Skip to main content

कृष्णाच्या गोष्टी -३

लेखक Bhakti यांनी सोमवार, 24/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
*यमलार्जुन भंग क एक दिवस अवखळ कृष्णाला यशोदेने एका उखळीला बांधले. ती कामासाठी इतरत्र निघून गेली. छोटासा कृष्ण उखळीसह अंगणात आला. अंगणातच यमलार्जुन नावाचे दोन वृक्ष होते. कृष्ण उखळीसह त्यामधून पुढे निघाला, आकाराने छोटी उखळ झाडाच्या खोडांनाच अडकली.

कवितेचा शब्द शब्द

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 24/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
प्रपाताने थेंबुट्यास कमी कधी लेखू नये पिंडी वसते ब्रह्मांड कदापि विसरू नये महापुरात लव्हाळी वाचतील? खात्री नाही लवचिकतेचा ताठा लव्हाळ्याने धरू नये आरशाने आरशात प्रतिबिंब पाहू नये अनंताने कोंदटसे सान्तपण लेवू नये कवितेचा शब्द शब्द ओळ बनण्याच्या आधी दोन ओळींच्या मधल्या अनाघ्राता स्पर्शू नये

कृष्णाच्या गोष्टी २

लेखक Bhakti यांनी रविवार, 23/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
वसुदेव आणि देवकी विवाह वसुदेवाचे शौर्य विद्वत्ता शहाणपण पाहून देवकीचे त्याच्यावर प्रेम जडले सर्वांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. खरे पाहता उग्रसेन आणि कंस या विवाहामुळे अस्वस्थ झाले होते. परंतु वधू-वरांना विभोत्तर समारंभ पूर्वक देवदर्शनाला नेऊन व तिथून वधूला वरगृही सोडण्याच्या वरातीत मिरवणुकीत वधू-वरांच्या खास रथाचे सारथ्य स्वतः कंसांनी केले होते. त्याला दाखवायचे होते की आपल्या आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे. कंसाला काही दिवसांनी खटवांग वनात नारद भेटला आणि त्याने देवकीचे आठवे मूल तुला ठार करणार आहे असे भविष्य सांगितले.

पलंग..नव्हे मृत्यूचा सापळा

लेखक नूतन यांनी शनिवार, 22/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि माझ्या एका इंग्लिश मित्रासोबत मी पॅरिस मध्ये रहायला आलो होतो.आम्ही दोघेही तरुण होतो आणि आमच्या सध्याच्या वास्तव्याच्या या रंगतदार शहरात मनमुराद जगत होतो.‌ लुव्र म्युझियम च्या अगदी समोर असलेल्या  "पॅले रोयाल" मध्ये आम्ही रहात होतो. एका रात्री आम्ही  आसपास फिरता फिरता ,आज ' टाइमपास'  कसा करावा  याचा विचार करत होतो.माझा दोस्त म्हणाला,  ‌चल "फ्रॅस्कॅटी" त जाऊ.( फ्रॅस्कॅटी हा १९व्या शतकातील, पॅरिस मधील एक प्रख्यात कॅफे व सोशल क्लब होता. तिथे उच्चभ्रू वर्गातील पुरूष व स्त्रिया येत.

गोष्टी कृष्णाच्या १

लेखक Bhakti यांनी शनिवार, 22/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात. संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी लेखक प्रा. डॉ.राम बिवलकर यांच्या पुस्तकातील जेवढा उमगेल तो गोषवारा देते. फोटो -कृष्णा @मथुरा अ कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा.

अज्ञाताचे लेख-चित्रकथी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 21/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सुरक्शा ह मुख्य मुद्दा. १-b1 बाहेरच्या बाजुने घरट्यासाठी निवडलेली जागा. २-b2 आतल्या बाजुने घरटे. ३-b3 २२ एप्रिल २४,सुरूवात ४-b4 २४ एप्रिल २४, तयारी झाली

माझी योगचर्या

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 21/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भुजंगासनाची माझी रीत न्यारी डसेन जिव्हारी नकळत ॥१॥ शीर्षासन तर माझे आवडते नको ते उलटे पाहतो मी ॥२॥ "धनुरा"सनाची सवय लाविली "मशाल" फेकली दूरवर ॥३॥ सध्या "पद्मा"सन घालतो मुकाट ED चे झेंगट कोणा हवे? ॥४॥
काव्यरस

डार्कलँड

लेखक भागो यांनी गुरुवार, 20/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते. व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच. पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, “मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.” लोकांना उगीचच थांबायला लावणे यात अवर्णीय आनंद असतो. आपण सगळीकडे थांबत असतो.

तीळाचे लाडू

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 20/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
लाडू करायचे म्हटलं की साजूक तूप पाहिजेच हा समज खजूर वापराने दूर झालाय.खजूर वापरल्यामुळे लाडूंची चवही सुंदर होते आणि वळायलाही झटपट होतात. तीळाचे लाडू १५० ग्रैम अर्धवट भाजलेले तीळ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी सुके खोबरे अर्धी वाटी गुळ आठ- दहा खजूर दहा बारा बदाम इलायची A सर्व जिन्नस मिक्सरमधू