Skip to main content

इनिग्मा

लेखक आबा यांनी सोमवार, 26/09/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.

अनाठाई

लेखक सुमित_सौन्देकर यांनी रविवार, 25/09/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
निशाचर ह्रिदयाला, जाग या जन्माची जुडली कित्येकदा ही जणू... निद्रेची नशा सारून गेली अबोला थोडासा... आणि निराशेच्या सानिध्यात जगतो दिवस बाकी ... आतल्याआत घुटमळण्यात जातो बेधुंध होता कोणे एके काळी... आपल्याच ठोक्यांसवे आता हरवतो... शोधतो... अनोळखी स्पंदने उजाडता लागतो वेध तारकां परतण्याचा चंद्राच्या प्रकाशात छंद ... सूख वेचण्याचा विरळ होणारे छापिल नाव जपण्याची धडपड जरा कुठे पुसटता रेघ... अवेळी धडधड तिच स्पंदने , श्वासांची घालमेल हवीशी ठोका चुकावा पून्हा एकदा... भेटण्यापूर्वी शेवटाशी

स्वप्न मनाचे

लेखक माहीराज यांनी रविवार, 25/09/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य स्वप्ने मनी उद्याची पंख जरी हे इवले इवले, ध्येय गाठण्या आतुरलेले हृदयाचे पाऊल कोवळे.. तरूणपणाची चढता झालर मुक्त मनाला बसे ना आवर, स्वप्न कुठे अन मार्ग कुठे उगाच अंगी नसती पावर.. तिशी उलटता भरते अंगण गळ्यात पडते नसते बंधन, सांभाळताना नाती गोती करी स्वप्नांना दुरून वंदन.. वर्षा मागुन वर्षही सरते, स्वप्नांची ती यादच उरते, मुलाबाळांचे स्वप्न उद्याचे पुन्हा नव्याने मनात भरते.. कसले स्वप्न नी कसली आस उगाच मनाचे सारे भास जीवन सुंदर जगण्याचा हा मात्र एक स्वच्छंद प्रवास...           -  महेश नायकुडे
काव्यरस

मक्केतील उठाव १

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 25/09/2016 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला. त्याचे परिणाम सगळ्या जगावर झाले. तेव्हापासून अमेरिकेत एक वाक्प्रचार बनला आहे अमुक देशाचे ९/११. जसे २६/११ चा मुंबईवरील हल्ला हा भारताचे ९/११, स्पेनमध्ये माद्रिद येथे रेल्वे गाड्यांमध्ये अनेक स्फोट होऊन शेकडो लोक मेले त्याला स्पेनचे ९/११ म्हटले जाते. हाच नियम लावला तर मक्केतील १९७९ साली झालेला उठाव ह्याला सौदी अरेबियाचे ९/११ म्हणता येईल. ह्या घटनेने सौदी राजघराणे मुळापासून हादरले. बंडखोरांचा क्रूरपणे बिमोड केलाच. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी आपली धोरणे पूर्णपणे बदलली.

रिहॅब चे दिवस भाग ३!!!

लेखक वरुण मोहिते यांनी रविवार, 25/09/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
हडपसर पर्यंत जेव्हा पोचलो तेव्हा जाग आली घरचे दिसत होते ऍम्ब्युलन्स मधून मला आता. मागे गाडीत होते पण बोलायला शुद्ध नव्हती.काही बोलू शकलो नाही. त्या हॉस्पिटलचे २ लोकं आली हाताला पकडल आणि वर नेलं . घरच्यांनी घाईगडबडीत पॅक केलेली बॅग घेऊनही एक जण मागे येत होता.मला एका रूम मध्ये बसवलं..समोर जमलेले ८-१० लोक..मला पाहायला.कोण नवीन बकरा बनला ह्यात सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो.कोणीतरी जेवायचं ताट आणलं .दोन घास खाऊन मी ताट फेकल.अर्वाच्य शिव्या तर चालूच होत्या डॉक्टरांपासून सगळ्यांना.

झपाटलेला ट्रेक

लेखक योगेश आलेकरी यांनी शनिवार, 24/09/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
झपाटलेला ट्रेक जून चा पहिला आठवडा चालू होता. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु होणार होता. तसे बदलही वातावरणात जाणवत होते. नुकतेच मला वरिष्ठानी नोकरीच्या बंधनातून मुक्त केल्यामुळे वेळ च वेळ होता. भटकायची जणू पर्वणीच. २ दिवस मस्त सह्याद्रीत व्यथित करायचे मनसुबे आखले गेले. डोंगर रंग ठरली. तैलबैला-सवाष्णी घाट- धोंडसे मार्गे सुधागड. ठरलं. जोडीला कोणी मिळालंच नाही, म्हणून नियोजनात बदल नाही. शनिवारी सकाळी सकाळीच मुंबईहुन तैलबैला कडे निघालो, गाडी भांबुर्डयाची होती तिकीट काढताना मूड बदलला व सरळ घनगड ला गेलो.