले. हात फिरले म्हणण्यापेक्षा हात जागेवर राह्यले, मान पुढे मागे झाली. बुटाची चेन ओढली गेली. मोरीतल्या पाण्याचा हबका तोंडावर बसला तसे ते ओले हात परत एकदा केसावर फिरवून शंकर्‍या खोलीबाहेर पडला. रस्त्यावर नेहमीचाच सीन. मामाच्या कॅन्टीनसमोर एक अ‍ॅक्टीव्हा आडवी पडलेली. टिपटाप युनिफॉर्मातला एक गोमटा जीव मम्मी कशी रिक्षावाल्याशी भांडतेय हे पाहतोय.

अननसाला सद्गती!

लेखक इन्ना यांनी बुधवार, 03/08/2016 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
घरी, आमच्या परिचितांच्या शेतातून अननस आले. पहिले दोन दिवस दुर्लक्ष्य केल, कारण ते कापणे साफ करणे कधी करून माहित नाही. ;) टिनातल्या चकत्याच वापरल्या होत्या. दोन दिवसांनी अननसाचा घमघमाट सुटला स्वैपाकघरात. मग म्हटल ह्याला सद्गती द्यावीच. मास्टर शेफ चे सलग काही एपिसोड नुकतेच सलग पाहिल्याने काहितरी भरभक्कम नावाच , नाट्यपूर्ण कराव अस घाटत होतं ( मनातल्या मनातच हां ) पण मग नवर्‍याच्या बंगाली मित्राच्या घरी खाल्लेली एक चटणी / रायत आठवल. लगेच आंतर्जालावर साकड घातल. अन एक रेसिपी हाताला लागली. करून पहायच ठरवल अन बरी झाल्यास फोटो टाकता यावेत म्हणून फोटो प्रपंच केला.

शेवटचा पदन्यास एक

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 03/08/2016 04:25 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा वर्षांपूर्वी एक तंत्रज्ञ काम करायचा हाताखाली, डॅरेन कोल्स्टन नावाचा. "आपलं काम बरं आणि आपण बरं" असा एकाग्र चित्ताने, इतरांमध्ये फारसा न मिसळता रहायचा. उत्तम कमावलेली शरीरयष्टी. त्यामुळे त्यामुळे एक श्वेतवर्णी आणि एक कृष्णवर्णी अशा नटखट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोन्ही सहकारी तंत्रज्ञ सहकारी कन्यका त्याच्या आगे-मागे रुंजी घालायच्या, पण हा कुणाच्या अध्ये-मध्ये न पडता, कानांत इअरफोन्स घालून गाणी ऐकत आपलं काम करीत रहायचा.

परीकथा - भाग दहा - फेसबूक स्टेटस २.३ - २.४ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 03/08/2016 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
१ जुलै २०१६ मल्हारी आमचे आधीपासूनच फेव्हरेट गाणे. परवा त्याला जरा तडका दिला. मी परीच्या मम्मीचा एक येल्लो कलर कुर्ता घातला आणि त्या गेटअप मध्ये परीसोबत नाचू लागलो. परीच्या मम्मीच्या शिव्या खाऊनही फार धमाल आली. परीलाही नक्कीच आली असणार. कारण काल पुन्हा ती मम्मीचा एक दुसरा कुर्ता घेऊन माझ्याकडे आली.. आणि म्हणाली, "हे घाल तू.. मल्हारी नाचूया" .. मग काय, धिस टाईम विथ ब्ल्यू कुर्ता.. सोबत परी गळ्याभोवती मम्माची ओढणी लपेटून.. आणि पुन्हा एकदा मल्हारी.. बजने दे धडक धडक.. ढोल ताशे धडक धडक :) .. बाकी या अवतारात एखादा सेल्फी काढून फेसबूकवर अपलोड करायचा मोह झालेला.. पण आवरला..

बादलीयुद्ध ३

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 02/08/2016 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक , दोन ------------------------------------------------------------------------------- मी बादलीचा बादली माझी मी बादलीतल्या 'मगा'चा 'मग' माझ्या बादलीचा आपण एक प्रथितयश कवी होऊ शकत नाही ही माझ्या हृदयातली एक भळभळती जखम आहे. चित्रं काढता काढता मला कविता करण्याचा नाद लागला. नादच.

हरवलेलं विश्व

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 02/08/2016 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
विमानाने उड्डाण केल आणि जयुने हलकेच निश्वास सोडून मान मागे टाकली आणि थोड़ी रिलॅक्स झाली. आज आयुष्यात पहिल्यांदाच ती एकटीच बाहेर पडली होती. त्यासाठी विजयशी तिने कितितरी वाद घातला होता. *** विमानात बसल्या बसल्या तिच्या मनात काही दिवासांपूर्वीच्या घटनांच्या आठवाणींचे आवर्त फिरत होते... ".....अग पण मला इतक्या लांब आणि ते ही 10/12 दिवस कस जमेल? तू मुलांना घेऊन जा ना त्यांच्या सुट्टीमद्धे. सोबत ललिताबाईंना पण घे. हव तर अजयच्या बायकोला पण विचार. ती येईल. हा काय हट्ट आहे?" विजय वैतागुन बोलत होता. "माझ्यावर आवाज चढवू नकोस विजय. मुलांना इजिप्त बघण्यात काय इंटरेस्ट असणार?

नको भुलू जाहिरातींना !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी मंगळवार, 02/08/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते.