Skip to main content

सत्तावीस वजा किती बरोबर शून्य?

लेखक आजी यांनी गुरुवार, 13/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती. मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता. पावसाला सुरुवात झाली. धरती आणि पावसाचं लग्न लागलं. आसपासची झाडं सळसळत,आनंदानं डोलत अक्षता टाकत होती.

सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१)

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 13/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तीनचार दिवसांपूर्वी एका नवीनच गोष्टीचा शोध लागला, आणि मग त्या उद्योगाला लागलो. त्यातून जन्मलेल्या काही रमलप्रतिमा इथे देतो आहे.

द सेकंड स्पार्क - भाग २ - उत्तरार्ध

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 12/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
" पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते." .... " लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो.

उत्तर -२

लेखक भागो यांनी बुधवार, 12/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर -२ फ्रेड्रिक ब्राऊन ह्यांनी "Answer” कथा १९५४ साली लिहिली. त्यानंतर म्हणजे १९५६ साली असिमोव ह्यांनी “The Last Question” ही कथा लिहिली. दोन्ही कथा सुपर सुपर संगणकाच्या थीम वर आधारित आहेत. फ्रेड्रिक ब्राऊनची कथा केवळ २६० शब्दात संपते तर असिमोवची कथा जवळजवळ सात पाने व्यापते. ही कथा मानवाच्या अब्जावधी वर्षाच्या कालावधीत घडते. असिमोवने लिहिलेली कथा थोडक्यात अशी आहे. ह्या कथेत एंट्रॉपी ह्या गूढ गहन विषयावर प्रश्न विचारले आहेत.

द सेकंड स्पार्क - भाग १

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 12/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
"इफ युनिव्हर्स इज द आन्सर, देन व्हॉट इज द क्वश्चन ?"
भव्य कॉरीडॉर . इन्कॅण्डेसंट पण पांढरा लख्ख प्रकाश. संपुर्ण एकांत . आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही. अन आपल्याला आपल्याच श्वासाव्यतिरिक्त कशाचाही आवाज येणार नाही इतकी शांतता. समोर कोरी पांढरी शुभ्र भिंत अन अशा त्या भिंतीवर लिहिलेले ते सुप्रसिध्द वाक्य . समोर बस बसायला एक साधीशी खुर्ची. बाकी कोणीच नाही. प्रोफेसर गोडसे त्या वाक्यासमोर आले अन क्षणभर थबले . त्यांच्या चेहर्‍यावर मंद असे हास्य पसरले... "हं, लेट मी थिंक " इतकेच म्हणुन ते समोरील खुर्चीवर जाऊन विचार करत बसले. कितीतरीवेळ निघुन गेला असेल देव जाणे.

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ३ (जनकपुर)

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 10/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग:

२००८ साली युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थळ' घोषित केलेल्या ह्या भव्य-दिव्य आणि अतिश

पाट्या

लेखक kool.amol यांनी सोमवार, 10/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पाट्या! जग बदलत चाललं आहे हे वाक्य मला वाटतं वेदांमध्ये सुद्धा असेल कदाचित! म्हणजे प्रत्येक पिढी हे वाक्य कधी ना कधी म्हणतच असते. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. काय बदललं आहे? तर बरच काही! पण असं असलं तरी काही जुन्या गोष्टी एकदमच दिसून येतात. पण बऱ्याच गोष्टी आठवायला लागतात. त्याच असं झालं की सध्या मला एक नवीनच छंद लागला आहे. सांगतो. पाट्या वाचायचा. मी पुण्यात राहत नाही हे आधीच सांगतो. पाट्या काही फक्त पुण्यातच आहेत असं नाही. मला दुकानांच्या नावाच्या पाट्या वाचायला आवडत आहेत कारण मी नवी भाषा शिकतो आहे.

तटबंदी

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 09/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ओतप्रोत जे असे सांग ते का न तुला दिसतसे? त्रिमितीच्या पिंजर्‍या वेढुनी अमित असे जे वसे सांग ते का न तुला दिसतसे? धन-ऋण एकाकार होती त्या- -स्थळी शून्य जे वसे सांग त्या अभाव मानू कसे? जड-चेतन सीमेवर धूसर तटबंदी जी असे सांग ती का न मला दिसतसे?
काव्यरस

उत्तर.

लेखक भागो यांनी रविवार, 09/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर. द्वान ईव्हने समारंभपूर्वक सोन्याचे अंतिम कनेक्शन सोल्डर केले. डझनभर टेलिव्हिजन कॅमेऱ्यांच्या साक्षीने संपूर्ण विश्वात तो कार्यक्रम प्रसारित होत होता. त्याची दृश्ये दाखवली जात होती. द्वान ईव्हने समाधानाने मान डोलवली. नंतर ती स्विचच्या बाजूला जाऊन उभी राहिली. विश्वातील मानवी संस्कृती असलेल्या सर्व ग्रहांच्या सर्व मॉन्स्टर कंप्युटिंग मशीनना एकाच वेळी कनेक्ट करेल असा तो स्विच होता.

धंदा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 08/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
धंदा त्या रस्त्यावर दारूचं एक दुकान होतं. संध्याकाळी तिथे मोप गर्दी असायची. त्यामुळे आजूबाजूची दुकानं थोडी लवकरच बंद व्हायची. एक पलीकडची पानटपरी सोडली तर. बरं, त्या रस्त्याला रात्री आठनंतर इतर लोक फारसे नसायचेच. समोर एक मोठी कंपनी होती.तिची कम्पाउंड वॉल होती. लांबलचक पसरलेली. त्यामुळे वर्दळ नाही अन शांतता. त्यामुळे रात्री तिथे बेवड्यांची फौज जमायची. बेवडा तर मारायचा; पण बारमध्ये परवडत नाही. मग बाहेरच. शहरात असे बरेच अड्डे. त्यातलाच हा एक. त्या कंपनीच्या भिंतीची कंपनी त्यांना बरी पडायची. ठरलेले मेंबर तर असायचेच.पण कधी नवीनही असायचे. जमणाऱ्यांची भांडणं - मारामाऱ्या ठरलेल्या.