Skip to main content

पावसाळी भटकंती: तिकोना, वितंडगड( Tikonaa,Vitandgad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 18/08/2017 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
जगातील सात आश्चर्यापैकी एक म्हणजे "ईजिप्तचे पिरॅमीड". हे पहाण्यासाठी जगभरातुन हि गर्दी ईजिप्तला उसळते. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात वडगाव मावळ तालुक्यात निसर्गानेच एक पिरॅमीड उभे केले आहे. मात्र हे पिरॅमीड चौकोनी नसून त्रिकोणी आहे.

बायको

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शुक्रवार, 18/08/2017 05:40 या दिवशी प्रकाशित केले.
©मंगेश पंचाक्षरी, नासिक. (पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये) आमचा प्रेमविवाह झाला. आजही आम्ही आमच्या बायकोच्या खूपच 'प्रेमात' आहोत. ती 'पुण्याची' आणि आम्ही 'नाशिकचे'. 'पुण्यापेक्षा मोठं आणि भारी शहर जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही ' याबद्दल पुणेकरांना ठाम विश्वास असतो. त्यामुळं आमच्या सौ ना देखील 'पुण्याबद्दल' जबरदस्त प्रेम आहे. मी लग्नापूर्वी तिला भेटायला वारंवार पुण्यात जात असे.

ट्रेड (व्यापार) - झिरो सम गेम इत्यादी

लेखक साहना यांनी शुक्रवार, 18/08/2017 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
गेम थेअरी म्हणजे गणित, तर्कशास्त्र आणि मानवी स्वभाव विशेषतः निर्णय घेण्याची मानवी क्षमता ह्यांची सांगड घालणारे एक क्षेत्र आहे. अर्थशास्त्र, राजकारण, युद्धशास्त्र इत्यादीने अनेक क्षेत्रांत गेम थेअरी वापरली जाते. गेम थेअरी मधील काही संकल्पना जर आपण समजून घेतल्या तर अनेक क्षेत्रांत आपण निर्णय पद्धतीने घेऊ शकतो. गेम म्हणजे काय ? बुद्धिबळ हा एक खेळ आहे आणि ह्यांत दोन खेळाडू एक मेका विरुद्ध खेळतात. ह्या खेळाचे ठराविक नियम असतात आणि आलटून पालटून प्रत्येक खेळाडू एक निर्णय घेतो. प्रत्येक निर्णय घेण्याआधी खेळाडूंकडे काही "पर्याय" असतात.

कला

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शुक्रवार, 18/08/2017 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख:- आम्ही लहानपणी एक शेर वाचला होता. " मैने उससे प्यार किया अबला समज कर, लेकींन उसकी बाप ने मुझे पिटा 'तबला' समझकर". असले आचरट शेर कोण लिहितं हे काही कळत नाही. पण या शेर मूळे आम्हाला 'तबल्या' बद्दल कुतूहल जागृत झालं. बरेच पालक आपल्या लहान मुलाला तबला शिकायला क्लास मध्ये घेऊन जातात. पालकांचा पहिला प्रश्न असतो "याला किती दिवसात तबला वाजवता येईल?" यासारखा अज्ञानमूलक प्रश्न जगात दुसरा कोणताच नसेल. आधी च पालकांनी मुलाचं नाव सचिन ठेवलेलं असतं.

बापाचं काळीज

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शुक्रवार, 18/08/2017 02:25 या दिवशी प्रकाशित केले.
©®™मंगेश पंचाक्षरी, नासिक. (कृपया ही पोस्ट पूर्वपरवानगी शिवाय मुद्रित किंवा प्रकाशित करू नये) तो पन्नाशीचा. नासिकमध्ये रहातो. त्याची लाडकी राजकन्या, त्याची मुलगी विशीची. शिकण्यासाठी मुंबईच्या एका उपनगरात रहाते. तिला एका बंगल्यात स्वतंत्र खोली भाड्याने घेऊन दिलेली. हेतू हा कि आई -बाबा तिच्याकडे गेले कि त्यानाही तिथे रहाता येईल. चांगल- चुंगल खाऊ घालता येईल. एरवी रोज ती जेवायला घर मालकांकडेच. घरमालक स्वभावाने अगदी चांगले. पूर्ण विश्वासू. आई किंवा बाबांचा रोज मुलीला खुशाली विचारण्यासाठी फोन होतो. मोबाईल मुळे हि फार चांगली सोय झालेली आहे. नेहमी प्रमाणे आजही त्यांनी फोन केला.

