घरामध्ये असावे, घर एक छान
घराची संकल्पना खरच किती छान आहे! बाह्य जगातील कटाकटींपासून मुक्त अशी स्वत:ची आरामशीर जागा. अगदी आदिम मानवापासून आजवर घर हा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू झालेला आहे. आदिम काळातील गरजांमधून पुरुषप्रधान संस्कृतीचा समाजात घट्ट पगडा बसला. या व्यवस्थेत अगदी आजवर अनेक स्त्रियांनी अन्याय व अत्याचार सोसले. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वाढला. त्यातून अन्याय विरुद्ध लढण्याची जागरूकता आली. प्रत्येक देशात समाज सुधारक पुढे आले. स्त्री जागृती, स्त्री सबलीकरण अशा संकल्पना अमलात आणणे ही काळाची गरज बनली. स्त्रियांवर अन्याय होऊ नाही या दृष्टीने कायदे देखील बनविले गेले.
मिसळपाव