Skip to main content

||कोहम्|| भाग 7

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 09/05/2017 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात आपण पाहिलं कि मानवाचा अगदी जवळचा नातलग असलेले चिंपांजी संवाद कसा साधतात आणि त्यांच्यात व आधुनिक मानवाच्या भाषेत काय फरक आहे , याच प्रश्नाकडे आता अजून थोडं विस्ताराने पाहू. मुळात मानवी भाषा इतर प्राण्यांच्या भाषेपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे आणि मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तसेच अगदी इतर मानवांच्या मेंदूपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळा आहे या दोन प्रश्नांबरोबरच, मानवाच्या मेंदूचा त्याच्या भाषेवर काय प्रभाव आहे हेही समजून घेणं महत्वाचं ठरतं. पहिल्यांदा आपण मेंदूत नक्की काय बदल घडले ते पाहू, मानवी मेंदूतील बदल खरंतर 170000 वर्षापासूनच सुरू झाले.

हंपी: दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 09/05/2017 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपिठीका वर्षानुवर्षे हंपीला जायचं चाललं होतं पण काही ना काही कारणांनी जाणं सतत लांबणीवर पडत होतं. तो योग शेवटी भर उन्हाळ्यात आला. आधी ठिकाणं ठरवण्यात वेळ गेला. सुरुवातीला ठरलं होतं बदामी, ऐहोळे, पट्टदकल. पण कडक उन्हाळ्यामुळे तो बेत मागे पडला, मग ठिकाण ठरत होत ते दांडेली. भर उन्हाळ्यातही जाता येण्याजोगं असं जंगलझाडीत असलेलं काहीसं थंड असलेलं ठिकाण. तिकडच्या जंगललॉजेसमध्ये चौकशी करुन झाली पण ती सगळी फुल असल्याने इतर पर्याय शोधायला लागलो. एक जंगललॉज होतं ते हंपीनजीकच्या दरोजी स्लॉथ बेअर पार्क मध्ये. काहीसं महागच होतं ते, हंपीपासून साधारण१३ किमी.