Skip to main content

एकक !

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 16/09/2016 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
भूमिका : ही कविता जमेल तेथे फक्त एक शब्द वापरून करण्याचा प्रयत्न आहे. एका स्त्री च्या आयुष्यातील महत्वाचे क्षण /घटना एका शब्दानं प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केले आहे. म्हणून शीर्षक एकक असे नाही . तर, एक स्त्री चे विश्व कसे एकक असून, साखरे प्रमाणे इतरांच्या आयुष्यात विरघळून जाते - इतरांच्या आयुष्यास अर्थ भरण्यास तिची स्वतःची ओळख.. अगदी तिच्या बाबांनी उत्कट प्रेमानं तिला दिलेले नाव सुद्धा - ती विसरून जाते (लग्न नंतर नाव बदलण्याच्या रीती वरून) - एका परिवारास अनेक प्रकारे जोडून -मात्र कुठे तरी ती 'एकक' म्हणून हरवून जाते... ह्या छोट्या अश्या निरीक्षणा वर लिहिण्याचा अल्प सा प्रयत्न आहे.
काव्यरस

कारवीची फुले कुठे पाहायला मिळतील?

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 16/09/2016 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. दर ७-८ वर्षांनी फुलणारी कारवी यावर्षी पण फुलणार आहे असं वाचलं. मागे एकदा पेपर मध्ये कारवीच्या फुलांनी पूर्ण निळा झालेल्या डोंगराचा फोटो पहिला होता आणि ठरवलं होतं कि प्रत्यक्ष हे पाहायचंच. हे दृश्य पुण्याजवळ कुठे पाहायला मिळण्याची जास्त शक्यता आहे कुणी सांगू शकेल काय ?

तीन दिवस दोन रात्री : भाग १

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 16/09/2016 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुभव खरा, नावे खोटी) त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्‍याच्या निर्‍यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्‍या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.

गोव्यातील काही विशेष ठाऊक नसलेली पण गजब पर्यटन स्थळें

लेखक साहना यांनी शुक्रवार, 16/09/2016 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
बामन बुडा धबधबा - कुस्के काणकोण फोटू : https://www.tripadvisor.com/LocationPhotoDirectLink-g306996-d7721322-i1… नेतुर्ली नावाच्या दुर्गम भागांत हा धबधबा आहे ५ वर्षांत पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला आहे.

सेकंड लाईफ - भाग ६

लेखक अक्षरमित्र यांनी गुरुवार, 15/09/2016 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ सेकंड लाईफ - भाग ४ सेकंड लाईफ - भाग ५ ----------------------------------------------------------------------------------- सोमवारी सकाळी वडगांवहुन निघालो तो थेट ऑफीसला गेलो. पोहोचता पोहोचता दुपार झाली होती. जवळची बॅग गेटवर वॉचमेनकडे ठेऊन आवश्यक ते साहित्य घेऊन ऑफीसमधे पोहोचलो.

वाघीण

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 15/09/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.

ही कथा काल्पनिक आहे, याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असल्यास योगायोग समजावा.

इंचू चावल्यासारखं ते जनावर पिसाळलं. झाडाखालनं मुसंडी मारत सरळ मचाणाच्या खांबाला त्यानं ढुसनी दिली. तसं मचाण कलंडी झालं. म्हाराज घसरतंच खाली गेले. पालथं पडूनंच त्यांनी बंदूक सावरली. बसल्या बसल्याच त्यांनी नेम धरुन अजून एक बार काढला. गोळी रानरेड्याच्या पोटात बसली. पण जनावर ढिम्म हललं नाही. पाय खुरडत म्हाराजांना चेंगारण्याच्या इराद्यानं पुढं झेपावलं. शिरपानं घोड्यावरनं खाली उडी मारत तलवार बाहेर काढली. प्रसंग बाका होता.

अभियंता दिवसाच्या निमित्ताने।।।

लेखक क्षमस्व यांनी गुरुवार, 15/09/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
इंजिनीयरींगची चार वर्षे... तसे सगळेच इंजिनीयर स्वत:ला आम्ही चार वर्षे घासून इंजिनीयरींग पुर्ण केली असं म्हणतात. अगदीच खरंय हे. मि व माझ्या साथीदारांसाठी ती घासाघासीच होती. सुरुवात होते ती अगदी कॉलेजच्या लोकेशनपासून. कॉलेज तसं अडगळीत, ग्रामिण भागात. आजूबाजूला लोकवस्ती विरळ. ७-८ किलोमिटर वर बाजारपेठ. बाजारपेठेपासून कॉलेजपर्यंत दिवसाला दोनच बसेस. रिक्षासाठी २ किलोमिटर पर्यंत पायपीट करावी लागायची. बाईक्स मोजक्याच. त्याही दिवसभर कुणी ना कुणी ठरवलेल्या असायच्या. कॉलेजला करमणूक म्हणून लेडीज हॉस्टेल, कँटीन, ग्राऊंड नाहीतर वेज प्लॉट. पहिल्या वर्षी येणाऱ्या मुलांसाठी प्रचंड सहनशक्ती घेऊन लागत असे.

शेजारनी जीजी (अहिराणी कथा)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/09/2016 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे विरगावले आमना घरनाआडे तुळसा बोय राहे. तिले आम्ही जीजी म्हनूत. जीजीले दोन आंडरो व्हतात आनि दोन आंडरी. दोन्ही आंडरीसना लगनं व्हयी जायेल व्हतात म्हनीसन त्या त्यास्ना सासरले व्हत्यात. दोन्ही आंडरोबी बाहेर राहेत. येक सर व्हता म्हनीसन बदलीना गावले राहे ते दुसरा शेतकरी म्हनीसन दूर वावरात राहे. जीजीना घरना मानोस मालेबी आठवत नही तैन्हपशी गमी जायेल व्हता. म्हनून घरमा जीजी येकटीच राहे. याळभर याना नहीथे त्याना वट्टा दुखाडी जीजी नुसता चावळाना गाडा भरी राहे. आमना घरना मांगे आड व्हता. त्यावर आजूबाजूना खंडीभर घरं पानी भरेत.

वाट्टेल ते टाईमपास व्हॉटस अ‍ॅप समुह

लेखक निनाद यांनी गुरुवार, 15/09/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
निव्वळ मौजमजा, राजकारण, टाइमपास, कथा, कविता गझल, विनोद, बातम्या, फॉरवर्ड्स ,गप्पा वगैरे करण्यासाठी एक वाट्टेल ते व्हॉटस अ‍ॅप समुह बनवला आहे. आपल्याला यात रस असेल तर या समुहात येण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यक्तिगत निरोपातून पाठवावेत. आणि 'वाट्टेल ते साठी' असे त्यात नमुद करावे! म्हणजे सामील करुन घेणे सोपे होईल. . . . .
(सूचना: ज्याना अशा ग्रुप्समधे सामील व्हायचे असेल त्यानी आपआपले किंवा नातेवाईकांचे नंबर्स कृपया इथे शेअर करू नयेत. अन्य मार्गांनी धागाकर्त्याशी संपर्क साधावा. मिपा हा सार्वजनिक ओपन फोरम आहे.