Skip to main content

अतिरेक !

लेखक इल्यूमिनाटस यांनी गुरुवार, 18/08/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांचा अतिरेक झाला की मग मी कोणासोबत तरी बोलून मन मोकळं करतो, पण आज विचार केला की लिहून मन मोकळं करावं! वर्तमान पत्रात जाहिराती येतात , म्हणजे खूपच येतात. 'वर्तमान पत्रातील जाहिरातींचा अतिरेक' या विषयावर एक वेगळा लेख लिहावा लागेल! पण अधून मधून बातम्या सुद्धा येतात! नाही असं नाही! कसल्या असतात या बातम्या? दहशतवादाच्या आणि बलात्काराच्या. या दोन भयंकर समस्यांनी भारतालाच काय सगळ्या जगाला ग्रासलंय. दहशतवाद! हिंसेचा अतिरेक झाला की माणूस दहशतवादी होतो. आता या विषयावर बोलायला लागलं की आपसूकच एक वाक्य ऐकू येतं की "दहशतवादाला धर्म नसतो"! नसतोच मुळी.

माझा सायकल प्रवास….

लेखक नपा यांनी गुरुवार, 18/08/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
सेमिस्टर नंतर आपल्या गावी आपण सायकल वर जाऊया..!! का?...उगाच अभियांत्रिकीच्या तिसऱ्या सेमिस्टर ला हा किडा आम्हा मित्रांना चावला. अति उत्साहात बरेच जण तयार झाले. पण दर वेळी परीक्षा देऊन थकलेलो आम्ही, या ना त्या कारणाने आपापल्या गावी (अर्थातच केलेल्या संकल्पाला फाट्यावर मारून) विनासायास आणि विनासायकल पोहचायचो. अधून मधून तो किडा पुन्हा पुन्हा डोकं वर काढायचा, चावायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. नंतर अचानक लक्षात आला कि आता हे तर शेवटचे वर्ष, मग मात्र मी पुन्हा एकदा सगळ्यांना विचारले कि कोण कोण तयार आहे सायकल सवारीला ला? फक्त एक मित्र तयार होता. सातव्या सेमिस्टर नंतर जायच ठरलं.

डेली सोप.... एक कथा वाचन -२

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 18/08/2016 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/37012
रघु: बाराखडी म्हणजे ते नाही का मुलाना शाळेत शिकवतात... क का कि की कु कू ...ह हा हि ही हु हू हे है हो हौ हं हः ती बाराखडी .... जाऊ दे तुम्हाला नाही कळायचे ते.... तुम्ही इंग्लीश मिडीयम मधे शिकलेले असाल. निर्दालनः म्हणजे.... रघु: ते जाउ दे हो.... पण ही कथा मी मॅडमला कशी सांगु? मला नीट समजावून सांगा. निर्दालनः नीट समजावून सांगायचे? ओक्के .... हे बघा .... हे बघा.... अगदी सोप्पे आहे... मी आणखी सोप्पे करुन सांगतो. (टेबला वरचे फळांच्या ट्रे मधील फळ घेतो ) हे बघा हे हे ....

गावाकडची गोष्ट (भाग 1)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 17/08/2016 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 "आई शप्पथ सांगतो त्या झाडावर काहीतरी होत." दिघ्या थरथर कापत म्हणाला.  " झाल... सुरु झाले याचे भास आणि आभास. दिघ्या साल्या चढली बहुतेक तुला. काहीतरी नाही कोणीतरी म्हण."जेटली हसत म्हणाला. "म्हणजे?" डोळे विस्फारून दिघ्याने जेटलीकडे बघितले. "हा हा हा! म्हणजे साल्या तुला हडळ दिसली असेल तिथे त्या झाडावर. अशक्य घाबरट आहेस तू. गपचूप पेग भर आणि तोंडाला लाव. आपण इथे इतक्या बाजूच्या व्हिलामध्ये आलो कारण कोणी डिस्टर्ब करायला नको. आणि नशिबाने खरच कोणी नाही इथे आजूबाजूला.

या पुस्तकांची माहिती मिळेल का ?

लेखक nishapari यांनी बुधवार, 17/08/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ८ - ९ वर्षांपूर्वी , ही पुस्तकं माझ्या वाचनात आली होती . खूप आवडलीही होती . पण पुस्तकाचं किंवा लेखकाचं नाव लक्षात ठेवावं म्हणजे त्या लेखकाची बाकीची पुस्तकंही वाचता येतील किंवा तेच पुस्तक नंतर कधीतरी वाचता येईल एवढी अक्कल त्या वयात नव्हती . आता मी त्या पुस्तकांचं साधारण कथानक सांगते . मिपावरच्या वाचनप्रेमींपैकी कोणी वाचली असतील तर कृपया पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव सांगा . मी फार आभारी राहीन . १ - हि एक पेंग्विन्स च्या आयुष्यावर आधारित कादंबरी होती . म्हणजे माणसांच्या दृष्टिकोनातून पेंग्विन्सची माहिती नाही ; तर यातली प्रमुख पात्रंच पेंग्विन होते .

सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 17/08/2016 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. ) संत कबीर दास यांनी म्हंटले आहे 'माया महा ठगनी हम जानी'. माया निरनिराळे मोहंक रूप घेऊन लोकांना ठगत राहते. सुवर्ण तर मायाचे सर्वात मोहक आणि भयंकर रूप. आपली सीता मैया बेचारी सुवर्ण मृगाच्या मोहात अटकली. बेचार्या रामाने कितीही समजावले तरी तिने ऐकले नाही (बायका कधी नवर्याचे ऐकतात का?). लंकेचा राजा रावण हि सोन्यासारखी सुंदर स्त्री अर्थात सीता मैयाला पाहून मोहित झाला. परिणाम सुवर्ण लंका जाळून खाक झाली. हजारोंच्या संख्येत राक्षस, वानर मारल्या गेले.

अर्थक्षेत्र : ट्रेडिंग फंडा (२)

लेखक ज्ञानव यांनी बुधवार, 17/08/2016 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात खरेदी करताना आणि विक्री करताना दरवेळी तयार होणारे हाय किंवा लो ह्या कडे लक्ष दिले असता तसेच ATP हा एक महत्त्वाचा घटक ध्यानात घेतला असता ट्रेंड बदलाची आगाऊ सूचना मिळू शकते. असे म्हंटले होते.

डेली सोप.... एक कथा वाचन -१

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 17/08/2016 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
रघु: ओके मन्या. काय म्हणालास? कोण येतंय? मन्या: ( फोनवर) अरे तो कास्टिंग डिरेक्टर येतोय. बालाजी फिल्म्स चा रघु: कास्टिंग डिरेक्टर? कशाला? मन्या: अरे वहिनीना त्यांच्या सिरीयल साठी घेतोय म्हणे. रघु: पण ती इथे कुठे आहे. मन्या : तेच तर म्हणतोय मी. सुप्रिया मॅडम घरी नाहीत म्हणून मी सांगितलय. तो मॅडमच्या सेक्रेटरीशी बोलायला येतोय. रघु: मग. मी काय करु? मन्या: हे बघ मी पण आज बाहेर आहे. त्यामुळे तू त्याला सुप्रिया मॅडमचा सेक्रेटरी म्हणून भेट. रघु: मी मॅडमचा सेक्रेटरी? मन्या: हो रे ....आजच्या पुरता तरी बन. रघु: आणि सेक्रेटरी म्हणून काय करायचे? मन्या: काहीही कर. टाईम पास कर.