Skip to main content

फिटनेस अ‍ॅप आणि गॅजेट्स

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 11/11/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. व्यायामाच्या धाग्यावर उदंड प्रतिसाद झाल्याने "फिटनेस अ‍ॅप आणि गॅजेट्स" च्या वापराबद्दल नवीन धागा काढत आहे. गोड मानून घ्या. ;) (एस रावांनाही बरेचदा लिहितो लिहितो म्हणून सांगितले होते.) सर्वप्रथम, आपण आपल्या आनंदासाठी व्यायाम / सायकलिंग करतो मग त्याचे असे रेकॉर्ड ठेवणे किंवा ट्रॅक ठेवणे अनेक जणांना पटत नाही. मात्र महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या मोठ्या राईड नंतर "आपले आत्तापर्यंत इतके इतके किमी झाले..!!" ही भावना जबरदस्त असते.

मोदी, नोटबंदी आणि आमचा चहावाला .....

लेखक अमर विश्वास यांनी शुक्रवार, 11/11/2016 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी, नोटबंदी आणि आमचा चहावाला ..... Disclaimer : आमचा चहावाला आणि मोदी पूर्वी चहा विकायचे याचा काहीही नाही... --------------------------------------------------------------------------------- मोदी सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली त्याचा सर्वात जास्त परिणाम आमच्यावर झाला .... (नोटा बदलायचा प्रॉब्लेम नव्हताच .. कारण आम्ही कायमच कॅशलेस असतो ... ) पण या निर्णयामुळे जणू चक्रीवादळच आले. थोबाडपुस्तक आणि कायअप्पा यांच्यावर मेसेजचा खच पडला. कितीही डिलिट केले तरी थांबायलाच तयार नाहीत. त्यातून हे सर्व मेसेज परस्पर विरोधी ... त्यामुळे आमच्या मनात गोंधळ मजला.

पाश्शेहजाराच्या गोष्टी: १. बचत गट

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 11/11/2016 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
“आज रामा कशापायी आलाय तुझ्यासंगं गटाच्या मीटिंगला? आपलं ठरलंय न्हवं पुरूषमाणसांना नाय येऊ द्यायचं म्हणून?” बचत गटाची अध्यक्ष असलेल्या कांताने जरा जोरातच विचारलं. “राम राम अध्यक्षीणबाई. दादांनी सांगितलं हिकडं यायला म्हणून आलो बगा. आता तुमी नगं म्हणत असालसा तर जातो की लगेच माघारी. आपलं काय काम नाय बा, दादांचं हाये,” रामा बेरकीपणानं म्हणाला. दादा म्हणजे प्रस्थ. केवळ गावातलं नाही तर पंचक्रोशीतलं. गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या आण्णांच्या रोजच्या बैठकीतले. दादांच्या सल्लामसलतीविना आण्णांचं पान हलत नाही म्हणे.

काटा रुते कुणाला…..भाग ६

लेखक Jabberwocky यांनी शुक्रवार, 11/11/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला…..भाग ५ http://www.misalpav.com/node/37966 सागरने फोन ठेवला, ठेवला कसला मधेच कट केला. तो माझ्याशी असं कधीच बोलला नव्हता. मी पुन्हा फोन ट्राय केला पण त्याने कदाचित रिसिव्हर बाजूला काढून ठेवला असणार, फोन लागला नाही. तशी मी तिथून गच्चीवर गेले. आजूबाजूला सगळीकडे शांतता होती, आभाळाकडे पाहत मी स्वतःच्या विचारांमध्ये गढून गेले. सागरला जे मनापासून सांगावस वाटत होत ते मी माझ्याशीच माझ्या मनात बोलू लागले. सागर.....किती विलक्षण आहे हा मुलगा. हा केंव्हा माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्य होऊन गेला माझं मलाच कळलं नाही.

गोष्ट तशी छोटी - म्हणजे काय रे भाऊ?

लेखक स्रुजा यांनी शुक्रवार, 11/11/2016 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
आवाहन नमस्कार मंडळी, दिवाळीच्या मुहुर्तावर आपण नवीन उपक्रमाची आणि आपल्या युट्युब चॅनल ची घोषणा आवाहनाच्या धाग्यात वाचलीच आहे. मिपा दशकपूर्ती निमित्त होणार्‍या उपक्रमांच्या मांदियाळीत हा शुभारंभाचा उपक्रम असणार आहे. इथे या उपक्र्माच्या स्वरुपाची आणि लेखांच्या विषयाची चर्चा करुयात.

मळमळ

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 10/11/2016 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचा पेपर कुठले कुठले लेख पुस्तकं मॅगझीनस् ईंटरनेटवरचं मटेरीअल सग्गळं आपल्याला झेपणा-या परीघात . . . काढ टिपणं मार स्टॅटस् तोंडावर फेसबुक वर नोटस् व्हाॅटस् अप वर पोस्टस् लिहीता येतंय, लिहीता येतंय लाव धडाका . . मिळेल त्यावर टीका सेफ टार्गेटस् शोधायची कॅबीनेट मिनिस्टर्स वगैरे नगरसेवक डेंजर, येऊन मारू शकतो किंवा हवेत बाण सोडायचे समाज-बिमाज, शिक्षण व्यवस्था, पोलिस वगैरे गेला बाजार जुने दिवस, बालभारती, संस्कृती अगदीच काही नाही सुचलं तर बळीराजाची कैफियत, सैनिकाचे बलिदान जय जवान, जय किसान कोरडे उमाळे तिच्यायला....पण हमखास हिट . . . हिरीरी महत्त्वाची कुंपणावर बसायचं पटकन उडी मारता येते, कुठेही. मेगा
काव्यरस

मी आज केलेला आराम...!!

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 10/11/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज केलेला आराम नमस्कार, गेली अनेक वर्षे मी जमेल तसे बिछान्यात लोळत आहे आणि लोळत असताना मिसळपाववरचे लेख वाचत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचता वाचता किंवा आपल्या जोडीदाराच्या संगतीने अनेक लोकांना बिछाना गाठावासा वाटतो आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक मस्तपणे आणि नियमीतपणे आराम करतात.

ग्रंथ परिचय - ग्रामगीता

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 10/11/2016 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथ परिचय - ग्रामगीता 1 ग्रामगीता ऍपवर मराठीतील पुर्ण गीता वाचायला क्लिक करा. वंदनीय राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज विरचित युग परिवर्तन कार्य मित्रहो, नुकतेच एक ग्रंथराज वाचनात आले. त्याचा परिचय करून द्यावा आणि ज्यांना आधीपासून या ग्रामगीतेची महती ज्ञात आहे, त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा ही इच्छा.