Skip to main content

तांडव (ऐसी अक्षरे -१८)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 08/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तांडव-पुस्तक परिचय लेखक-महाबळेश्वर सैल अ पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.

तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 07/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे
नमस्कार मिपाखरांनो! महाराष्ट्रात आंब्याचे लोणचे घालायचे दिवस येऊ घातलेत. त्यानिमित्ताने तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे ही पाककृती सादर करत आहे. आवड असल्यास नक्की करून पहा.

मनोरथाच्या वाटेवर जरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 07/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भू-कवचा विंधून धरेच्या गाभ्याशी जाईन शून्य गुरुत्वाकर्षण तिथले अधांतरी मोजेन निंबोणीचे रोप कोवळे चन्द्रावर रुजवीन अंगाईचे शब्द बदलूनी पुन्हा लिहून काढीन जर्द तांबडी मंगळमाती शनीवरी शिंपीन शनि-मंगळ मग युती अनोखी एकवार पाहीन राहू-केतुची जोडगोळी मग समक्ष बघण्यासाठी चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद सोडवीन निरगाठी सात अश्व सूर्याचे - त्यांना थोपटीन प्रेमाने त्यांचा दाणा , पाणी , खरारा करीन मी निगुतीने कृष्णविवर सैराट , भटकते हुडकून मग काढीन गळाभेट घेईन तयाची - त्यात विरुन जाईन मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे

लोकसभा निवडणूक २०२४ : अ-संपादकीय

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 06/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.

लोकसभेच्या २०२४ निवडणूकीची धामधूम एकदाची थांबली. निवडणूकपूर्व कल चाचण्या फोल ठरल्या. आता लोकसभेचा निकाल पाहता, कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने बहुमत नाकारले आहे असे दिसते आणि आघाड्यांच्या सरकारांकडे पुनरागमन आणि विरोधी पक्षाला बळ या निवडणूकीने दिले असे आता सर्व संमिश्र निकाल पाहता म्हणायला हरकत नाही.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 06/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
23 may 2024 : ध्यानाचा चौथा दिवस सकाळी नेहमीप्रमाणे योग आसने ध्यानाचा वर्ग झाला. आता हे सारं अंगवळणी पडत चाललं आहे. ध्यानातील अनुभव इतके वैयक्तिक आणि खोलवरचे आहेत की ते लिहुन ठेवणं मला गरजेचे वाटत नाही. बस्स माऊलींच्या ओव्या , समर्थांचे श्लोक , तुकोबांचे अभंग आठवत राहतात.

हिंदोळे

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 05/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदोळे आज तिचं लग्न होतं . तिचं - जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं . होतं ! कारण सकाळीच तिचं लग्न लागलं होतं आणि आता तर संध्याकाळ झाली होती . दिवसभर त्याने कसातरी तळमळत काढला होता . तो बाहेर पडला. हवा अजूनही उष्ण श्वास सोडत होती . त्याच्या मनातही उष्ण खळबळ. तो उगा इकडे- तिकडे भटकत राहिला . दुकानं , माणसं, गर्दी पहात . त्याच्या डोक्यात मुळात काही घुसतच नव्हतं . तो चालत एका बारपाशी आला . जुनाट ,कळकट बार .रया गेलेला . आधी त्याच्या ते लक्षातही आलं नाही . इतकं त्याचं डोकं गच्च झालेलं होतं . त्याच्या नकळत तो आत शिरलादेखील . एक मात्र होतं - आत गार्डन होतं . निवांत बसण्याची सोय होती.

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 04/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत.

बाजारगप्पा-भाग-४

लेखक मारवा यांनी मंगळवार, 04/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
३- आता बघा सर्वात अगोदर आपली मॅक्स लॉस अमाऊंट जी आहे ती पुर्णपणे आपल्याला अंतिमतः सहन करता येइल अशी आपण घेत आहोत. आणि त्या मॅक्स लॉस पर्यंत पोहोचणंच च आपण फार लांबवत आहोत. कारण की आपण भाग २ मधील तक्ता बघा ज्या न्युट्रल स्टेज ला आपण सुरुवात करतो तिथे आपले एकुण नंबर ऑफ ट्रेडस ३० आहेत. म्हणजे त्याचा रिस्क पर ट्रेड १००० रुपये आहे.आणि रीस्क पर ट्रेड इन % जी आहे ती ०.३३% इतकी आहे.

बाजारगप्पा-भाग-३

लेखक मारवा यांनी मंगळवार, 04/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन्ही भाग वाचला नसेल तर विनंती आहे की पहील्या भागापासुन वाचुन घ्या नाहीतर काहीच कळणार नाही. तर मागील भागात आपण एक मनी मॅनेजमेंट कशी करावी ते बघितले त्यालाच आता पुढे नेऊन जाऊ. तर मागे म्हणालो तसे मनी मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे क्लोजली इन्टरकनेक्टेड आहेत. जसे शरीर आणि मन. पण शरीर समजा मनी मॅनेजमेंट आहे आणि माइंडसेट मन च आहे की. तर तुम्ही बघा सुरुवात शरीराकडुन करणे सोपे आहे तुम्ही आंघोळ केली तुमच्या मनाला फ्रेश वाटेल तुम्ही संभोग केला तुमच्या मनाला आनंद होइल. तर शरीराकडुन सुरुवात करत मनाला नियंत्रित करणे तुलनेने सोपे आहे. आणि दोन्ही एकच आहेत.