Skip to main content

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)

लेखक Anand More यांनी रविवार, 23/04/2017 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
सधन ब्राह्मण जमीनदार कुटुंबातील एकुलता एक मुलगा परदेशी शिक्षणासाठी जातो. त्याचे नाव जगन्नाथ. तिथे एका भारतीय वंशाच्या आंग्ल युवतीबरोबर लग्न न करता राहतो. मद्यपान आणि मांसाशन करतो. क्रांतीच्या गप्पा मारतो. पण तो सगळ्यांशी जुळवून घेत खोटे खोटे जगतो असे त्याला कायम जाणवत असते. ई एम फॉर्स्टर या नोबेल पारितोषिकविजेत्या लेखकाच्या विचारांचा तो अभ्यास करत असतो. पण वर्गकलह आणि दांभिकपणा या फॉर्स्टरच्या लेखनविषयाबाबत तो स्वतःची म्हणता येतील अशी स्वतंत्र मतेदेखील तयार करू शकत नसतो. त्या मागचे कारण म्हणजे आपण आयुष्याला सर्वांगाने जाणत नाही, केवळ पुस्तकांतून ओळखतो, हेच असावे असे त्याला वाटते.

पुस्तकं

लेखक मितान यांनी रविवार, 23/04/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकं जिवंत असतात. जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो. अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात. काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात. अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात.

कथुकल्या ४ + ?

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 22/04/2017 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
१) 0101….( शशक) फक्त पैशांसाठी मी या प्रयोगात सहभागी झालो होतो. माझ्या बधिर कवटीला छिद्र पाडतांना डॉक्टरांनी मला जागंच ठेवलं. त्यांनी डोक्याच्या वेगवेगळ्या भागांना केबल्स जोडले. मेंदूच्या शुभ्र करड्या रंगात केसांएवढ्या बारीक केबल्सचा लाल रंग मिसळून गेला. त्या असंख्य केबल्सचं दुसरं टोक जोडलं गेलं सुपरकॉम्प्युटर्सना. “ऑपरेशन सक्सेसफुल” त्यांनी जाहीर केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा महापूर उसळला होता. आता फक्त फायनल टेस्टिंग बाकी होतं. इशारा झाला अन सगळे संगणक जिवंत झाले.

पण लक्षात घेत कोण ?

लेखक भटकीभिंगरी यांनी शनिवार, 22/04/2017 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नेहमी रिक्षाचालक रीक्षा बेजबाबदारपणेचालवतात असे म्हणतो .. कारण आपल्याला अनुभवही तसेच येतात . परवाचेच पहा ना .. मी मासुंदा तलावाच्या बाजूने ओव्हर ब्रीजामुळे बनलेल्या एका चिंचोळ्या रस्त्याने सायकलवरून जात होते. बाजूने जवळूनच एक रिक्षा निघून गेली. लगेचच माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला फटका बसला .एकाएकी काय झाले ते मला कळेचना केवळ नशिबानेच मी पडले नाही . वाचले. समोर पाहिले तर आत्ता जी रिक्षा शेजारून गेली तिच्यातून केळीचा घड लागलेले केळीचे झाड बाहेर आले होते.

वचन

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 22/04/2017 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
भंगलेल्या रात्री, किती जागवाव्या लागल्या संवेदना हळव्या, किती चुरडाव्या लागल्या प्राणांतिक वेदना, किती सोसायला लागल्या अस्तित्वाच्या खुणा, किती जपाव्या लागल्या तळहाताच्या रेषा, किती बदलाव्या लागल्या हृदयातल्या जखमा, किती उघड्या कराव्या लागल्या शब्द शब्दांना दिला, किती कविता कराव्या लागल्या

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)

लेखक Anand More यांनी शनिवार, 22/04/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘संस्कार’ कादंबरी वाचली ती दहावी अकरावीत असताना. चाळीतल्या शेंडे काकूंनी त्यांच्या संग्रहातील प्रत वाचायला दिली होती. नंतर कित्येक वर्षे त्यांना ती कादंबरी परत करायला टाळाटाळ करत होतो आणि परत केल्यावर हातातून काहीतरी महत्वाचं निसटून गेलंय अशी भावना मनात सलत होती. पुढे पैसे मिळवू लागल्यावर लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी विकत घेतली. सुखांत किंवा दुःखांत नसलेली पुस्तके आधी वाचली होती. पण शेवटी उत्तर न देता प्रश्न पाडणारी आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगणारी ही कादंबरी वाचल्यानंतर यू आर अनंतमूर्ती या लेखकाबद्दल आदराशिवाय दुसरी कुठलीही भावना मनात येऊ शकत नाही.

नाशिकचा उद्योग ०३ : याज्ञिकीने तारले !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 22/04/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगजेबाच्या मृत्यू नंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होई पर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठयांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरु होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखी सारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता. फार पुढे नव्हे १७५० साल युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजु लागले होते.

भाषासु मुख्या मधुरा

लेखक शरद यांनी शनिवार, 22/04/2017 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
भाषासु मुख्या मधुरा भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ! तस्याद्धि काव्यं मधुरं तस्यादपि सुभाषितम् !! शाळेत असतांनाच संस्कृतची गोडी लागली. तसे गुण मिळवण्यापुरते व्याकरण शिकलो, नाही असे नाही; पण ते तेवढेच. खरी गोडी निर्माण झाली ती सुभाषितांमुळे. शाळेत असतांना ३००-४०० सुभाषिते सहज पाठ होती. सुट्टीत कोकणात गेल्यावर भेंड्यांच्या खेळात तेथील मंडळींनी एक मखलाशी केली. संस्कृत श्लोक फक्त रामरक्षेतील, (सगळ्यांना पाठ असलेली, आमचे जादा पाठांतर बाद!) ते हि नो दिवसा गता:! तर काय सांगत होतो, "मेघनादरिपु" धाग्यात म्हटले तसे आज एक निराळ्या प्रकारचे कोडे बघू.

भटकंतीची बकेट लिस्ट

लेखक मोदक यांनी शनिवार, 22/04/2017 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपण सगळे भटके लोकं अनेक ठिकाणे फिरत असतो, नवीन नवीन जागी भेट देण्याचे प्लॅन बनवत असतो आणि ती ठिकाणे फिरून झाली की पुन्हा नवीन ठिकाणांच्या शोधात इंटरनेट धुंडाळत असतो अनेक ठिकाणे आपल्याला मित्रपरिवार आणि परिचितांकडून कळतात.