वादळ उगा निमाले..
छंदात मांडते ती, शब्दार्थ जाणीवेचा..
कवितेस ना कळाले, "स्व"-रूपात काय होते!
जागून शब्द गेले..लिंपून आस गेली..
ते दग्ध वासनांचे उसनेच पाय होते..
आक्रंदतात सारे, जड-सोबती जीवाचे..
जन्मांतरी न तुटले, ते पाश काय होते?
वादळ उगा निमाले पणतीस पाहण्यासी..
आता फिरून उठणे, कष्ट:प्राय होते..!
--
माझ्यासवेच होते, मय-विश्व कल्पनांचे..
पण प्रेरणा कुणाची? ते भाव काय होते??
राघव
न किसी की ऒख का नूर हूं
न किसी की ऒख का नूर हूं
न किसी की ऒख का नूर हूं
न किसी के दिल का करार हूं,
जो किसी के काम न आ सके
मै वो एक मुश्ते-गुबार हूं ---१.
मेरा रंग रूप बिगड गया
मेरा यार मुझसे बिछड गया
जो चमन खिजॉ से उजड गया
मै उसी की फस्ले बहार हूं ---२
पा-ए-फातहा कोई आये क्यो
कोई चार फूल चढाये क्यो
कोई आ के शम्मा जलाये क्यू
(जफर अश्क कोई बहाये क्यु)
मै तो बेकसी का मजार हूं ---३
मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा
मुझेम सुन के कोई करेगा क्या
मै बडे विरोग (विरॉन) की हूं सदा
मै बडे दुखों की पुकार हूं ---४
न तो मै किसी का हबीब हूं
न तो मै किसी का रकीब हूं
जो बिगड गया वो नसीब हूं
जो उजड गया वो दयार हूं ---५
आजची पवित्र(पाक)-कृती :- "अंबाडीचे शरबत/चहा/काय-वाट्टेल-ते-म्हणा"
साहित्य:-
एक चहाचे पातेले, एक गाळणी, पुरेसे पाणी,एक पेला(ग्लास/गिल्लास वगैरे),एक लायटर किंवा आगपेटी(काड्या असलेली), गॅस शेगडी, गॅस सिलिंडर(त्यात गॅस भरलेली पाहिजेच), नाहीतर पेटलेली चूल किंवा कोळशाची शेगडीसुद्धा चालेल, साखर, लिंबू आणि सर्वात महत्वाचे साहित्य म्हणजे अंबाडीची लालेलाल बोंडं!
कृती:-
१. बागेतून अंबाडीची बोंडं खुडून घ्यावीत. योग्य बोंडं निवडणे महत्वाचे आहे. अंगठ्याने देठ चटकन खुडले गेले पाहिजे. फार पक्व नको किंवा फार कच्चे नको. बोंड्याच्या पाकळ्यांमध्ये पुरेसे रस पाहिजे.
सोप्पा रवा मँगो केक
आता तुम्ही म्हणाल किती सारखं आंबा आंबा, पण काय करू आंब्याचं पीक यावर्षी एवढं आलय की जे करायचं त्यात आंबा हवाच! सकाळी मिल्कशेक, दुपारी पायरीचा रस पोळी, जोडीला रायतं घ्या, लोणचं घ्या जे आवडेल ते, अधे मधे खायला आंबा नुसता कापून आणि रात्री आंबा शिकरण!! मग काय आज केक केला.
साहित्यः एक वाटी हापूस आंब्याचा रस, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी दही, मीठ, अर्धा चामचा खाण्याचा सोडा, एक वाटी रवा, दोन चमचे साजूक तूप.
कृती: आंब्याचा रस काढून घ्या. तो मिक्सरला फिरवू नका. मधेच एखादा तुकडा छान वाटतो. दही, साखर, तूप आणि आमरस एकत्र करून फेटून घ्या. त्यात रवा मिसळा , आणि दोन तास तसेच ठेवा.
अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी
अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी
ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं.
मानगड, कुंभे घाट आणि बोचेघोळ घाट भटकंती - भाग दोन (अंतिम)
(पहील्या भागातून...)
फायनली आम्ही आमच्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठीकाणी पोचलो होतो. गेल्या ट्रेकच्या वेळेला जिथे राहीलो होतो तिथेच शाळेत पाठीवरच्या बॅगा उतरवल्या आणि स्वस्थ बसून राहीलो. आजच्या दिवशी बोरवाडी ते घोळ व्हाया मानगड, कुंभे घाट असा जबराच पल्ला झाला होता.
कहाणी एका औदार्यवतीची
राजा कृष्णदेवराय, विजयनगरचा सम्राट याचे साम्राज्य कर्नाटक ते कन्याकुमारी अश्या दख्खन च्या प्रदेशावर पसरलेले होते. एक दिवस राजा कृष्णदेवराय त्याच्या राजधानीतून म्हणजे हम्पी मधुन निघुन त्याच्या साम्राज्याची सफर करण्यास बाहेर पडला.
फिरता फिरता तो त्याच्या साम्राज्यातील पुर्व-समुद्रकिनारी पुद्दुचेरी या व्यापारी बंदरावर आला. तिथे त्याच्या नजरेस अतिशय सुंदर वास्तु पडली. त्याची वास्तुकला अन त्यावर असणारे कोरीवकाम पाहून तो थक्क झाला.
फिरता फिरता तो त्याच्या साम्राज्यातील पुर्व-समुद्रकिनारी पुद्दुचेरी या व्यापारी बंदरावर आला. तिथे त्याच्या नजरेस अतिशय सुंदर वास्तु पडली. त्याची वास्तुकला अन त्यावर असणारे कोरीवकाम पाहून तो थक्क झाला.
मिसळपाव