हिरवाईच्या गप्पा - भाग १

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 18/08/2017 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! 'हिरवाईच्या गप्पा' ह्या सदाहरित धाग्यामध्ये स्वागत आहे. ह्या धाग्याचे प्रयोजन हे बागकाम, परसबागेतील शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने कीडनियंत्रण, बर्ड-फीडर बनवणे, झाडांचे संगोपन इत्यादी विषयांवर चर्चा करणे हे आहे. येथे मिपाकरांना वरीलपैकी आणि इतरही हिरवाईशी संबंधित विषयांवर चर्चा करता येईल. प्रश्न विचारता येतील, उत्तरे देता येतील, माहितीची देवाणघेवाण करता येईल, आणि अर्थातच, आपल्या बागेचे फोटो टाकता येतील. साधारणपणे पन्नास प्रतिसाद अथवा दोन पाने भरली की कोणीही सदस्य नवीन धागा सुरू करू शकेल.

चॅलेंज - भाग ५ अन्तिम

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 17/08/2017 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज भाग ५ (अंतिम) एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला. “हो हो, मी येतेच थोड्या वेळात” म्हणून तिने फोन ठेवला. सगळ्यांच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्ह पाहून तिने म्हटलं, “रसिक, बुकस्टोअरवाला” “तो कशाला तुला फोन करतो?” शौनकने तत्काळ प्रश्न केला. “बुकस्टोअरवाला कशाला फोन करेल! पुस्तकांबद्दलच करेल ना!” दिगंतने परस्पर शौनकला उत्तर दिलं. “नाहीतर काय! मी पुस्तकं मागवली होती. ती आली आहेत. ते थोड्या वेळाने दुकान बंद करतील. म्हणून लवकर येऊन घेऊन जायला सांगत होता.

चॅलेंज - भाग ४

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 17/08/2017 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज भाग ४ “आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं. नेमकं त्याच वेळी कॅफेचं दार कोणीतरी उघडलं आणि वार्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकेने शौनकच्या डायरीचं पान उडालं, ते नेमकं दिगंतने पाहिलं. “अरे तू अजून लिहिलयंस, मग हे का नाही वाचलंस?” “जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं. “अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही.

अतींद्रिय अनुभव : डॉक्टरांची तडजोड आणि भ्रूणहत्या

लेखक सत्या सुर्वे यांनी गुरुवार, 17/08/2017 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर सदाभाऊ मराठवाड्याच्या एका दुर्गम म्हणाव्या अश्या भागांत दाखल झाले आणि काही दिवसांनी मी सुद्धा दाखल झालो. सदाभाऊ हे घोरपडे घरातील द्वितीय मुलगे. प्रचंड श्रीमंती घरी वास करत असली तरी सदाभाऊ ना त्यांची काहीही पर्वा नव्हती. ते आधी डॉक्टरकी शिकायला गेले, तिथे एक मुलीच्या प्रेमात पडले आणि वडिलांच्या विरुद्ध जाऊन घरजावई म्हणून ह्या गावांत दाखल झाले. त्यांनी आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहून एखादा चांगला कारकून पाठवण्याची विनंती केली होती. घोरपडे घराण्यात मी कामाला होतो पण दुय्यम दर्जाचा दिवाणजी म्हणूनच. मला दुर्गम भागांत इच्छा जरी नसली तरी पूर्णपणे सारा कारभार माझ्याच हातांत राहील म्हणून मी हि नोकरी पत्करली.