मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तटबंदी

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ओतप्रोत जे असे सांग ते का न तुला दिसतसे? त्रिमितीच्या पिंजर्‍या वेढुनी अमित असे जे वसे सांग ते का न तुला दिसतसे? धन-ऋण एकाकार होती त्या- -स्थळी शून्य जे वसे सांग त्या अभाव मानू कसे? जड-चेतन सीमेवर धूसर तटबंदी जी असे सांग ती का न मला दिसतसे?

वाचन 1512 प्रतिक्रिया 0