Skip to main content

हळद

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 26/05/2017 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांच्या जखमा भरणारी हळद, तिला मात्र जखमी करून जाते... आजही ती कोणाच्या हळदीला जायचं अट्टाहासाने टाळते... जखमेवर हळद भरायची म्हटलं की तिचे डोळे येतात भरून... आजही.. हरितालिका पुजताना, वटपौर्णिमेला मागणं मागताना, कातर होते ती... अंगाला लागलेली हळद कोणाची.. कळेनासं होतं.. वेडावून जाते ती.. त्याने विनोद पाठवला जखम होण्याआधी फक्त लग्नातच हळद लागते तिचे डोळे भरून आले... हळदीच्या विनोदानेच जखमेवरची खपली काढली... हळदीनेच होणाऱ्या जखमेवर उपाय काय.....

पैलवान-१

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 26/05/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी. "....तरीबी पब्लिक कुस्तीच्या रिंगणाजवळ एवढ दाटीवाटीनं बसल्यालं की एकाला ढकाल्ला असता तरी वळीन सगळी सांडली असती. कुस्तीच आशी आजाब लावल्याली! गावबी आजाबच म्हणायच! म्याबी लका पैलवान हाय, पण आपलीबी छाती झाली नस्ती त्या डोंगराच्या बगलत मान द्यायची. ह्ये मोठ्ठा तगडा राक्षिसावनी गडी आन दुसरं कोनतरी फाळकं होतं. पर अर्धा तास उलाटला तरी त्यो चिपाड काय पडना गड्या! त्या ढोल्यानं कुस्तीतले आसत्याल नसत्याल तेवढे डाव लावले पण ह्यो दुसरा काय दाद दिना!

अण्णारती- विरहखंड भाग १

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/05/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
येई हो अण्णा रे माझे माऊली ये । कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।। आलिया गेलिया कोणी धाडी निरोप । कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।। काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला । घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।। अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी । अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।

सांज मुकी

लेखक चांदणशेला यांनी शुक्रवार, 26/05/2017 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांज मुकी आक्रंदताना ह्रदयाची उदास वाणी पाखरांची हरवून वाट सांजकीनारी ना साजणी ओढून आसवांत रात्र अंबरात केविलवाणे दिवे या चिरेबंदी अंधारात अवचित मिटून जावे सर्वस्व उधळून तरीही झेलीत शापांचे चांदणे आयुष्याचा दाटून काळोख धूसर पडसाद जुने असुरी अनाहत दिशा गहिवरला अंतरी गुंजारव हेलावतो अतूट बंध दिठीत तेवतो जन्म तुझ्यास्तव
काव्यरस

सांगा

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 25/05/2017 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
बंधने झुगारणे माझ्याच हाती मानणे ना मानणे माझ्याच हाती कापलेले पंख किती उडणार सांगा प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा
काव्यरस

युएस कॅपिटॉल उत्तरार्ध

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 25/05/2017 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
~ पूर्वार्ध ~ पहिल्या दिवशी कॅपिटॉल बाहेरून पाहिल्यावर दूसर्‍या दिवशी आम्ही कॅपिटॉल आतून पाहण्यास परतलो. सुरक्षा तपासणी पार पाडून आम्ही व्हिजिटर सेंटर मध्ये पोचलो.

फॉर्मॅलीटी

लेखक समो यांनी बुधवार, 24/05/2017 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले हा लेख लिहायचा असे चाललेलं आज योग आला. त्याला कारण ही तसेच आहे, गेल्या महिन्यात एका पाहुण्यांच्या घरी कामा निमित्त जाण्याचा योग आला, मी आपला साधारण संध्याकाळच्या वेळी गेलो, जसे सर्वांचे असते तसेच आमच्याही गप्पा टप्पा झाल्या त्याच बरोबर गॉसिपिंग मधून इतर पाहुण्यांचे क्षेम कुशल कळाले.

हंपी: भाग ३ - दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 24/05/2017 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
हंपी: दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १ हंपी: दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २ हजारराम मंदिर हजारराम मंदिर, विजयनगरच्या ऐन शाही परिसरातील हे मंदिर, साहजिकच हे बांधले गेले ते सम्राटांचे खाजगी मंदिर म्हणूनच. विजयनगरच्या संगम राजघराणातल्या देवराय दुसरा ह्याने हे मंदिर बांधले ते लहान स्वरूपात. तेव्हा मंदिर फक्त सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह इतकेच मर्यादित होते. नंतरच्या सम्राटांनी अधिकची भर घालून आजचे शिल्पसमृद्ध मंदिर आकारास आणले.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांना, त्यांचे नाव एका जीवाणूच्या नामकरणासाठी वापरून, नासाने सन्मानित केले !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 23/05/2017 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट! "भारतासाठी अभिमानास्पद" असे मुद्दाम लिहिले आहे. कारण आज डॉ अब्दुल कलाम हयात असते तर त्यांना त्यांच्या अनेक सन्मानांसारखेच या सन्मानाचेही फारसे अप्रूप वाटले नसते. परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेल्या माझ्यासारख्या चाहत्याला या क्षणी अवर्णनीय आनंद झाला नसता तरच आश्चर्य! असामान्य शास्त्रज्ञांचा सन्मान, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टीचे नामकरण त्यांचे नाव वापरून करण्याचा प्रघात आहे. ते कधी एखाद्या जैविक प्रजातीचे नाव, तर कधी एखाद्या ग्रह/तारा/खगोलशास्त्रीय समूहाचे नाव, तर कधी एखाद्या परिमाण/नियम/संकल्पनेचे नाव, इत्यादी असते.

अध्यात्माची महती

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी मंगळवार, 23/05/2017 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही बरे भोगी योग नको तुमचा चौकट ज्याची असे अध्यात्माची योग, अध्यात्माचा जगी नित्य असे दणका देह भोगणारा तळमळतसे अजूनही शमली नाही वासनाही अध्यात्माची शाल का पांघरावी ? अध्यात्म अवघे बजबजले अनंती उपयोग शून्य त्याचा व्यवहारामधी कुणी म्हणे शांतीसाठी कुणी म्हणे साठीसाठी अद्यात्माचा दवा अतिउत्तम तुम्हा सांगतो ऐका गोष्ट अध्यात्माची नशा नाही उतरत सर्वदाही मदिरेच्या नशेला काळाचे बंधन अध्यात्माची नशा नुतरे कधीही देवादिक असती त्याच्या सभोवताली आम्हीच रंगविले हवे तसे रोजचीच मारामारी जगणे झाले अशक्य अध्यात्म सांभाळिता लुळे पडलो सहिष्णुता भिनली विनाकारण अंगी दाबणारा दाबी हवा तसा अध्यात्म धरूनी हो
काव्यरस