Skip to main content

चिरंजीव रॉक्स

लेखक इनिगोय यांनी शनिवार, 10/06/2017 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद (१) “If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.” - Carl Sagan ९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली. ३७ – तुला कळली? ९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल. ३७ – (!!) कार्ल सगान?? संवाद (२) ९ – हे काय गं, देवाची पूजा नाही केलीस? ३७ – नाही रे बाबा, मला पूजा वगैरे नाही जमत. माझा त्यावर विश्वास नाहीये.

कथुकल्या ११

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 10/06/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
१. तुझ्याविना… निखिलने डोळे उघडले अन टेबलावरच्या घड्याळात पाहिलं. आज उठायला तब्बल एक तास उशीर झाला होता. त्याने पटापट आवरलं अन ड्रेस बदलून तयार झाला. कॉलरवरच्या हिरवट डागाकडे पाहून तो जरा नाराज झाला पण एका आर्ट टीचरसाठी हे नेहमीचच होतं. जाताजाता त्याने प्रियाकडे वळून पाहिलं. ती त्याच्याकडे तोंड करून झोपली होती. लांबसडक सोनेरी केसांनी मुखचंद्रमा अर्धवट झाकला होता. डोळे मिटलेला तिचा सुंदर चेहरा शांत, प्रसन्न दिसत होता. “सॉरी डियर.

अनवट किल्ले ११: वळणदार तटबंदीचा भुदरगड (Bhudargad)

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 10/06/2017 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेला पन्हाळा, विशाळगड असे महत्त्वाचे किल्ले आहेत. तर दक्षिण बाजूला रांगणा, सामानगड असे किल्ले आहेत. या दरम्यान होणार्‍या वाहतुकीवर आणि लष्करी हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एका बळकट ठाण्याची नितांत आवश्यकता होती. यासाठीच पन्हाळ्याच्या शिलाहार दुसर्‍या भोज राजाने एका सपाट पठारावर या दुर्गाची निर्मिती केली. शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्दैवाने हा गड पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेला.

ढग . . !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 10/06/2017 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळातले ढग कधीतरी त्याला खूप त्रास देतात कारण नसताना उगीच तिचाच आकार घेतात . . . . मग तोही नादावतो वेडा बघत बसतो तासन् तास ढगाचं नुसतं निमित्त एक त्याला फक्त तिची आस.... कधी कधी एकाच क्षणात तो ढग जातो अचानक विरुन अन् अचानक जाणवतं रितेपण भकास वास्तव टाकतं घेरुन ढगासारखंच स्वप्न विरलं आणि संपला सगळा खेळ तो मात्र अजून जपतो उराशी आठवणींच्या जगातली वेळ !
काव्यरस

प्रोफाईल.. समूहावर वावरणारी एक अमानवि गुढ व्यक्ति....एक कथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 10/06/2017 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रोफाईल.. समूहावर वावरणारी एक अमानवि गुढ व्यक्ति....एक कथा ...................................................... हजारोची सदस्य संख्या ओलांडणारा तो एक फेसबुका वरील समुह .. त्यावर धनंजय जोशी हा एक सदस्य.. समुहावर अनेक वेळा मीट्स..संमेलने..मिसळ पार्ट्या आदी चालत असायच्या.. सदस्य एक मेकास काहि प्रमणात भेटले पण होते.. मात्र धनंजय..ज्याला डी.जे या नावाने ओळखले जायचे.. तो सा-या चर्चा भेटी गठी पासून दूर असायचा.. समूहावर अनेक विषयावर चर्चा चालत असत त्यात पण त्याचा फारसा सहभाग नसे. खरा म्हणजे त्याला प्रत्यक्ष पाहिलेले कुणी नव्हते..

कहा गये वो लोग?--विलास

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 09/06/2017 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
babukaka aajibai natha mangya sanjya ranshur आयला विलास तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी आणि ते पण या मालिकेत लिहायला मी कधी मिपावर येईन असे वाटलेच नव्हते रे ? म्हणजे कधी तसा विचारच मनात आला नाही. कायतरीच भयानक वाटतंय बघ.

इंग्लीश स्कूलचं फॅड

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 09/06/2017 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा इंग्लीश स्कूलचं फॅड गावचा नामा त्या दिवशी भेटला. बॅंकेच्या दारात.गडी जरा घाईतच होता.हातात बरीचं कागद होती. त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं होतं. मी:अरे कर्ज कशाला काढतो?" तो:"कशाला म्हंजे? पोरग टाकलं की शाळात" मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?" तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला." मी: "किती पैसं भरलं ? तो:आता भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचं वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला.रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून ." मी:"आरं,एवढ पैसं कशी आणणाऱ ?" तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्ह? उचल घेणारं .बायको भी समजदार.

(एक भुताचा अनुभव)

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 09/06/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा : बृहन्माहाराष्ट्राची संत्रा आणि नुकताच वाचलेला अनुभव नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा आणि नशेबाजीला खतपाणी घालणे नाहि. तेव्हा मी ट्रान्सपोर्ट मध्ये काम करत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे.

एक ट्रेक ---- झपाटलेला (भाग १)

लेखक अमर विश्वास यांनी शुक्रवार, 09/06/2017 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
वीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.. 1995 च्या डिसेंबरची एक रात्र,, साधारण आठची वेळ... स्थळ : आनंद नगर मधला एक फ्लॅट... चार मित्र कोंडाळ करून बसले आहेत.. कुणीच काही बोलत नाही... प्लॅंचेट वगैरे काही नाही.. तसाही माझा असल्या गोष्टींवर विशवास नाही.... हो.. पण आधी आमची ओळख करून देतो.. आम्ही चौघ... विन्या, सुन्या, मन्या आणि मी म्हणजेच अम्या किंवा अमर्या किंवा.. जाउदे सगळीच टोपणनावे सांगण्यासारखी नाहीत. चौघही इंजिनियरिंगचे विद्यार्थी. परिक्षा, व्हायावा नुकत्याच संपलेल्या.. त्यामुळे श्रमपरिहार करायला आम्ही एकत्र जमलो होतो. या सुट्टीत काय करायचे हाही विषय होताच. च्यायला..

एक भुताचा अनुभव

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 09/06/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा ला खतपाणी घालणे नाहि. तेव्हा मी महाविद्यालय मध्ये शिकत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे. पहाटे लवकर उठून व्यायाम शाळेत जाण्यासाठी मी माझे गजराचे घड्याळ एक तासाने पुढे करून ठेवत असे, जेणे करून ५ वाजता गजर वाजला तर मी ४ वाजताच उठून एक तास अभ्यास करून फ्रेश होऊन मग ५ वाजत व्यायाम शाळेत जाईल असा होता. सकाळी लवकर ४ ला उठणे खूप जिकरीचे आणि अवघड वाटे म्हणून हि खटाटोप केली होती. असो, त्या दिवशी पण मी नेहमी प्रमाणे ५ वाजताचा गजर वाजताच उठलो, पण आदल्या रात्री मित्रांसोबत चिवडा खात खात खूप खमंग भुतांच्या गप्पा मारल्या होत्या.