Skip to main content

हृदयसंवाद (३) : नाडी, रक्तदाब व ‘इसीजी’

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 29/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ इथे .. .. .. हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत : 1. नाडी तपासणी 2. रक्तदाब मोजणी 3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी 4. इसीजी तपासणी इथे एक मुद्दा लक्षात येईल. या चाचण्या जशा संबंधित रुग्णावर करतात त्याचप्रमाणे त्या निरोगी व्यक्तींसाठी सुद्धा आरोग्यचाळणी चाचण्या म्हणून वापरल्या जातात.

पाकिस्तान - ११

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 29/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
लाहोर भारतासाठी विशेष महत्त्वाचे नव्हते. लाहोर जिंकणे हा ना कधी अजेंडा होता ना सैन्याने कधी प्रयत्न केले. सीमेपासून लाहोरपर्यंतचे अंतर तेवढेच आहे जेवढे कॅनॉट प्लेस ते नोएडा. असही नाही की रस्त्यात रणगाड्यांची रांग लागलेली असते नी सैन्य त्याला ओलांडून जाऊ शकत नाही. ग्रँड ट्रंक रोडसारखा उत्कृष्ट रस्ता बनलेला आहे. पाकिस्तानने लाहोरच्या वेशीवर जुन्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था केली होती. जसे किल्ल्याच्या बाहेर एक कालवा खणणे, जेणेकरून इतर सैन्य तेथवरच थांबू शकेल.

अमर प्रेमवीर शास्त्रज्ञ युगुल - मारी आणि पिअरे क्यूरी

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 28/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम, शृंगार आणि प्रणय ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य आणि अजोड देणगी आहे. तरल कवीमनाला प्रेमप्रणयशृंगाराची फोडणी घातली तर मेघदूतासारखे सुंदर काव्य जन्माला येते. परंतु तरल कवीमनातल्या प्रतिभेतून केवळ काव्यच जन्माला येते असे नाही. विज्ञानजगतातले अनेक विस्मयकारक शोध हे तरल कवीमनाच्या प्रतिभेतूनच जन्माला आलेले आहेत. वैज्ञानिक हे आपल्यातूनच निर्माण झालेले आहेत. प्रेमप्रणयशृंगार त्यांच्याकडेही असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारी आणि पिअरे क्यूरी हे वैज्ञानिक युगुल. जन्म १५ मे १८५९ पॅरीस इथे. मृत्यू पॅरीसला १९ एप्रिल १९०६. गुरू गॅब्रिएल लिपमन. भौतिकी हे पिअरेचे कार्यक्षेत्र.

ब्राह्मणीची बारव व इतर पुरातन पाऊलखुणा

लेखक Bhakti यांनी रविवार, 28/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
A खूप दिवसापासून ब्राह्मणीची बारव पाहायचं मनात होतं. पण आज ते जुळून आलं. खरं म्हणजे सकाळीच ग्रुप ट्रेकला जायचं होतं पण पण उठायला उशीर झाला सहा साडेसहा वाजले होते. पिंपळगाव माळवीच्या रोडनी चाललो होतो तेव्हा म्हटलं जाऊ या.

अत्तराच्या कुपीतून दरवळणारा सुगंध. . .

लेखक मार्गी यांनी रविवार, 28/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही. आणि पुढे जाताना मागची वाटसुद्धा आपल्या नजरेसमोरून दिसेनाशी होती. आपली मुळं आणि आपला आरंभ आपल्या डोळ्यांसमोर नसतो.

जय रायरेश्वर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 27/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
जय रायरेश्वर ------------------------------------------------------------------------------------------------------------- सकाळची प्रसन्न वेळ. रायरेश्वराचं अफाट पठार. पठारावरून ऊन हळूहळू खाली दरीत उतरत होतं. तर शिवाजीराजे किल्ल्यावर जात होते. सारीकडे पिवळं पडलेलं गवत. त्यामुळे पठार सोनेरी भासत होतं. आणि तो सोन्याचाच दिवस नव्हता काय ? आज राजे आणि त्यांचे सहकारी किल्ल्यावर चालले होते, ते रायरेश्वराच्या देवळात शपथ घ्यायला. साधीसुधी शपथ नाही, तर स्वराज्य स्थापनेची ! तो दिवस होता - २७ एप्रिल १६४५. राजांनी देवळात प्रवेश केला आणि त्यांच्या सवंगड्यांनीही.

काही आम्ही आणि एक म्हातारा.

लेखक भागो यांनी शुक्रवार, 26/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
काही आम्ही आणि एक म्हातारा. आजचा दिवस आमच्या गँगसाठी खास होता. कारण आमच्या गँगच्या एका मेंबराची म्हणजे पक्याची कसोटी होती. पक्याने शाळेत असतानाच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. बोले तो शाळेच्या टीम मधून खेळायला सुरवात केली. तसं तर आम्हीपण क्रिकेट खेळत होतोच कि. पण पक्या म्हणजे राजहंस होता आणि आम्ही म्हणजे बदकं. आमची थेरी अफाट पण पक्या प्रॅक्टिकल. एकदा का क्रिकेटवर चर्चा सुरु झाली कि पहा सापळ्या तुम्हाला स्विंग बॉलिंगचे फ्लुइड मेकॅनिक डायग्रामसकट समजावून सांगणार. स्पिन बॉलिंग म्हणजे आम्हाला वाटायचे कि टप्पा खाल्यावर चेंडू इकडे वळतो नाहीतर तिकडे वळतो.

दर्शननं केला प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 25/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.

डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 23/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्‍या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात.