Skip to main content

मनाच्या बाहेर !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 11/04/2017 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
अरांच्या मनातल्या मनात !! वर चाललेली चर्चा निर्णयाप्रत येऊ शकत नाही याची दोन कारणं आहेत : १) अरांच्या धारणेत `मनावेगळं कुणीही नाही' आणि माझ्यामते हे `उघडपणे स्वतःलाच नाकारणं' आहे. जगात फक्त एकाच गोष्टी कुणीही नाकारु शकत नाही ती म्हणजे `मी आहे ' ! सो, अरा इज ट्राइंग इंपॉसिबल. २) इन अ वे, `मी आहे' हे विधान नाकारता येत नसलं तरी जोपर्यंत व्यक्ती स्वतःप्रत येत नाही तोपर्यंत तिला आपण `मनावेगळे आहोत' हा उलगडा होत नाही. नाऊ द ट्रबल इज, (१) लॉजिकचा विषय आहे आणि (२) अध्यात्म आहे.

हागणदारीमुक्तीचा तमाशा

लेखक परशु सोंडगे यांनी मंगळवार, 11/04/2017 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा ***************** हागणदारीमुक्तीचा तमाशा ******* पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून... आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू... आता हे बसले तंबाखू मळीत पण पंचायत बायांची झाली.

आड (बावडी)

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी मंगळवार, 11/04/2017 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
...गावात आड होता. आडावर रहाट होता. रहाटाला मोठी साखळी होती. साखळीला बादली अडकवून भल्या पहाटे पाणी ओढणारी माणसं होती. आडाचं पाणी पोटात साठवणारे मातीचे रांजण होते. रहाटाला करकरणारा आवाज होता. बाजूला धुणी धोपटणाऱ्या कासोट्यातल्या बायका होत्या. खाली घरंगळत वाहणाऱ्या पाण्यात खोटी शेती पिकवणारी लहान पोरं होती. "नांदायला नांदायला आडाचं पाणी शेंदायला!" गाणी गाणारे आवाज होते. पण काळाचा पक्षी उंच उडतो. गावासोबत आडही आटून जातो. आड रिता रिता होत जातो... ...आड आजही असतो. वरती मोडलेला रहाटही असतो. गंजलेली साखळीही असते. पण पाण्यात तरंगणारं कासव कधीच मेलेलं असतं.

कामिनीबाईंना वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 11/04/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
. (याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे) डिअर ऑल, हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे एक प्रेरणालेख वाचनात आला, आणि पुस्तकाऐवजी वेबसाईट काढण्याचा विचार बळावला. लगेचच आम्ही आमचे परममित्र आणि मार्केटिंग गुरु वेदप्रकाश चौबे यांना आमचा मानस सांगितला.

जो दिल हारा वोह सब जीता

लेखक स्वोन्नती यांनी मंगळवार, 11/04/2017 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मीं खोल‌ खोल‌ कोस‌ळ‌त‌ अस‌तेवेळी, तुझी भूमिका न‌क्की काय‌ होती? फ‌क्त एक त‌ट‌स्थ ख‌र‌ं त‌र‌ उदासिन प्रेक्ष‌काची की अशा एका मित्राची ज्याला म‌ला ख‌र‌ं पाह‌ता हात देऊन व‌र‌ ओढाय‌चे होते प‌ण त‌से क‌र‌णे ज‌म‌त न‌व्ह‌ते, ब‌घ्याची अस‌हाय भूमिका क‌र‌ण्याप‌लीक‌डे काहीही क‌र‌ता येत‌ न‌व्ह‌ते? की त‌ळ्याच्या काठाव‌र‌ ब‌सून बुड‌णाऱ्याची म‌जा प‌हाण्याचा आसुरी आन‌ंद‌ मिळ‌व‌णाऱ्या सेडिस्ट‌च्या भूमिकेत तू होतास्? म‌ला क‌ळ‌त‌च नाही. तू बोल‌त‌ नाहीस आणि माझ्याक‌डे त‌री कुठे अशी जादूची कांडी आहे की म‌ला तुझ्या म‌नात‌ले ओळ‌ख‌ता यावे?

मेघनादरिपुतात

लेखक शरद यांनी मंगळवार, 11/04/2017 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
मेघनादरिपुतात मागे काही दिवसांपूर्वी " हराच्या हाराचा.."नावाचा एक शाब्दिक खेळ दिला होता. त्याला बर्‍यापैकी वाचकांनी पसंती दिली व काहींनी आणखी असेच काही लिहा असेही म्हटले. आज तसाच एक, पण जरा सोपा खेळ देत आहे. उद्यानात एक राजकन्या आपल्या सख्यांबरोबर बसली असताना तेथ एक राजपुत्र आला. त्याचे राजकन्येवर प्रेम बसले.

देव्हारा...३

लेखक विनिता००२ यांनी मंगळवार, 11/04/2017 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
...."सांभाळेल, सांभाळेल. तुला नको काळजी! " अभि आदेशला डोळा मारत म्हणाला. "मी कशाला काळजी करु? ती पण तुझी!" ती नाक उडवत म्हणाली. लेक्चरची वेळ झाली म्हणून तिघेही उठले. देव्हारा...३ वार्षीक परिक्षा संपली तसे सगळेजण इकडे तिकडे विखुरले. अभिजीत त्याच्या घरी निघुन गेला. आदेश आणि तनूने स्पेशल क्लास जॉइन केले. सुट्टी भुर्रकन संपली. कॉलेजच्या पहील्याच दिवशी सर्वजण हजर होते. परत रुटीन सुरु झाले. अभिजीत दरवर्षी प्रमाणे टॉपलाच होता. या वर्षी प्रोजेक्ट, प्रॅक्टीकल्स बरेच उपदव्याप करायचे होते.तनू करता प्रपोजल येत होती.

स्वारस्याची अभिव्यक्ती

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 11/04/2017 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
वामन आणि मी, आम्ही दोघेही बसमध्ये बसून तासभर कसा काढावा ह्याचा विचार करत असता, ही चर्चा सुरू झाली. आणि मग उत्तरोत्तर रंगतच गेली. तिचाच हा वृत्तांत. हा संवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्यक्षात असाच घडलेला आहे. मीः हे बघा, तुम्हाला ह्यात रुची आहे का? वामनः छे! हे सगळे गणिताने भरलेले आहे. ह्यात आपल्याला काय ’इंटरेस्ट’ असणार? मीः ’इंटरेस्ट’? म्हणजे तुम्हाला ’स्वारस्य’ म्हणायचाय काय? वामनः हो. तेच ते. मीः तुम्हाला ह्यात स्वारस्य नसेल, तर आपण अधिक सुरस गप्पा करू या! तुम्ही ’इंस्ट्रुमेंटेशन’ मध्ये एवढी वर्षे काम करताय.